प्रजनन व्यवस्थापनामध्ये अल्ट्रासोनोग्राफी मशिनचा वापर फायदेशीर अाहे.
प्रजनन व्यवस्थापनामध्ये अल्ट्रासोनोग्राफी मशिनचा वापर फायदेशीर अाहे. 
कृषी पूरक

आधुनिक म्हैसपालनाकरिता लागणारी उपकरणे

डॉ. एम. व्ही. इंगवले

आधुनिक म्हैसपालनामध्ये नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास मनुष्यबळाची बचत होऊन, व्यवस्थापन, आरोग्य चांगले राहते. यामुळे म्हैसपालन व्यवसाय फायदेशीर राहण्यास मदत होते.   म्हैसपालन हा व्यवसाय आधुनिक किंवा शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करून केल्यास व्यवसाय फायदेशीर होण्यास मदत होते. आधुनिक म्हैसपालनामध्ये रोगांचे किंवा विविध आजारांचे अचूक निदान, कमी मनुष्यबळाचा वापर, यांत्रिकीकरणाचा अधिक वापर यासाठी लागणारी उपकरणे यांचा वापर केल्यास व्यवस्थापन चांगले होते. १) अल्ट्रासोनोग्राफी मशिन

  • पशुवैद्यक क्षेत्रामध्ये अल्ट्रासोनोग्राफीचा वापर सन १९८० पासून सुरू झाला. सद्यःस्थितीत विविध आकाराचे, वजनाच्या अल्ट्रासोनोग्राफी मशिन उपलब्ध आहेत.
  • अल्ट्रासोनोग्राफी मशिनचा सर्वांत जास्त फायदा प्रजनन व्यवस्थापनामध्ये होतो. आजही जास्त म्हशी असणाऱ्या गोठ्यामध्ये मशिनचा वापर होत आहे.
  • मशिनची किंमत दहा लाखांपासून पुढे असून, यामध्ये वापरण्याची पद्धत सोपी व सुलभ असून, विविध अवस्थांचे तत्काळ निदान होते व सुयोग्य उपचार होतो.
  • फायदे ः

  • अल्ट्रासोनोग्राफीद्वारे म्हशीच्या रेतनानंतर ३५ दिवसानंतर गाभण आहे किंवा नाही याचे निदान होते. मशिनद्वारे सरासरी एक ते दोन महिने अगोदर गर्भधारणेचे निदान होते यामुळे गाभण नसलेल्या म्हशींना उपचार करता येतात किंवा माजाचे निदान करता येते.
  • ३५ व्या दिवशी गर्भधारणेच्या निदानामुळे ४२ दिवसांनी (दुसरा) येणाऱ्या माजावर बारकाईने लक्ष्य देता येते किंवा यानंतर सुयोग्य उपचार करून म्हशी माजावर आणता येतात.
  • गर्भाशयाच्या आजाराचे सुयोग्य निदान होते. यामध्ये गर्भाशयामध्ये पाणी, पू साचणे, मृत वासराची वाढ थांबणे, गर्भाशयाचे व्यंग होते.
  • म्हशी माजावर येण्याकरिता बीजांडावर स्त्रीबीजनिर्मिती व वाढ होणे गरजेचे असते. मशिनद्वारे स्त्रीबीजाची संख्या, आकारमान यांचे अचूक निदान होते. यामुळे म्हशी केव्हा माजावर येणार याची माहिती होते.
  • बीजांडाचे आजार असणे इ. मुळे म्हशी माजावर येत नाहीत. याचेही निदान करता येते.
  • सद्यःस्थितीत वजनाने हलक्‍या व आकारमानाने लहान (१ किलो) मशिन उपलब्ध झाल्या आहेत. तसेच बॅटरीवर दोन ते तीन दिवस चालतात.
  • वरील सर्व नमूद फायद्यांमुळे प्रजनन व्यवस्थापन करणे अत्यंत सुलभ होते व यामुळे १४ ते १५ महिन्यांत एक रेडकू प्राप्त होण्यास मदत होते. उत्तम वंशावळीच्या म्हशीपासून जास्तीत जास्त वेते व दुग्धोत्पादन मिळण्यास मदत होते.
  • २) दूध काढण्याचे यंत्र सध्या बाजारामध्ये दूध काढण्याचे यंत्र उपलब्ध असून हे वीज, इंजिन व पायाने चालवता येणाऱ्या पद्धतीनेसुद्धा वापरता येते. दूध काढण्याच्या मशिनचा वापर केल्यास कमी वेळात जास्त म्हशीचे दूध काढले जाते मजुरांवरील अवलंबित्व कमी होते. दूध काढण्याच्या मशिनची किंमत सरासरी ४०,००० इतकी असून, एकाच वेळेस दोन म्हशींच्या दूध काढण्याच्या मशिनची किंमत जास्त आहे. फायदे ः

  • सरासरी पाच ते दहा मिनिटांत एका म्हशीचे दूध काढता येते.
  • कासेमध्ये दूध राहत नाही यामुळे कासदाहाचे प्रमाण कमी होते.
  • कासेतील संपूर्ण दूध निघते यामुळे फॅट सुयोग्य लागते.
  • वीज उपलब्ध नसल्यास इंजिन किंवा पायाच्या पॅडलद्वारे मशिनचा वापर होतो.
  • मजुरांची बचत होते व कमी वेळेत जास्त म्हशीचे दूध काढणे शक्‍य होते.
  • ठराविक माणसांनी किंवा इंजेक्‍शन देऊन दूध काढण्याच्या पद्धतीला आळा बसतो.
  • आधुनिक म्हैसपालनामध्ये दूध काढण्याकरिता मशिनचा वापर केल्यास अधिकचे फायदे मिळतात.
  • ३) प्रत्येक म्हशीची संगणकाद्वारे नोंदणी प्रणाली

  • म्हशीच्या पैदाशीमध्ये म्हशीच्या दूध उत्पादन, प्रजनन व इतर माहिती एकत्रितरीत्या नोंदवणे हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक म्हशीची गुणवत्ता ओळखण्यासाठी ही एक उत्तम पद्धत आहे.
  • म्हशीच्या कानात ओळख क्रमांक तेथून मोबाईल किंवा संगणकाच्या साह्याने सर्व माहिती नोंदवता येते, सोबतच अशा प्रणालीचा वापर केल्यास उत्पादन, प्रजनन, लसीकरण, म्हैस आटवणे इ. बाबीची माहिती मिळते यामुळे प्रत्येक म्हशीची अलर्ट माहिती मिळून व्यवस्थापन व पैदास सुलभ होते.
  • सदर नोंदीचे विश्‍लेषण करून माहिती म्हैसपालकांना मिळते. यामुळे तोटा कमी होतो. मोठ्या प्रमाणावर नोंदी उपलब्ध होतात. उत्पादक म्हशी ओळखता येऊन उत्तम प्रजनन व पैदास धोरण राबवता येते. संगणक प्रणालीचे सॉफ्टवेअर उपलब्ध असून, याचा वापर मोठ्या म्हशीच्या गोठ्यामध्ये होणे गरजेचे आहे. संपर्क ः डॉ. एम. व्ही. इंगवले, ९४०५३७२१४२ (स्नातकोतर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT