Different diseases of goat 
कृषी पूरक

आजारी शेळ्यांची ओळख कशी करावी?

शेळ्यांच्या आरोग्य व्यवस्थापनात निष्काळजीपणा केल्यास कळपातील शेळ्यांना विविध रोगांची लागण होऊन मृत्यु संभवतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

रोशनी गोळे

शेळी पालन व्यवसायामध्ये संगोपन व व्यवस्थापनाला करत असताना शेळ्यांचे आरोग्य अधिक महत्वाचे आहे. शेळ्यांच्या आरोग्य व्यवस्थापनात निष्काळजीपणा केल्यास कळपातील शेळ्यांना विविध रोगांची लागण होऊन मृत्यु संभवतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

आजारी शेळ्यांची ओळख कशी करावी -

  • शेळीची हालचाल कमी होऊन भुक मंदावते.
  • शेळी कळपा पासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करते.
  • शेळ्यांच्या लेंड्याचे प्रमाण कमी होऊन त्या अधिक घट्ट किंवा पातळ होतात.
  • शेळ्यांच्या लघवीचे प्रमाण कमी होऊन ती पिवळसर रंग येतो.
  • शेळ्यांच्या नाकपुड्या कोरड्या (Dry) पडतात.
  • पायाला जखम झाल्यास शेळी लंगडते.
  • अंगावरील केस ताठ होऊन त्याची चमक नाहीशी होते.
  • शेळ्यांचे वजन घटते
  • हेही पाहा- 

    याशिवाय शेळ्यामध्ये अनेक जीवाणुजन्य, विषाणुजन्य तसेच परजीवीमुळे होणारे आजार प्रामुख्याने दिसून येतात. त्याबद्दल माहिती घेऊया,

    अ) जीवाणुजन्य (Bacterial) आजार :

  • आंत्रविषार, घटसर्प, फऱ्या, सांसर्गिक फुफ्फुसदाह
  • ब) विषाणुजन्य (Viral) आजार :

  • निलजिव्हा, बुळकांडी (पी.पी. आर.), मावा
  • क) एकपेशीय जंतूपासुन होणारे आजार :

  • रक्तीहगवण, लाल लघवीचा आजार
  • ड) बाह्य किटकांपासून होणारे आजार :

  • खरूज
  • प्रतिबंधात्मक उपाययोजना :

  • शेळ्यांना आणि करंडांना नवीन उगवलेले ताजे गवत, पाला जास्त प्रमाणात खाऊ घालू नये. लहान करंडांना, कोकरांना गरजेपेक्षा जास्त दूध पाजु नये.
  • कळपातून बाधित शेळ्यांना इतर निरोगी शेळ्यांपासून वेगळ्या ठेवाव्यात.
  • आजाराने बाधित मृत्यु जनावरांची योग्य विल्हेवाट लावावी.
  • गोठा व आजुबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा तसेच गोठ्यात जंतूनाशक फवारणी नियमितपणे करावी.
  • साथीच्या काळात शेळ्या बाजारातुन आणु नये व आणल्यास पशुवैद्यकांकडून शेळी निरोगी असल्याची खात्री करून घ्यावी.
  • हेही पाहा-

    शेळ्यामधील विविध आजाराचे ताबडतोब पशुवैद्यकांकडून निदान करून आजारी शेळ्यांचे उपचार करून घेणे फायदेशीर ठरते. सोबतच शेळीपालकांना शेळ्यामधील साथीच्या रोगांची लक्षणे (Symptoms) आणि प्रतिबंधक उपायाची माहिती असल्यास त्यावर नियंत्रण ठेवणे सोयीचे जाते.

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

    Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

    Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

    Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

    Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

    SCROLL FOR NEXT