fodder
fodder 
कृषी पूरक

निकृष्ट चाऱ्याचे मूल्यवर्धन

डॉ. के. वाय. देशपांडे, डॉ. चेतन नंदनवार

निकृष्ट चाऱ्याचे रूपांतर सकस व असलेल्या पोषणमूल्यांच्या पूर्ण उपयोग करण्याकरिता चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया केल्यास निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढते. चाऱ्याची चव, पाचकता व त्यातील नत्राचे प्रमाण वाढते.

उन्हाळ्याच्या काळात जनावरांसाठी  चारा म्हणून ज्वारी कुट्टी, गव्हांडा किंवा गव्हाचे तणस, भाताचा पेंढा, सोयाबीन कुटार, बाजरीचे सरमाड इत्यादी घटकांचा वापर होतो. परंतु अशा चाऱ्यांची सकसता कमी असते, यातून पचनीय घटक कमी मिळतात. अशा चाऱ्यामुळे वाढीवर, दूध उत्पादन, आरोग्य आणि प्रजननावर विपरीत परिणाम होतो. अशा चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असते. पाचकताही अत्यल्प असते. यामुळे पोषणतत्त्वे कमी प्रमाणात मिळतात. निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यामध्ये लिग्नो सेल्यूलोज कॉप्लेक्‍स असल्यामुळे कोठीपोटामध्ये जिवाणूंची प्रक्रिया चाऱ्यावर न झाल्यामुळे याचे विघटन होत नाही. प्रथिने जनावरांच्या शरीरासाठी उपलब्ध होत नाहीत. अशा निकृष्ट चाऱ्याचे रूपांतर सकस व असलेल्या पोषणमूल्यांच्या पूर्ण उपयोग करण्याकरिता चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया केल्यास निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढते. चाऱ्याची चव, पाचकता व त्यातील नत्राचे प्रमाण वाढते. त्यामुळे हा चारा आवडीने खातात. चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी  

  •     चाऱ्यावर युरिया प्रक्रिया सावलीमध्ये करावी.
  •     १०० किलो निकृष्ट चाऱ्याकरिता जास्तीत जास्त चार किलो युरिया वापरावा, याचे प्रमाण वाढवू नये.
  •     काडीच्या साहाय्याने द्रावण हलवून प्रत्येक थरावर एकजीव मिसळावे.
  •     प्रक्रिया केलेले खाद्य बुरशीपासून मुक्त असावे.
  • युरिया प्रक्रिया करण्याची पद्धत 

  •     साधारणपणे १०० किलो किंवा त्या पटीने निकृष्ट चाऱ्याची कुट्टी वजन करून घ्यावी. कुट्टी ही गहू, भात, ओट्स, बार्ली, ज्वारी, बाजरी इत्यादींचा असावी.
  • वजन केलेल्या चाऱ्याची कुट्टी जमिनीवर पोत्यावर किंवा प्लॅस्टिकच्या जाड पेपरवर सावलीमध्ये पसरावी. यामुळे मुरलेल्या खालच्या चाऱ्याला माती लागत नाही.
  • युरियाचे प्रमाण चाऱ्याच्या वजनाच्या ४ टक्के इतके असावे. म्हणजे १०० किलो निकृष्ट चाऱ्याकरिता ४ किलो युरिया वापरावा.
  • प्रति १०० किलो चाऱ्याच्या प्रक्रियेसाठी ४० लिटर पाणी घेऊन त्यात ४ किलो युरिया आणि काळा गूळ ९ ते १२ किलो हे एकजीव मिसळून द्रावण करावे. (काळा गूळ ऊर्जेचा स्रोत म्हणून कार्य करते).
  •  चाऱ्याचा सहा इंच थर करावा. पसरलेल्या चाऱ्यावर झारीच्या साहाय्याने द्रावण एकसारखे शिंपडावे व चारा हलवून एकजीव करावे. 
  • नंतर चव वाढविण्यासाठी तयार झालेला चाऱ्यावर चिमूटभर मीठ शिंपडावे.
  •  अशा प्रकारे चाऱ्याचे प्रत्येकी सहा इंचांचे एकावर एक थर द्यावेत. त्यामध्ये युरिया द्रावण एकजीव मिसळावे आणि पायाने तुडवून घ्यावे.
  •  प्रत्येक थरात द्रावण मिसळल्यानंतर दाबून चाऱ्यातील जास्तीत जास्त हवा बाहेर काढावी.
  • संपूर्ण चाऱ्यावर द्रावण मिसळल्यानंतर प्लॅस्टिक कागदाने चाऱ्याचा थर झाकून हवाबंद करावा.
  •  हवाबंद चाऱ्यामध्ये बाहेरील हवा व पाणी जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • हवाबंद केल्यानंतर २१ दिवसांनी चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया होते. 
  • या कालावधीत हा चारा हवाबंद ठेवावा.
  • युरिया मिश्रित चारा खाऊ घालताना घ्यावयाची काळजी 

  • जनावरांना चारा खाण्यास देण्यापूर्वी स्वच्छ आणि ताजे पाणी द्यावे.
  •  प्रक्रिया केलेला चारा जनावरांना खाण्यास देण्यापूर्वी दोन तास अगोदर मोकळ्या हवेत ठेवावा. उरलेला चारा त्वरित प्लॅस्टिकने झाकावा.
  •  कमी प्रमाणात देऊन १० दिवसांनी ४ ते ६ किलोपर्यंत प्रक्रियायुक्त चारा जनावरांना खाण्यास द्यावा.
  • तीन ते चार महिन्यांपेक्षा लहान असलेल्या वासरांना चारा देऊ नये, युरियाची विषबाधा होऊ शकते.
  • गाभण जनावरांना प्रक्रिया केलेला चारा खायला देऊ नये.
  •  उपाशी पोटी जनावरांना प्रक्रिया केलेला चारा देऊ नये. कारण अशी जनावरे प्रक्रिया केलेला चारा अधाशीपणे खातात. त्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता वाढते.
  • केवळ युरिया प्रक्रिया केलेला चारा न वापरता प्रक्रिया न केलेला चारा त्यासोबत मिश्रण करून जनावरांना देण्यात यावा.
  • प्रक्रियायुक्त चाऱ्याचे फायदे

  • चारा रुचकर व चवदार असतो.त्यामुळे जनावरे आवडीने खातात. 
  • चाऱ्याची पाचकता ४८ ते ५५ टक्यांनी वाढते, तर पाचक प्रथिनांचे प्रमाण १ ते ३  टक्के इतके वाढते. 
  • कमी किमतीचा, शेतातील निकृष्ट चाऱ्यापासून सकस चारा तयार होतो. यामुळे चाऱ्यावरील खर्च कमी होतो. आर्थिक फायदा होतो.
  • - डॉ.के.वाय.देशपांडे, ८००७८६०६७२ (विभाग प्रमुख, पशू पोषण विभाग, स्ना.प.व.प.सं,अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

    Kharif Review Meeting : पेरण्याआधी बियाणे, खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

    Earthquake Migration : लोकप्रतिनिधींची मागणी, फरफट सर्वसामान्यांची

    Fodder shortage : नाशकात चाऱ्या टंचाईवरून विरोधाभास? पशुपालकांची चिंता; प्रशासन निर्धास्त

    Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

    SCROLL FOR NEXT