care of pregnant goat  Agrowon
कृषी पूरक

गाभण शेळीची काळजी कशी घ्यावी?

शेळीपालनाचा व्यवसाय करीत असताना वयानुसार आणि शारीरिक अवस्थेनुसार व्यवस्थापनात बदल करणे गरजेचे असते. योग्य व्यवस्थापनामुळे शेळ्यांची वाढ चांगली होऊन, आर्थिक फायदा होऊ शकतो.

Team Agrowon

शेळीपालनाचा व्यवसाय (goat farming) करीत असताना वयानुसार आणि शारीरिक अवस्थेनुसार व्यवस्थापनात बदल करणे गरजेचे असते. योग्य व्यवस्थापनामुळे शेळ्यांची वाढ चांगली होऊन, आर्थिक फायदा होऊ शकतो. शेळ्याचे व्यवस्थापन करीत असताना गाभण शेळ्यांचे (pregnant goat), व्यायला आलेल्या शेळ्यांचे आणि शेळी विल्यानंतर शेळीचे आणि करडू अशा विविध अवस्थेत व्यवस्थापनात बदल करावे लागतात.

शेळीपालन प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी केले जाते. त्यामुळे कळपात जितकी जास्त करडे जन्माला येतील, तितका जास्त आर्थिक फायदा होत असतो. यासाठी शेळी गाभण राहून जास्तीत जास्त करडांना जन्म दिला पाहिजे. सर्वसाधारपणे दोन वर्षात तीन वेळा शेळी व्यायली पाहिजे.

गाभण शेळ्यांची स्वतंत्र व्यवस्था करावी. त्यांना आवश्यकतेनुसार ओला, सुका चारा द्यावा. स्वच्छ, निर्जंतुक पाण्याची २४ तास सोय करून द्यावी. उन्हाळ्यात शेळ्यांना उन्हाचा त्रास होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.

गाभण शेळ्यांना दूरवर चरायला नेल्याने, शेवटच्या काळात गर्भपात, अंग बाहेर येणे अपचन याप्रकारचे आजार झाल्याचे दिसून येतात. साधारणपणे शेळी नैसर्गिकरीत्या विते. मात्र काही वेळेस पशुवैद्यकाची गरज निर्माण होऊ शकते. शेळी विण्याचा कालावधी जवळ येत असताना, पशुपालकांनी त्या प्रकारे तयारी करून ठेवावी.

शेळी विल्यानंतर ती पिल्लाला चाटून साफ करू लागते. शेळीने पिल्लास चाटल्याने करडांची रक्तभिसरण प्रक्रिया लवकर सुरु होते. शेळीने करडासचाटून साफ न केल्यास खरखरीत स्वच्छ कापडाने करडाला पुसून घ्यावे. नाका तोंडातील चिकट स्त्राव स्वच्छ करून घ्यावा. जेणेकरून वासराची श्वासोच्छ्वास प्रक्रिया त्वरित सुरु होईल. करडाचा जन्म झाल्यानंतर पुढील एक-दोन तासातच त्याला शेळीचा चिक पाजावा. नाळ स्वच्छ, निर्जंतुक ब्लेडने कापून घ्यावी. कापलेल्या भागावर टिंक्चर आयोडीन लावावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Sowing : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ३४ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी; अवकाळी पावसामुळे पेरणी रखडली

Gram Panchayat: धुळ्यातील ९७ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना नोटीस

PDKV Akola: पीडीकेव्ही–आरआयएफच्या नूतनीकृत इमारतीचे उद्‍घाटन

Gaushala MP : गोशाळेतील गायींची होणार 'ई-अटेंडस'; मध्य प्रदेश सरकार अंमलबजावणी करणार

Kharif Season 2025: अकोल्याची सुधारित ४८ पैसेवारी

SCROLL FOR NEXT