शीतकरण पद्धतीने चिकनची साठवणूक
शीतकरण पद्धतीने चिकनची साठवणूक 
कृषी पूरक

चिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियम

डॉ. रुपेश वाघमारे

चिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी अन्नसुरक्षा आणि मानक कायदा २००६ मधील भाग १ आणि भाग ४ व अनुसूची ४ मधील मूलभूत स्वच्छता व अन्न सुरक्षितता यांची पूर्ण अंमलबजावणी करणे गरजेचे असते. दुकानातील प्रत्येक कर्मचाऱ्याची अधिकृत नोंदणीधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दरवर्षी वैद्यकीय तपासणी करावी. 

अन्नसुरक्षा आणि मानक कायद्यानुसार किरकोळ चिकन आणि मांस विक्रीच्या दुकानासाठी स्वच्छताविषयक काही नियम आहेत.  या नियमानुसार किरकोळ चिकन, मांस विक्रेत्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका यांनी नेमलेल्या अन्नसुरक्षा अधिकाऱ्याकडून किंवा राज्य अन्नसुरक्षा आयुक्त यांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांकडून मांस विक्रीचा परवाना घ्यावा लागतो.  सर्व चिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी अन्नसुरक्षा आणि मानक कायदा २००६ मधील भाग १ आणि भाग ४ व अनुसूची ४ मधील मूलभूत स्वच्छता व अन्न सुरक्षितता यांची पूर्ण अंमलबजावणी करणे गरजेचे असते. तसेच स्थानिक प्रशासनाने केलेल्या वेगवेगळ्या नियमांचेसुद्धा अनुपालन करणे आवश्‍यक आहे.

अन्नसुरक्षा कायदा २००६ अनुसूची-४ नुसार नियमावली ः  दुकानाची जागा

  • चिकन, मांस विक्रीचे दुकान शक्‍यतो भाजीपाला व मंडई यांच्यापासून दूर असावे. दुकानांच्या आसपास उग्रवास, धूळ, धूर यांचा प्रादुर्भाव नसावा.
  •  दुकान ही कोणत्याही धार्मिक स्थळापासून साधारणपणे ५० मीटर लांब असावे. धार्मिक स्थळाच्या जवळपास असणाऱ्या सर्व मांस विक्री दुकानांना काळ्या काचेचे दरवाजे लावण्यात यावेत, जे येण्या-जाण्याच्या वेळेव्यतिरिक्त बंद राहतील.
  • दुकानांच्या आत, समोरील तसेच लगतची जागा स्वच्छ राखणे ही मालकाची जबाबदारी असेल.
  • दुकानांचा आकार, व्यवसायाचे स्वरूप, विक्रीसोबतच होणारे इतर कार्य आणि निवासिक क्षेत्रात व्यावसायिक जागेची उपलब्धता, संबंधित स्थानिक प्रशासन या कारणांमुळे बदलतो. दुकानांची उंची ही ३ मीटर तर वातानुकूलित दुकानात २.५ मीटरच्या कमी नसावी.
  • परिसर

  • परिसराची रचना चांगली असावी. जमिनीपासून किमान ५ फूट उंचीपर्यंत ज्यातून पाणी इत्यादी जाऊ शकणार नाही, अशी कॉंक्रीटची भिंत असावी. त्यासाठी योग्य फरशी किंवा तावदान लावता येईल. जेणेकरून स्वच्छता करणे सुलभ होते.
  •  घाण, कचरा, अशुद्ध पाणी इत्यादी काढून टाकण्यासाठी जमीन ही योग्य उतार असलेली असावी. जमिनीचा उतार हा ३ मीटरसाठी ५ सेंमीपेक्षा कमी नसावा. सर्व बांधकाम न गंजणारे असावे.
  •  टेबल, रॅक, कपाट यावर जस्त, ॲल्युमिनिअम किंवा स्टेनलेस स्टील, संगमरवर यांचा थर असावा. 
  •  चिकन,मांसाचा प्रकार दाखवणारा फलक योग्यरीत्या लावावा. मांस विक्रीशिवाय परिसरात इतर काही विकू नये.
  •  सांडपाणी वाहून नेण्यासाठी व्यवस्था असावी.
  •  परिसरात पिण्याच्या पाण्याचा सतत पुरवठा असावा. कूपनलिकेमधून पाणीपुरवठा होत असेल तर पाणी शुद्धीकरणाची व्यवस्था करावी. पाणी साठवणूक करण्यात यावी.
  •  दुकानाचा दरवाजा स्वतःच बंद होणारा असावा. तसेच काचेवर गडद रंगाचा थर द्यावा. दार कामाव्यतिरिक्त बंद ठेवावे. बाहेरील लोकांना आतील मांस दिसता कामा नये.
  • वायुवीजन

  • दुकानात हवा खेळती असावी. किमान एक फॅन व एक बाहेर हवा फेकणारा फॅन (बहिर्मुखी पंखा) लावण्यात यावा.
  •  मांस लटकविण्यासाठी हूक इत्यादी वापर होत असेल तर ते न गंजणाऱ्या वस्तूंपासून बनवलेले असावे.
  •  कत्तल केलेल्या प्राण्यांचा आकार आणि मासांनुसार हे हूक ३० सेंमी व दोन रेलमधील अंतर हे ६० ते ७० सेंमी असावे.
  • साधनसामग्री आणि उपकरणे 

  • दुकानात माशांच्या प्रतिबंधासाठी योग्य उपाययोजना असावी. यासाठी पडदे किंवा जाळ्या कराव्यात. आतमधील वस्तू दिसतील असे फ्रिज दुकानात असावेत. ज्यामध्ये मांस ४ ते ८ अंश सेल्सिअस तापमानाला राखता येईल. ४८ तासांपेक्षा जास्त काळासाठी मांस, चिकन ठेवायचे झाल्यास फ्रिझरचा वापर करावा. 
  • वजनाची मापे, अनावश्‍यक हाताळणी आणि दुषितता कमी होणारी असावी. त्यांना स्टेनिस स्टील किंवा निकेलचा लेप असावा.
  • सुरे, अवजारे, आकडे (हूक) स्टेनलेस स्टीलचे असावे. परिसर आणि उपकरणे धुण्यासाठी किमान ८२ अंश तापमानापर्यंत गरम पाणी करणारा गिझर दुकानात असावा. स्टेनलेस स्टील किंवा पोर्सेलिनची वॉश बेसिन आणि साबण इत्यादी व नखे साफ करणारा ब्रश उपलब्ध असावेत.
  •    चिकन, मांस कापण्याचा ठोकळा किंवा फळी ही कृत्रिम वस्तूची असावी. जेणेकरून मांस दूषित होणार नाही. लाकडी ठोकळा असेल तर तो टणक, कठीण खोडाचा असावा. 
  •    कचरा जमा करण्यासाठी पायाने उघडझाप करता येणारी कचरा पेटी असावी.
  • - डॉ. रुपेश वाघमारे, ९७६६९४०९५४ (सहायक प्राध्यापक, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

    Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

    Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

    Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    SCROLL FOR NEXT