cattle feeding 
कृषी पूरक

थंडीमध्ये द्या जनावरांना पोषक आहार

हिवाळ्यात जनावरांना शारीरिक तापमान संतुलित ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात ऊर्जा खर्च होत असल्याने, जनावरांना जास्त ऊर्जा मिळेल असे खाद्य द्यावे. जनावरांच्या खाद्यामध्ये खनिज मिश्रणाचा समावेश करावा.

प्रणिता सहाणे

हिवाळ्यात जनावरांना शारीरिक तापमान संतुलित ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात ऊर्जा खर्च होत असल्याने, जनावरांना जास्त ऊर्जा मिळेल असे खाद्य द्यावे. जनावरांच्या खाद्यामध्ये खनिज मिश्रणाचा समावेश करावा.

उन्हाळा, हिवाळा, पावसाळा अशा प्रत्येक ऋतूमध्ये जनावरांच्या समस्या वेगवेगळ्या असतात.  हिवाळ्यातील थंड हवामानाचे विपरीत परिणाम जनावरांच्या शरीरावर दिसून येतात. हे टाळण्यासाठी हवामानानुसार जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये बदल करणे गरजेचे असते. अति थंडीचा जनावरांच्या शरीरावर आणि पर्यायाने दूध उत्पादनातही अनिष्ट परिणाम दिसून येतो. त्यामुळे जनावराची थंडीच्या काळात काळजी घेणे गरजेचे आहे. अतिथंडीमुळे जनावरांवर होणारे दुष्परिणाम 

  • गाई,म्हशी हिवाळ्यात पान्हा व्यवस्थित सोडत नाहीत. त्यामुळे दूध उत्पादनात घट होऊन दुधाच्या प्रतीवरही परिणाम होतो.
  • लहान वासरांना फुफ्फुसदाहापासून संरक्षण मिळावे याकरिता थंडीच्या काळात लहान वासरांकरिता गोणपाटाची झूल तयार करून त्यांच्या अंगावर घालावी. लहान वासरांना झूल बांधल्याने त्यांना उबदार वाटते. 
  • थंडी जास्त असल्याने जनावरे पाणी कमी पितात. त्यामुळे त्यांची पचनसंस्था व्यवस्थित काम करत नाही. शारीरिक तापमान संतुलित ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात ऊर्जा खर्च होत असल्याने, जनावरांना जास्त ऊर्जा मिळेल असे खाद्य द्यावे. 
  • हिवाळ्यात जनावरांच्या त्वचेला भेगा पडतात. त्यामुळे त्वचा खरबरीत होते व खाज सुटते म्हणून त्यांच्या त्वचेला एरंडीचे तेल लावावे, जेणेकरून त्वचा नरम राहील, भेगा पडणार नाहीत. 
  • अति थंडीत सडावर भेगा पडून दूध काढताना रक्त येते. अतिथंडीमुळे जनावरांचे स्नायू आखडतात किंवा काही जनावरे लंगडतात. 
  • शेळ्यांची करडे आणि गाई, म्हशीची वासरे अतिथंडीमुळे गारठून मृत्युमुखी पडतात. हे लक्षात घेऊन त्यांना उबदारपणा लागेल याची काळजी घ्यावी.
  • उपाययोजना 

  • थंडी वाढू लागल्यास जनावरे प्रथमतः गोठ्यात बांधावीत. बाहेरील थंड हवा आत येणार नाही याची काळजी घ्यावी. गोठ्याच्या खिडकीस रिकाम्या पोत्यांचे किंवा गोणपाटांचे पडदे लावावेत. हे पडदे रात्रभर किंवा जास्त थंडीमध्ये बंद ठेवावेत. सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत उघडे ठेवावेत. 
  • जनावरांना थंडीत मुक्त संचार गोठ्यामध्ये ठेवू नये. गोठ्यामध्ये जनावरांना ऊब मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. उबदारपणासाठी गोठ्यात जास्त वॅटचे बल्ब लावावेत. शक्य असेल तर इलेक्ट्रिक हिटर लावावेत.सायंकाळी शेडमध्ये थंड हवेचा वासरांशी प्रत्यक्ष संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • जनावरांना गोठ्यामध्ये बसण्यासाठी भाताचे किंवा गव्हाचे काड, भुसाच्या साह्याने गादी तयार करावी.
  • जनावरांना थंडीच्या काळात दुपारी ऊन असताना गरम-कोमट पाण्याचा वापर करून धुवावे. सकाळ आणि सायंकाळचे ऊन गोठ्याची येईल अशी गोठ्याची रचना असावी.
  • सडाची त्वचा मऊ राहावी, भेगा पडू नये म्हणून ग्लिसरीनचा किंवा पेट्रोलियम जेलीचा वापर करावा. दूध दोहनावेळी कास धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
  • हिवाळ्यात शारीरिक तापमान संतुलित ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात ऊर्जा खर्च होत असल्याने, जनावरांना जास्त ऊर्जा मिळेल असे खाद्य द्यावे. जनावरांच्या खाद्यामध्ये खनिज मिश्रणाचा समावेश करावा.  पिण्याचे पाणी स्वच्छ असावे. जनावराने व्यवस्थित पान्हा सोडण्यासाठी कास धुण्यासाठी आणि वासरांना धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. 
  • हिवाळ्यात पाणीही थंड असल्यामुळे जनावर पाणी कमी पिते. जनावरे भरपूर पाणी प्यावे, यासाठी कोमट पाणी उपलब्ध करून  द्यावे. शक्यतो दुपारच्या वेळी जनावरांना उन्हात राहता येईल अशी सोय करावी. दुपारच्या वेळेस जास्तीत जास्त पाणी पिण्यास द्यावे.
  • अति थंडीमुळे बहुवर्षीय चारा पिकांची वाढ हळूहळू होते या काळात लसूणघास, बरसीम किंवा चवळी या हिवाळ्यात वाढणाऱ्या पिकांची लागवड करून चारा उत्पादन करावे. आहारात कडबा किंवा मुरघासाचा वापर करावा.
  • गोठा स्वच्छ आणि कोरडा करावा. 
  • - प्रणिता सहाणे, ८६००३०१३२९ (कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, गुंजाळवाडी पठार, संगमनेर,जि.नगर)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

    Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

    Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

    Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

    Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

    SCROLL FOR NEXT