Feeding of dairy cattle and buffaloes Agrowon
कृषी पूरक

जनावरांना द्या विविध प्रकारचा पौष्टिक चारा

पशुपालकांनी आपल्या गोठ्यातील जनावरांचे योग्य आहार व्यवस्थापन केले पाहिजे. जनावरांच्या पचनसंस्थेवरच गुणवत्तापूर्ण व अधिक दुग्धोत्पादन अवलंबून आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

Team Agrowon

पशुधनाचे व्यवस्थापन करत असताना जनावरांना आपण आपल्याकडे उपलब्ध असलेला चारा (fodder) पोटभर देत असतो. परंतु जनावरांना दिल्या जाणाऱ्या एकाच प्रकारच्या चाऱ्यातून त्यांच्या शरीराची गरज भागविली जाऊ शकत नाही. त्यामुळे जनावरांच्या आहारात विविध प्रकारच्या घटकांचा समावेश केला पाहिजे.

जनावरांसाठी पौष्टिक चारा तयार करण्यासाठी कोरड्या चाऱ्याबरोबर हिरवा चाराही (green fodder) द्यावा. कोरडा आणि हिरवा चारा ३:१ या प्रमाणात एकत्रित करून द्यावा. यासोबतच दोन भाग तृणधान्य हिरवा चारा, ज्वारी, मका, ओट, पॅरा गवत आणि एक भाग डाळवर्गीय चारा जसे की, लसूण गवत, दशरथ, सुबाभूळ यांचा समवेश करावा.

जेव्हा जनावरांना दिला जाणारा हिरवा चारा डाळवर्गीय नसतो. अशा वेळेस युरियाच्या सहाय्याने कोरड्या चाऱ्याची पौष्टिकता वाढविता येते. स्वच्छ, कोरड्या जागेवर उपलब्ध कडबा, भुस्सा इतर १०० किलो गवत पसरवून, २० लिटर पाण्यामध्ये २ किलो युरिया खत टाकून विरघळून घ्या. त्यानंतर १० किलो उसाची मळी किंवा ५ किलो गुळ मिसळून घ्या. हे तयार मिश्रण कुट्टी केलेल्या चाऱ्यावर समप्रमाणात टाकावे. अशा प्रकारे प्रक्रिया केलेला चारा पावसाळ्यात दोन ते तीन दिवस, हिवाळ्यात आठ दिवस तर उन्हाळ्यात १० ते १२ दिवस चांगले राहते. हे तयार केलेले मिश्रण भाकड जनावरे, शेती किंवा ओढ कामासाठी वापरण्यात येणाऱ्या जनावरांना तसेच ३ ते ४ लिटर दुधाचे उत्पादन देणाऱ्या जनावरांना ८ ते १० किलो द्यावे.

पाच लिटरपेक्षा जास्त दूध उत्पादन असलेल्या जनावरांना द्यायचा झाल्यास, त्यांना अतिरिक्त खनिज मिश्रणे द्यावीत. सोबतच २ ते ४ किलो हिरवा चाराही द्यावा.

जनावरांना आहाराची गरज ही शरीरक्रियांसाठी आणि त्यांच्यापासून मानवाला मिळणाऱ्या उत्पादनासाठी लागत असते. जनावरांना आवश्यक पोषक घटकांची गरज योग्य प्रमाणात भागवल्यास, चांगले दुधाचे उत्पादन मिळण्यास मदत होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT