मत्स्यपालनासाठी तलावातील पाणी योग्य गुणवत्तेचे असावे.
मत्स्यशेती यशस्वी होण्यासाठी मत्स्य टाक्यांची जागा महत्त्वाची आहे. पाण्याच्या गुणवत्तेवर माशांची वाढ अवलंबून असते. पाण्याचे योग्य गुणधर्म टिकवून ठेवण्याकरिता सर्व बाबींचे योग्य व्यवस्थापन गरजेचे असते. मत्स्यशेतीमध्ये पाणी व पाण्याचे व्यवस्थापन ही एक अतिमहत्त्वाची बाब असते. मत्स्यशेतीकरिता वापरण्यात येणारे पाणी निर्जंतुक व स्वच्छ, मत्स्यव्यवसायास उपयुक्त व उत्पादक असावे. पाण्याच्या गुणधर्मानुसार मत्स्यशेतीचे तीन प्रकार होतात. मत्स्यशेतीच्या प्रकारानूसार पाण्याचे गुणधर्म/क्षारता
गोड्या पाण्यातील मत्स्यशेती - ०.१ ते ०.५निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती - ०.५ ते ३५खाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती - ३५ च्या वर गोड्या पाण्यातील मत्स्यशेती : गोड्या पाण्यात प्रामुख्याने भारतीय प्रमुख कार्प, चायनिज प्रमुख कार्प, तिलापिया, पंगस, देशी मागूर, कोळंबीचे संवर्धन केले जाते. मत्स्यशेती करताना महत्त्वाच्या बाबी ः बांधकामाची पूर्वतयारी ः
मत्स्यशेती यशस्वी होण्यासाठी मत्स्य टाक्यांची जागा महत्त्वाची आहे. मत्स्यशेतीकरिता मत्स्य टाक्यांचे खोदकाम हे तांत्रिकदृष्ट्या योग्य होणे आवश्यक असते.मत्स्यपालन प्रकल्पाचे यश हे योग्य जागेच्या निवडीवर अवलंबून असते. प्रकल्पाचा आराखडा आणि व्यवस्थापनासाठी महत्त्वाची बाब आहे.शक्यतो चिकणमाती किंवा वालुकामय चिकणमाती असावे. पाण्याचे प्रमाण टिकवण्यासाठी व बांधाकरिता वालुकामय चिकणमाती योग्य असते.वर्षभर पुरेशा प्रमाणात गोड्या पाण्याचा स्थिर पुरवठा; पाणीपुरवठा प्रदूषणमुक्त आणि पीएच ७.८ ते ८.५ असावा.प्रकल्प बाजारपेठ, रस्ते वाहतूक, रेल्वे, हवाई वाहतुकीस जवळ पडेल इतक्या अंतरावर असावा.माशांसाठी पाण्याचे गुणधर्म हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. पाण्याच्या गुणवत्तेवर माशांची वाढ अवलंबून असते.सर्वसाधारणपणे मत्स्यसंवर्धन तलावाची पाणीव्याप्त खोली १ ते १.५ मीटर असावी. यापेक्षा अधिक खोली असल्यास पाण्याचे व्यवस्थापन करण्याकरिता अडचण निर्माण होते. संवर्धन तळ्याकरिता पाण्याचे नियमित बारमाही स्रोत असल्यास पाणी व्यवस्थापन करणे सोपे होते. विहीर, कूपनलिका असल्यास पाण्याचे नियोजन सोपे जाते. सभोवताली नदी असल्यास त्याचे पाणीसुद्धा वापरता येते.पाणी प्रक्रिया आणि स्वच्छतेसाठी छोटे तलाव असल्यास व्यवस्थापन अतिउत्तम प्रकारे करता येते.पाण्यातील मूलभूत घटक, जसे- सामू, क्षारता, जडता, पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजन आणि इतर नायट्रोजीनस पदार्थ इत्यादीचे पाण्यामध्ये योग्य समायोजन असावे. इष्टतम गुणधर्म असल्यास माशांचे उत्कृष्ट आरोग्य व जलद वाढ दिसून येते.पाण्यातील घटक गुणधर्म सभोवतील पार्यावरण, पाण्यातील सेंद्रिय घटक, गाळाची माती, पाण्यातील सूक्ष्म जीव इत्यादींवर अवलंबून असतात. पाण्याचे योग्य गुणधर्म टिकवून ठेवण्याकरिता सर्व बाबींचे योग्य व्यवस्थापन गरजेचे असते.तलावातील पाणी वाढविणे आणि तलावातील पाणी कमी करण्याकरिता इनलेट दरवाजा व आउटलेट दरवाजाचा वापरावा. मत्स्य मरतुक टाळण्यासाठी उपाययोजना ः
मत्स्य तलावात शिफारशीत प्रमाणात बीज संचयन करावे.तलावात शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात मत्स्यबीज संचयन झाल्यास मत्स्य वाढीवर परिणाम होतो. उदा. हालचालीसाठी लागणारी जागा न भेटल्यामुळे वाढीवर परिणाम दिसतो.मत्स्यबीजांच्या शिफारशीत प्रमाणाच्या वर संचयन झाल्यास अनावश्यक असलेल्या रासायनिक बाबींमध्ये वाढ होऊन ऑक्सिजन कमतरता होते. विविध गॅस आणि आमोनिया वाढतो. माशांना बुरशीजन्य रोग होण्याची शक्यता असते.मत्स्यबीजांच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या संचयनामुळे बीजांना मोठ्या प्रमाणात खाद्याची आवश्यकता असते. मत्स्यखाद्याच्या सेवनामुळे त्यांची विष्ठा पाण्यातील अमोनिया आणि इतर घटक वाढून पाणी दूषित होते. पाण्याची प्रत खराब होऊन माशांना विविध आजार जडतात.दररोज माशांच्या वाढीवर नजर ठेवावी. दैनंदिन नोंदी ठेवल्यास मरतुक टाळता येते. पाण्याच्या भौतिक, रासायनिक, जैविक बाबी तपासणी करून नोंदी ठेवाव्यात. किरण वाघमारे, ९८८१६००९५१ (लेखक गडचिरोली येथे मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी आहेत.)