Hybrid Napier variety: Phule Jaywant
Hybrid Napier variety: Phule Jaywant 
कृषी पूरक

हिरव्या चाऱ्यासाठी नेपिअर लागवड तंत्र

संजय बडे

संकरित नेपिअर या चारा पिकाच्या फुले जयवंत, यशवंत या जातींची निवड करावी. हिरव्या लुसलुशीत व पौष्टिक चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी संकरित नेपिअरची लागवड फायदेशीर ठरते. जनावरांच्या समतोल आहारामध्ये वैरण, हिरवा चारा, आंबवण, खनिज पदार्थ, जीवनसत्वे, पाणी यांचा समावेश होतो. त्यात सुमारे ७० टक्के भाग हा हिरव्या चाऱ्याचा असतो. हिरव्या लुसलुशीत व पौष्टिक चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी संकरित नेपिअरच्या सुधारित जातींची लागवड फायदेशीर ठरते. संकरित नेपिअर हे बहुवार्षिक गवत असून ते उंच वाढते.

  • दुभत्या जनावरांना प्रतिदिन २४ ते २५ किलो हिरवा चारा आणि ५ ते ६ किलो कोरडा चारा लागतो. समतोल आहाराच्या दृष्टीने एकदल व द्विदल चाऱ्याचे प्रमाण अर्धे अर्धे असावे.
  • जनावरांच्या खाद्यामध्ये एकदल व द्विदल चारा पिकांचा समावेश करावा. एकाच प्रकारचा चारा सतत देऊ नये.
  • हिरव्या चाऱ्याची कमतरता असते, त्यावेळी उसाच्या वाढ्यांचा उपयोग चारा म्हणून केला जातो. उसाच्या हिरव्या वाढ्यामध्ये ऑक्सालेट आम्ल आणि नायट्रेटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे जनावरांना विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यासाठी ८ ते १० किलो उसाचे वाढे आणि सोबत सकस हिरवा द्विदल चारा १० किलो याप्रमाणे मिश्रण करून द्यावे.
  • जमीन, पूर्वमशागत 

  • खोल, मध्यम ते भारी, काळी कसदार, उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी.
  • जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या आडव्या-उभ्या दोन पाळ्या देऊन जमीन तयार करावी.
  • पेरणी वेळ  उन्हाळी हंगामात फेब्रुवारी ते मार्च आणि खरीप हंगामात जून ते ऑगस्ट या कालावधीत लागवड केल्यास उगवण चांगली होते. सुधारित जाती  फुले जयवंत, फुले यशवंत, फुले गुणवंत लागवड पद्धत 

  • लागवड करताना चांगले ठोंब निवडावेत. लागवडीसाठी साधारण ३ महिने वाढू दिलेल्या गवताच्या खोडाचा वापर करावा. खोडाचा जमिनीकडील दोन तृतीयांश भागातील २ ते ३ डोळे असणाऱ्या कांड्या काढून त्यांची लागवड करावी.
  • सरासरी दोन ठोंब्यातील अंतर ९० बाय ६० सेंमी ठेवावे. त्यामुळे मशागतीची कामे करणे सुलभ होते. ठोंब किंवा कांड्या ९० सें. मी. अंतरावरील सऱ्यांच्या बगलेत लावावेत. दोन डोळे जमिनीत व एक जमिनीवर राहील, अशा पद्धतीने लागवड करावी. दोन झाडांमध्ये ६० सेंमी अंतर ठेवावे. एका ठिकाणी एक जोमदार ठोंब लावल्यास हेक्टरी १८,५०० ठोंब पुरसे होतात.
  • आंतरमशागत  वाढीच्या सुरुवातीच्या काळात १ किंवा २ खुरपण्या कराव्यात. त्यानंतर गरजेनुसार खुरपणी करावी. खत व्यवस्थापन  लागवडीपूर्वी हेक्टरी १० टन शेणखत, ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे. कापणीनंतर हेक्टरी २५ किलो नत्राची मात्रा द्यावी. कापणी  पहिली कापणी ६० ते ६५ दिवसांनी करावी. कापणी जमिनीपासून १५ ते २० सेंमी उंचीवर केल्यास फुटवे चांगले फुटण्यास मदत होते. नंतरच्या कापणी पीक वाढीनुसार ४५ ते ५० दिवसांनी करावी. अशाप्रकारे वर्षभरात साधारण ६ते ७ कापण्या घेता येतात. चारा शक्यतो कडबा कुट्टीमध्ये बारीक करून द्यावा, म्हणजे वाया जात नाही. - संजय बडे, ७८८८२९७८५९ (सहाय्यक प्राध्यापक, कृषिविद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगांव ता. वैजापूर जि. औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

    Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

    Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

    Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

    Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

    SCROLL FOR NEXT