breeding management in cows and buffaloes 
कृषी पूरक

गाई, म्हशीतील माज ओळखा

गाई, म्हशींचा माज ओळखणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे. गाय, म्हैस जर सकाळी माजावर आली तर त्याच दिवशी संध्याकाळी कृत्रिम रेतन करतात किंवा संध्याकाळी आढळल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी रेतन करावे.

डॉ. अमित शर्मा

गाई, म्हशींचा माज ओळखणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे. गाय, म्हैस जर सकाळी माजावर आली तर त्याच दिवशी संध्याकाळी कृत्रिम रेतन करतात किंवा संध्याकाळी आढळल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी रेतन करावे. दुधाळ जनावरांना माजावर येण्यास २१ दिवसांचा कालावधी लागतो, म्हणून माज ओळखू न आल्यास पुढील २१ दिवसांचा आर्थिकदृष्ट्या तोटा होतो, जो साधारणपणे ५६०१ रुपये ते ७७२८ रुपये इतका आहे. गाय, म्हैस वारंवार उलटल्यामुळे अनिश्‍चित काळासाठी गर्भधारणा होत नाही.

  • बऱ्याच जनावरांमध्ये माजाची नीट लक्षणे दिसत नाहीत. माजाचा कालावधी कमी असतो. गाई, म्हशींमध्ये माजावर येण्याचे प्रमाण दिवसाच्या तुलनेत रात्री अधिक असते, त्यामुळे जनावरांचा माज ओळखण्यात चूक होते.
  • माज येण्याची सुरवात हळूहळू असते. जनावर माजावर येताना त्यांच्या वर्तणुकीत होणारा बदल, त्याची तीव्रता हे पशुपालकांनी समजून घ्यावी.
  • प्राथमिक लक्षणांमध्ये सैरावैरा धावणे आणि दुय्यम लक्षणामध्ये बाह्य जननेंद्रियामधून स्राव, इतर जनावरांसोबत टक्कर देणे, वारंवार लघवी करणे, हंबरणे, लोळणे, अस्वस्थता, बाह्य जननेंद्रियामध्ये सूज दिसणे, पाठ घासणे, दूध उत्पन्न कमी होणे आणि कमी आहार घेणे ही लक्षणे दिसतात.
  • माज ओळखण्यासाठी सकाळी (५ ते ७ ) आणि संध्याकाळी (८ ते १०) योग्य वेळ मानला जातो. यामध्ये किमान अर्धा तास काळजीपूर्वक निरीक्षण करून जनावरातील माज ओळखता येतो.
  • माज ओळखण्याच्या पद्धती निरीक्षण पद्धती

  • दोन वेळेस ३० मिनिटे सकाळी आणि संध्याकाळी असे चार वेळा नियमितपणे गाई व म्हशीचे निरीक्षण करण्यात येते. या पद्धतीने माज ओळखण्याची क्षमता ८० ते ९० टक्के नोंदवली गेली आहे.
  • या पद्धतीची कार्यक्षमता साध्य करण्यासाठी सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा अशा प्रकारे जनावरांचे निरीक्षण करावे.
  • गाईच्या तुलनेत म्हशीमध्ये माजाची लक्षणे स्पष्ट दिसत नाहीत. यासाठी कुशल कामगार असणे आवश्यक आहे. पक्का माज किंवा खडा माज म्हणजे जेव्हा गाईवर किंवा म्हशीवर वळू अथवा कळपातील इतर गाई, म्हशी पाठीमागून चढण्याचा प्रयत्न करत असताना ती गाय किंवा म्हैस स्थिर उभी राहाते. असे आढळून आल्यास जनावराचे नैसर्गिक किवा कृत्रिम रेतन करावे, जेणेकरून गाभण राहण्याची शक्यता जास्त राहील.
  • जननेंद्रियाची तपासणी 

  • कुशल आणि तांत्रिकदृष्ट्या अनुभवी पशुतज्ज्ञांकडून गाय, म्हशीच्या प्रजोत्पादन अवयवांमधील बदल तपासून घेतल्यास माजाची ओळख पटू शकते.
  • पशुतज्ज्ञ गर्भाशय व अंडाशयामध्ये होणारे बदल शास्त्रोक्त पद्धतीने तपासतो. त्याच्या सल्ल्याने गाई, म्हशीचे रेतन करावे.
  • नोंदी 

  • नोंदीद्वारे पुढील माज व विण्याची तारीख अचूक बघता येते. प्रजनन काळाविषयी माहिती देणारा गोलाकार तक्ता असल्यास नोंद ठेवणे सोयीस्कर होते.
  • आधुनिक पद्धती, जसे की 'Breeding Wheel' किंवा 'Herdex record system' मध्ये संगणकाद्वारे नोंद ठेवली जाते. या आधुनिक पद्धतीमुळे रोजच्या रोज किती आणि कोणते जनावर माजावर येणार याची पूर्वकल्पना येते.
  • व्हिडिओ कॅमेरे आणि रेकॉर्डिंग

  • मोठ्या कळपातील गाई व म्हशींवर सतत पाळत ठेवण्यासाठी व्हिडिओ कॅमेऱ्याचा वापर केला जातो.
  • यामुळे जनावराच्या माजावर लक्ष राहतेच, त्याचबरोबर आजारी जनावरावर नजर ठेवणे सोयीस्कर होते.
  • नसबंदी केलेला वळूचा वापर नसबंदी केलेला वळू जर कळपात असेल तर तो माजावर आलेल्या गाई, म्हशीला अचूकरीत्या ओळखू शकतो. वापरण्यात येणारा वळू लसीकरण केलेला असावा. दूध, रक्तातील प्रोजेस्टेरॉनची चाचणी 

  • या पद्धतीमध्ये दूध व रक्तातील प्रोजेस्टेरॉन संप्रेरकाचे प्रमाण मोजून माजाचे निरीक्षण ठेवून नोंद करता येते.
  • माज नसतानाच्या काळात दुधातील प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण १० नॅनोग्रॅम/मिली लिटर तर रक्तातील प्रमाण ७ नॅनोग्रॅम/मिली लिटरपेक्षा जास्त असते, तर माजाच्या काळात दुधातील हे प्रमाण ३ नॅनोग्रॅम / मिली लिटर आणि रक्तातील प्रमाण ०.५ नॅनोग्रॅम/मिली लिटरपेक्षा कमी झालेले आढळून येते.
  • प्रोजेस्टेरॉन चाचणी वरून माजावर निरीक्षण राहाते. शिवाय जनावर गाभण आहे की नाही हेसुद्धा समजते.
  • माजाच्या लक्षणांवर प्रभाव टाकणारे घटक 

  • गोठ्याची निर्माण प्रणाली व पृष्ठभाग
  • गाई, महशींच्या पायाच्या समस्या
  • गोठ्यातील जनावरांची संख्या व स्थिती
  • आहार व पौष्टिक घटक
  • संप्रेरकाचे असंतुलन
  • वातावरणीय तापमान
  • दिवसाचा कालावधी
  • वय, वजन आणि कळपातील इतर प्राण्यांची आपापसातील सामाजिक बांधिलकी
  • पायाभूत सुविधाची उपलब्धता, कुशल कामगारांचा अभाव
  • संपर्क- डॉ. अमित शर्मा, ९६७३९९८१७६ (पशुआहारतज्ज्ञ)

    महाराष्ट्र

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

    Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

    Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

    Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

    Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

    SCROLL FOR NEXT