अाजार टाळण्यासाठी लसीकरणाची वेळ महत्त्वाची
अाजार टाळण्यासाठी लसीकरणाची वेळ महत्त्वाची 
कृषी पूरक

अाजार टाळण्यासाठी लसीकरणाची वेळ महत्त्वाची

डॉ. प्रशांत म्हसे, डॉ. ज्योतिका सांगळे

कोणताही रोग झाल्यावर लागणाऱ्या खर्चाच्या पटीत लसीकरणाचा खर्च नगण्यच आहे. लसीकरणासाठी लागणारा वेळ आणि पैसा खूप कमी असल्याने त्यापासून होणारा फायदा लक्षात घेता जनावरांना होणाऱ्या रोगांची लस त्या-त्या ऋतूच्या आधी करून घेणे फायदेशीरच अाहे. लसीकरण केल्यामुळे फक्त लसीकरण केलेल्या जनावरालाच नाही तर त्या जनावरांपासून मानवाला होणाऱ्या रोगासही प्रतिबंध होण्यास मदत होते. उदा. रेबीज, ब्रुसेल्ला, लेप्टोस्पायरा, रिफ्ट व्हॅली फिवर, इन्फ्लुएंझा इत्यादी.

  • लसीकरणामुळे जनावरात आढळणाऱ्या रोगांची साखळी तोडली जाऊन त्याचा प्रसार थांबवण्यास मदत होते. संबंधित रोगांपासून होणारी आर्थिक हानी तसेच कष्ट वाचतात.
  • रोगांपासून जनावरे पूर्णपणे बरी होऊनसुद्धा वर्षानुवर्षे अनेक दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. उदा. लाळ्या-खुरकूत त्यामुळे अशा सगळ्या रोगांना प्रतिबंध हाच एकमेव चांगला उपाय ठरतो. योग्य प्रतिबंधासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे.
  • प्रतिजैविकांच्या झालेल्या अतिरेकी गैरवापरामुळे प्रतिजैविकरोधी (रेसिसटंट) झालेल्या किंवा कोणतेही प्रतिजैविक वापरून नष्ट न होणारे किंवा त्यांना दाद न देणारे जिवाणू, विषाणू आज वातावरणात पसरले असताना त्यांचा नाश करणे अवघड झाले आहे.
  • बऱ्याच आजारांसाठी लागणाऱ्या लसी जवळील पशुधन विकास अधिकाऱ्यांकडून सवलतीच्या दरात मिळू शकतात; अन्यथा मोठ्या प्रमाणात लसीची आवश्यकता भासल्यास ती लस संबंधिता मार्फत किंवा स्वत: विकत आणू शकतो.
  •   गायी, म्हशींसाठी लसीकरण वेळापत्रक

    आजार    लस मात्रा   वेळापत्रक
    लाळ्या खुरकूत

    एफ.एम.डी.लस

    रक्शा एफ.एम.डी

    ५मिली

    ३ मिली 

    दर वर्षी दोन वेळा (६ महिन्यांनी)
    घटसर्प

    ॲलम प्रिसिपीटेट

    एच.एस.लस 

    ५ मिली

    ३ मिली

    प्रत्येक वर्षाला (स्थानिक जनावरांना वर्षातून दोन वेळा)
    फ-या  

    ॲलम प्रिसिपीटेट

    बी.क्यू. लस

    ५ मिली    प्रत्येक वर्षी (माॅन्सूनपूर्व )
    ब्रुसेल्लोसिस   ब्रुसेल्ला कॉटन १९ स्ट्रेन लस  ५ मिली   वर्षातून एकदा (वयाच्या चाैथ्या महिन्यात फक्त कालवडीमध्ये)
    अॅन्थ्र्यॅक्स  स्पोर व्हॅक्सीन  १ मिली     दर वर्षी
    थायेलेरियाॅसीस (गोचीड ताप)   थायेलेरिया लस  ३ मिली   दर वर्षी

    कोंबड्यांमधील लसीकरण वेळापत्रक

    रोगाचे नाव लसीचे नाव  वय  मात्रा
    मरेक्स (हॅचरीमध्ये दिली जाते)   मरेक्स लस  पहिला दिवस  ०.२ मिली मांडीच्या स्नायूत
    रानीखेत (मानमोडी)   लासोटा ५ ते १० दिवस एक थेंब नाकपुडीत किंवा डोळ्यात
    गंबोरो (IBD)    गंबोरो   ७ व्या, १८ व्या दिवशी ,२५ व्या ते ३० व्या दिवशी  लस उत्पादकाच्या सूचना पाहा
    फाऊलपॉक्स (देवी) फाऊलपॉक्स  ६ ते ८ आठवडे   लॅनसेटच्या साहाय्याने त्वचेतून
    रानीखेत (मानमोडी)    रानीखेत (आर २ वी)  ८- १० आठवडा व १६-१८ आठवडा   ०.५ मिली कातडीत

    टीप ः लसीकरण पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावे.

    संपर्क ः डॉ. प्रशांत म्हसे, ९०११४११०६६ (सूक्ष्म जीवशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cotton Seed : राज्यात कापूस बियाण्याची विक्री १६ मे पासून होणार

    Surangi Season : सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात

    Mango Export : युद्धामुळे आंबा निर्यात थंडावली

    Vitthal Rukmini Mandir : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे गाभारा संवर्धन काम महिनाअखेर पूर्ण होणार

    Strawberry Party : शाळेत रंगली ‘स्ट्रॉबेरी पार्टी’

    SCROLL FOR NEXT