How four stomach animals are ruminating? 
कृषी पूरक

जनावरे रवंथ कसे करतात?

रवंथ करणाऱ्या जनावरांचे पोट हे कोटी पोट, जाळी पोट, पडदे पोट आणि खरे पोट या चार कप्प्यांमध्ये विभागलेले असते. कोटी (Rumen) पोट अन्ननलिकेसोबत जोडले गेलेले असते.

टीम अॅग्रोवन

रवंथ करणाऱ्या जनावरांचे पोट हे कोटी पोट, जाळी पोट, पडदे पोट आणि खरे पोट या चार कप्प्यांमध्ये विभागलेले असते. कोटी (Rumen) पोट  अन्ननलिकेसोबत जोडले गेलेले असते. चर्वण केलेले खाद्य कोटी पोटात एका ठिकाणी जमा होऊन त्याचा गोळा तयार होतो. यात मुख्यत्वे न पचलेले घटक असतात. ज्यांचे रवंथ (Rumination) प्रक्रियेमध्ये पुन्हा चर्वण केले जाते.

हेही पाहा-  रवंथ किंवा Rumination चे महत्त्व जाणून घ्या!

कोटीपोटाच्या भित्तीकेमधून विविध घटक शोषले जातात, तसेच सूक्ष्मजीवाणूद्वारे प्रथिने, कर्बोदके यांचे साध्या प्रकारात रुपांतर केले जाते. कोटी पोटाचा सामू कमी जास्त झाल्यास पोटफुगी (Bloat) होऊ शकते. खाद्यामध्ये लोखंडी, धारधार अखाद्य वस्तू जाळी पोटात अडकून बसतात. जाळी पोट हे मधमाश्यांच्या जाळ्यासारखे असते. पडदे पोटामध्ये विविध प्रकारचे अनेक पडदे असतात. खऱ्या पोटामध्ये संप्रेरकामार्फत विघटन केले जाते. हेही पाहा-  जनावरांची पचनक्रिया कशी कार्य करते?

पचनक्रिया तोंडामध्ये सुरु होऊन लाळ मिसळली जाते. हे लाळमिश्रित खाद्य कोटीपोटामध्ये जाते. मोठी जनावरे चारा पटापट खाल्यानंतर ते कोटी पोटात जाऊन तरंगत राहते. जनावरे बसल्यावर परत हे अन्न तोंडात आणून त्यात लाळ मिसळली जाते, यालाच आपण रवंथ करणे असं म्हणतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Godavari Irrigation Reform: थकबाकी वसुली, स्वायत्तता अजेंड्यावर

Well Approval Irregularities: पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी दिली परस्पर ३७ विहिरींना मंजुरी

Grape Vineyard Destroyed: उभ्या द्राक्ष बागेवर माथेफिरूकडून कुऱ्हाड

Transport Business Issue: ट्रान्सपोर्ट व्यवसाय ‘व्हेंटिलेटर’वर

Tree Cutting Ban: नाशिकमध्ये वृक्षतोडीला २८ एप्रिलपर्यंत स्थगिती

SCROLL FOR NEXT