poultry bird
poultry bird 
कृषी पूरक

परसबागेमध्ये वनराजा कोंबडीपालन

दिपरत्न सूर्यवंशी, श्रीमती सारिका नारळे

मुक्तपद्धत, अर्धबंदिस्त पद्धत आणि, बंदिस्त पद्धतीने कुक्कुटपालन करता येते.  व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून देशी किंवा गावरान कोंबड्यांचे संवर्धन, व्यवस्थापन केल्यास चांगला पूरक उद्योग तयार होतो.

  वैशिष्टे 

  •  वनराजा कोंबड्यांची शारीरिक वैशिष्ट्ये म्हणजे बहुरंगी पिसारा, कानात पाळी व तुरा लाल, पाय पिवळसर असतात.
  • उत्तम रोगप्रतिकारक शक्ती आहे. कुठल्याही वातावरणात तग धरू शकणारी, जास्तीत जास्त परसातील उपलब्ध असलेल्या खाद्यावर आपली गुजराण करणारी, त्यामुळे कमीत कमी खर्चात संगोपन करता येणारी जात.
  • कोंबडी वर्षाकाठी १६० ते १८० अंडी देते. अंडी मोठ्या आकाराची व जास्त वजनाची तपकिरी रंगाची असतात. 
  • पूर्ण वाढ झालेल्या नर पक्षाचे वजन २ ते ३ किलो व मादीचे वजन २ ते २.५ किलोपर्यंत असते.  अंडी व चवदार मांस यामुळे बाजारात चांगला दर मिळतो. 
  • व्यवस्थापन

  • योग्य प्रकारे व्यवस्थापन व संगोपन यामुळे कोंबडीची मरतूक होण्याचे प्रमाण कमी होते. तसेच मांस व अंडी उत्पादनात वाढ होते. 
  • पिल्ले शेडवर येण्याच्या एक आठवड्यापूर्वी पूर्ण तयार करावी. शेडची स्वच्छता करावी. जंतुनाशकाची फवारणी करावी.
  • निर्जंतुकीकरण केल्यानंतर शेडमध्ये  भाताचे तूस २-३ इंच जाडीचे पसरावे. 
  • पिल्लांना पहिले चार दिवस पाण्यातून जीवनसत्त्वे आणि प्रतिजैविके द्यावीत. 
  •  चार आठवडे वयाच्या कोंबड्या परसात किंवा मोकळ्या जागेत सोडाव्यात. त्यांचे खाद्य, पाण्याची सोय करावी.
  • सुरुवातीच्या काळात कोंबड्यांना संध्याकाळी आसऱ्यासाठी पिंजऱ्यापर्यंत येण्याची सवय लावावी.पिंजऱ्यामध्ये आवश्यक इतका प्रकाश, निरोगी हवा उपलब्ध असावी. 
  • कोंबड्यांना वेळोवेळी जंतनाशक औषध पाण्यातून द्यावे.
  • खाद्य व पिण्याच्या पाण्याचे भांडे वेळोवेळी जंतुनाशकाने धुऊन घ्यावे.
  • कोंबड्यांचा आहार

  • खाद्य बनविताना स्थानिक धान्यांचा वापर करावा. (उदा. बाजरी, ज्वारी, गहू कोंडा, मका, तांदूळ कोंडा, सूर्यफूल व शेंगदाणा पेंड, क्षार मिश्रणे, शिंपला पूड).
  • परसबागेत कोंबड्यांना खाद्यासाठी निरुपयोगी धान्य, गवत, कीटक, गवत बिया उपयोगी ठरतात. 
  • अंड्यावरील कोंबड्यांना खाद्यामध्ये कॅल्शिअम, क्षार यांचे मिश्रण करून देणे आवश्यक आहे. गरजेनुसार शिंपला पूड खाद्यात मिसळून द्यावी. याच्या कमतरतेमुळे कोंबड्या पातळ कवचाची अंडी देतात. 
  •  मांस उत्पादनासाठी वाढविले जाणाऱ्या कोंबड्यांना ब्रॉयलर स्ट्रार्टर मॅश व नंतर फिनीशर मॅश द्यावे.
  • अंडी उत्पादनासाठी वाढविले जाणाऱ्या कोंबड्यांना चीक मॅश, ग्रोवर मॅश खाद्य द्यावे.
  • शिफारशीनुसार लसीकरण करावे.
  • अंड्यातील घटक

  • अंडी शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. 
  • अंड्याच्या बलकापासून जीवनसत्त्वे, क्षार, लोह इ. घटक मिळतात.   
  •  अंड्याच्या बलकातील कोलीन हा घटक बौद्धिक विकासास उपयुक्त ठरतो. 
  • अंड्यातील बलक डोळे निरोगी राखण्याबरोबर स्नायूची झीज रोखण्यास उपयुक्त आहे. 
  • अंड्यापासून हाडाची मजबुती, तजेलदार त्वचा, शरीराची वाढ, निरोगी डोळे, चेतापेशींना संरक्षण मिळते. 
  •  अंड्यातून फॉस्फेट, लोह, कॅल्शिअम, सोडिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम इ. पोषण मूल्ये मिळतात. उकडलेले अंडे लवकर पचते.
  • चिकनचे महत्त्व

  • चिकन मधून भरपूर प्रमाणात प्रथिने मिळतात. मांसपेशी वाढवण्यासाठी मदत होते. यामध्ये जस्त असते. त्यामुळे भूक वाढीसाठी मदत होते. यामध्ये खूप प्रमाणात अमायनो अॅसिड असल्यामुळे लहान मुलांची उंची वाढीसाठी मदत होते.
  • फॉस्फरस व कॅल्शिअम असते त्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते. 
  • रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मांसामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खनिजे असतात.
  •   - दिपरत्न सूर्यवंशी, ९४२१६९४९६४ (अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

    Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

    Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

    Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

    Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

    SCROLL FOR NEXT