शरीराच्या डावीकडील वरच्या बाजूला असणाऱ्या त्रिकोणी खड्ड्यातून पोटातील वायू बाहेर काढता येतो.
शरीराच्या डावीकडील वरच्या बाजूला असणाऱ्या त्रिकोणी खड्ड्यातून पोटातील वायू बाहेर काढता येतो. 
कृषी पूरक

पोटफुगीपासून वाचवा जनावरांना

डॉ. अमोल आडभाई, डॉ. ज्ञानेश्वरी भांड

हिरव्या चाऱ्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे चाऱ्याचे पोटामध्ये पचन होत असताना तयार होणारा वायू सामान्यपणे बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे पोटफुगी होते अाणि हृदय आणि फुफ्फुसावर दाब पडतो. योग्य प्रकारे काळजी घेतल्याने पोटफुगीवर नियंत्रण मिळवता येते. रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये उदा. गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांमध्ये पोटफुगी हा सामान्यतः आढळणारा आजार आहे. हा आजार जनावरांच्या पोटात अतिप्रमाणात तयार होणाऱ्या फेसामुळे व वायूमुळे होतो. हा आजार सगळ्याच वयाच्या जनावरांमध्ये होऊ शकतो. हिरवा चारा जास्त प्रमाणात खाल्ल्याने हा आजार मोठ्या प्रमाणात होतो. या गवताच्या मोठ्या प्रमाणात आबंवण्यामुळे रुमेण (पोट) मध्ये वायुदाब वाढतो आणि पोटफुगी होते.

पोटफुगीसाठी आहारातील कारणीभूत घटक

  • द्विदल वनस्पतींचे (शेंगा इ.) अतिसेवन.
  • जनावरांना अतिप्रमाणात वाटाणे, सोयाबीन, कोबी, बटाटा इ. खायला देणे.
  • जास्त प्रमाणात हिरवा चारा खाल्ल्याने.
  • अतिप्रमाणात कोवळ्या, लुसलुशीत गवतावर चरल्याने.
  • कोवळ्या व फुले येण्याच्या अगोदर अपरिपक्व) वनस्पती खाल्ल्याने.
  • रसदार वनस्पतींचे सेवन केल्याने.
  • जास्त प्रथिने, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम असणाऱ्या चारा पिकांमुळे.
  • शिळे अन्न खाल्ल्याने.
  • तंतुमय अन्नाचे आहारात कमी प्रमाण.
  • पोटातील द्रवाचा पी. एच. कमी झाल्याने.
  • अन्य कारणे

  • अन्ननलिकेमध्ये तयार होणारा तांत्रिक अडथळा.
  • अन्ननलिका व रुमेन (जनावरांचे पोट) यांची होणारी सूज.
  • अन्ननलिका अरुंद होणे.
  • अन्ननलिकेवर बाहेरच्या बाजूने येणारा दाब.
  • डायफ्रॅगमॅटिक हर्निया, टी. आर. पी., इ सारख्या आजारामुळे.
  • लक्षणे

  • भूक मंदावते व हळूहळू जनावर चारा खाणे बंद करते.
  • पोट सर्व बाजूने फुगते. जास्त करून डावीकडील वरच्या बाजूला पोट जास्त फुगलेले दिसते.
  • जनावर पोटाला लाथ मारते, पोटाकडे सतत पाहते व जमिनीवर लोळते.
  • नियमितपणे श्वास घेता येत नाही व जनावर लाळ गाळते.
  • जीभ व डोळे बाहेर येतात.
  • हृदयाचे ठोके वाढतात.
  • सतत तोंड चालू असते व दात दातांना घासतात.
  • पोटाच्या डावीकडील वरच्या बाजूला तडतडल्यासारखा आवाज ऐकायला येतो.
  • रुमेनमधील द्रवाचा आम्लपणा वाढतो.
  • पोटातील अन्न बाहेर काढतात.
  • डाव्या बाजूने पोट सफरचंदाच्या आकाराचे व उजव्या बाजूने पेअर फळाच्या आकाराचे दिसते.
  • उपाययोजना

  • वरील लक्षणे आढळून आल्यास त्वरित जवळील पशुवैद्यकाशी संपर्क साधावा.
  • पोटफुगी झाल्यानंतर अन्न व पाणी खायला देऊ नये.
  • मागचा भाग खाली अाणि पुढचा भाग वर राहील, अशा पद्धतीने जनावराला उभे करावे. जेणेकरून छातीच्या पडद्यावर ताण येणार नाही.
  • तातडीच्या उपाययोजना
  • शरीराच्या डावीकडील वरच्या बाजूला असणाऱ्या त्रिकोणी खड्ड्यामध्ये मोठ्या सुईने छिद्र पाडावे व पोटातील वायू हळूहळू बाहेर पडू द्यावा.
  • स्टमक ट्यूब तोंडावाटे पोटामध्ये घालावी जेणेकरून पोटातील वायू नळीवाटे बाहेर पडेल. तसेच अन्ननलिकेत काही अडथळा असल्यास तोही निघून जाईल.
  • टीप ः वरिल सवर् उपाययोजना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने कराव्यात.
  • पोटफुगीपासून बचाव

  • हिरवा चारा खाऊ घालण्यापूर्वी कोरडा चारा खाऊ घालावा.
  • १:१ या प्रमाणात गवत व द्विदल वनस्पती खाऊ घालाव्या किंवा सकाळी शेंगा येणाऱ्या वनस्पती व रात्री गवत खाऊ घालावे.
  • रोजच्या आहारात किमान १०-१५ टक्के धान्याचा कोंडा असावा.
  • जनावरांना लुसलुशीत गवत जास्त खायला देऊ नये.
  • संपर्क ः डॉ. अमोल आडभाई, ८८०५६६०९४३ (राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरियाणा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

    Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

    Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

    Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

    Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

    SCROLL FOR NEXT