अकोले तालुक्यातील (जि. नगर) कळसूबाई- हरिश्चंद्रगड परिसरात लोकपंचायत संस्था महाराष्ट्र जनुक कोश कार्यक्रमाच्या माध्यमातून डांगी गोवंशाच्या संवर्धनावर काम करत आहे. डांगी जतन करणाऱ्या समूहांसोबतचा लोकसंवाद व अभ्यासासोबतून डांगी गोवंशासंबंधी समोर आलेल्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आजच्या लेखात देत आहोत.
स्थानिक लोक डांगीचे रंगसंगतीनुसार नऊ प्रकार सांगतात. बैलामध्ये बहाळा, वानेरा, खैरा, मन्यारा, तांबडा, पारा, गवळा, काळा असे प्रकार दिसतात. त्यापैकी बहाळा म्हणजे पांढऱ्या रंगावर मोठे काळे ठिपके असणारा बैल किंवा गोऱ्हा याला बाजारात सर्वाधिक मागणी आणि किंमत असते. गायींमध्ये मसुरी रंग हा महत्त्वाचा मानतात. मसुरी म्हणजे पांढऱ्या रंगावर अगदी लहान लहान काळे ठिपके. या व्यतिरिक्त किमान अर्धा फूट रुंद कपाळ, मोठे वशिंड, लांब शेप, मजबूत पाय, चपळ व तरतरीतपणा, आखूड बेंबी इ. लक्षणे तपासूनच जातीची निवड होते. या बाह्यरूपावरून निवड केल्या जाणाऱ्या बैलांमध्ये खरोखरच गुणात्मक फरक असतो का? एखादा वर्ण जास्त लोकप्रिय असल्यामुळे त्या बैलाचे भरण- पोषण जास्त केले जाते, परिणामत: त्यांची गुणात्मकता वाढते का? अशा प्रश्नांवर संशोधन करण्यास वाव आहे.
डांगी गाय आणि दुधाचे अर्थकारण
डांगी पालनात वापरल्या जाणाऱ्या वनौषधी
जनावरांना होणारे आजार फऱ्या : हा आजार अशक्त जनावरांना पावसाळ्याच्या सुरवातीला होतो. खूप ताप येणे, पाय व मांसल भागाला सूज येणे, फुटलेल्या जखमेतून काळसर पाणी येणे, ही फऱ्या आजाराची लक्षणे आहेत. लाळ्या खुरकूत : हा संसर्गजन्य आजार आहे. हवामान बदलामुळे हिवाळा व उन्हाळ्यापूर्वी होतो. तोंडातून चिकट लाळ गळणे, नाक, जीभ, हिरड्या व कासेवर पांढरे फोड येतात. खुरांमध्ये जखमा होतात. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो. बुळकांडी : पावसाळ्याच्या दिवसात चारा व पाणी याद्वारे बुळकांडी आजाराचा प्रादुर्भाव होतो. ताप येणे, पातळ रक्त मिश्रित जुलाब होणे, नाक-तोंडातून घाण येणे, प्रकाश सहन न होणे, ही आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. फाशी : अती पाऊस व दुष्काळजन्य परिस्थितीत हा आजार होतो. खूप ताप येणे, श्वसनाला त्रास होणे, थरथर कापणे, तोल जाणे, जनावर मेल्यावर नाकातोंडातून रक्त येणे, ही फाशीची लक्षणे. हा आजार माणसालाही होऊ शकतो. वरील आजाराबरोबर सर्पदंश व श्वान दंश यामुळे जनावरांच्या जीविताला धोका निर्माण होतो. यापैकी बहुतांशी आजारावर रोगप्रतिबंधक लसीकरण उपलब्ध आहेत.
बहुविध चारा खाणारा गोवंश लोकपंचायतच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पशुपालक व वनस्पती तज्ज्ञ जुई पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या जंगली चाऱ्याच्या अभ्यासातून या परिसरातील सुमारे २१३ पेक्षा अधिक वनस्पतीची नोंद झाली. त्यातील ५३ प्रकारच्या वनस्पती चारा म्हणून डांगी गोवंश खातात. डांगी पालकांच्या दृष्टिकोनातून सामरट (Cacia torta), भालवंड (Meytenus rothiana), कारवीची बोंड (Carvia callosa), हुडा बांबू (Oxytenanthera monostigma) हे जलद पोषण देणारी चारा पिके आहेत. डांगी गाय रानातला विविध औषधी चारा खात असल्यामुळे तिच्या दुधातही औषधी तत्त्वे असल्याचे अनेकजण मानतात.
गोवंश संवर्धनाची दिशा
- विजय सांबरे : ०९४२१३२९९४४ (लेखक लोकपंचायत संस्था, संगमनेर, जि. नगर येथे कार्यरत आहेत)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.