प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावरावर होणारे घातक परिणाम
प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावरावर होणारे घातक परिणाम 
कृषी पूरक

प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावरावर होणारे घातक परिणाम

डॉ. कल्याणी सरप, डॉ. एस. यू. नेमाडे

प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावर चारा खात नाही व पाणी पिणे कमी होते, दुग्धोत्पादनामध्ये घट येते, जनावर चारा खात नाही व पाणी पिणे कमी होते. असे दुष्परिणाम टाळण्यासाठी जनावरांना सकस, संतुलित आहार द्यावा. जनावरांच्या सोभोवतलचा परिसर, गोठा प्लॅस्टिक मुक्त ठेवावा. मोकाट किंवा चरण्यासाठी सोडलेली जनावरे बाहेर टाकलेले अन्न प्लॅस्टिकच्या पिशवीसोबतच गिळतात, त्यामुळे जनावरे वेगवेगळ्या दुष्परिणामाला बळी पडतात. प्लॅस्टिकमुळे जनावराच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. दुग्धोत्पादन कमी होते. व्यवस्थापनामध्ये अडचणी येतात. जनावरे प्लॅस्टिक का खातात ?

  • जनावरांमध्ये प्लॅस्टिक खाण्याचे काही महत्त्वाची कारणे आहेत. हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी असणे. सकस व पौष्टिक चारा न मिळाल्याने जनवरामधील कुपोषण व खनिजांची कमतरता आढळते.
  • प्रतिकूल हवामान, जनावरे बांधण्याकरिता अपुरी व्यवस्था, जनावरे मोकट सोडणे अशा अनेक कारणामुळे जनावरे प्लॅस्टिक खातात.
  • सामान्यतः गायी व म्हशींमध्ये प्लॅस्टिक खाण्याचे प्रमाण जास्त आहे. परंतु शेळीमेंढी इतर छोटे रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये याचे प्रमाण कमी आहे तसेच रवंथ न करणाऱ्या जनावरामध्ये याचे प्रमाण आढळतच नाही.
  • परिणाम

  • प्लॅस्टिकच्या विशिष्ट गुणधर्मामुळे ते अन्ननलीकेद्वारे सहज गिळले जाते. प्लॅस्टिक हे न पचणारे न विघटन होणारे असल्यामुळे ते जनावरांनी खाल्ल्यावर सरळ कोठी पोटात जाते व तिथेच साठून राहते.
  • प्लॅस्टिक अल्प प्रमाणात कोठी पोटात असल्यास त्याचे विशेष परिणाम दिसून येत नाहीत, परंतु असे अधिक प्रमाणात प्लॅस्टिक जमा झाल्यामुळे काही दिवसांनी याचे जनावराच्या आरोग्यावर घातक परिणाम दिसून येतात, जसे जणावारंचे पोट गच्च होवून अपचन होणे. जाळी पोटातून खरे पोटात जाण्याचा अन्नाचा मार्ग बंद होणे. जठराची हालचाल मंदावते.
  • खालेल्या प्लॅस्टिकच्या पिश्व्यामुळे पोटामध्ये वेगवेगळे कप्पे तयार होऊन त्यामध्ये अन्न साठले जाते व त्या साठलेल्या अन्नावर पचनक्रिया होत नाही.
  • ओटीपोटाच्या हालचालीमुळे वरीलप्रमाणे साठलेल्या अन्नाचा मोठा गोळा तयार होतो व तो जाळी पोटातून खऱ्या पोटात जाण्याच्या मार्गावर अडथळा निर्माण करून बाधित जनावराला मृत्यू हेऊ शकतो.
  • मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पोटात जमा झाल्यामुळे पोटाची आकुंचन क्रिया मंदावते व त्यामुळे पचनक्रियासुद्धा मंदावते व पोटात वायू जमा होऊन अपचन होते.
  • जठराची गती मंदावल्यामुळे रवंथ क्रिया पूर्णपणे बंद होते. कोठीपोटाची बरीशची जागा प्लॅस्टिकने व्यापल्यामुळे कोठी पोटाला आंबविण्याच्या क्रियेकरिता जागा अपुरी पडते व आंबवण्याच्या क्रियेवर विपरीत परिणाम होतो.
  • कोठीपोटाच्या सामूमध्ये बदल होतो. परिणामी पचन क्रियेला मदत करणारे जिवाणू पोटाच्या आतील दाब वाढल्यामुळे पोट दुखायला लागते. याचा जनावरांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन त्याची भूक मंदावते.
  • जनावराने प्लॅस्टिक खाल्ल्याची लक्षणे

  • जनावर चारा खात नाही व पाणी पिणे कमी होते.
  • दुग्धोत्पादनामध्ये घट येते.
  • जठराची हालचाल तीन मिनिटाला एकापेक्षा कमी होणे.
  • शेणाचे प्रमाण कमी होणे.
  • वारंवार पोटफुगी होणे.
  • रक्ताची तपासणी केली असता रक्तावर कुठलाच परिणाम दिसून येत नाही.
  • शारीरिक तापमान, हृदयाची गती व श्‍वासाच्या गतीवर काहीच फरक पडत नाही.
  • उपचार शस्त्रक्रिया करून खाल्लेले प्लॅस्टिक जनावराच्या कोठीपोटातून बाहेर काढणे हा यावर एकमेव उपचार आहे. प्रतिबंधात्मक उपाय जनावरांच्या सोभोवतलचा परिसर, गोठा प्लॅस्टिकमुक्त ठेवावा. प्लॅस्टिकचा वापर नियंत्रित करावा व नंतर त्याची व्हिलेवाट योग्यरीत्या होईल याची काळजी घ्यावी.   संपर्क ः डॉ. कल्याणी सरप, ९०९६८७०५५० (विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन), कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Damage : कंदर भागात वादळी वाऱ्यामुळे केळी, ऊस, पपई भुईसपाट

    Sugar Industry : ‘डीएसटीए’कडून आज चर्चासत्राचे आयोजन

    Agri Tourism Festival : ग्रामसंस्कृतीतून राज्यात कृषी पर्यटनाला सुवर्णसंधी

    Cotton Variety : एका कापूस वाणाची जादा दराने विक्री

    Hailstorm : माण तालुक्यात बिजवडी, जाधववाडी परिसरात गारपीट

    SCROLL FOR NEXT