Give green and dried fodder to the animals. 
कृषी पूरक

पशुआहारात तंतुमय पदार्थांचे महत्त्व

पशूआहारातील तंतुमय पदार्थांमुळे जनावरांच्या पोटाची, आतडयाची योग्य हालचाल होऊन पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढते.दुधातील फॅटचे प्रमाण वाढण्यास मदत होते.रक्तातील कोलेस्ट्रॉल व साखरेचे नियंत्रण करण्यास तंतुमय पदार्थ मदत करतात.

डॉ.प्रफुल्लकुमार पाटील, डॉ.सौ.मत्स्यगंधा पाटील

पशूआहारातील तंतुमय पदार्थांमुळे जनावरांच्या पोटाची, आतडयाची योग्य हालचाल होऊन पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढते.दुधातील फॅटचे प्रमाण वाढण्यास मदत होते.रक्तातील कोलेस्ट्रॉल व साखरेचे नियंत्रण करण्यास तंतुमय पदार्थ मदत करतात. जनावरांचे उत्तम आरोग्य, जलद वजनवाढ आणि मुबलक दूध उत्पादनासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे जनावरांचा आहार. दैनंदिन आहारामध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, क्षार, जीवनसत्त्व यांचा कमी-जास्त प्रमाणात जनावरांच्या आहारात वापर होत असतो. कर्बोदकांमधील जलद पचणारा व शरीराला साखर व ऊर्जा पुरवणारा एक भाग असतो त्याला फायबर (तंतुमय पदार्थ) असे म्हणतात. या तंतुमय पदार्थामध्ये सेल्युलोज, हेमीसेल्युलोज, लिग्नीन इ. घटक असतात. पशू शरीरामध्ये जसे कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, क्षार, आणि जीवनसत्त्वाचे कार्य असते, त्याच पद्धतीने पशुआहारामध्ये तंतूमय पदार्थांना महत्त्व आहे. तंतुमय पदार्थांचा पुरवठा 

  • हिरवा चारा, वाळलेला चारा, चुन्नी, भुसा, धान्याचा कोंडा, टरफले, शेतातील दुय्यम पदार्थांमधून जनावरांना तंतुमय पदार्थाचा पुरवठा केला जातो.यामध्ये परिणामकारक तंतुमय पदार्थ असा एक तंतुमय पदार्थाचा भाग आहे. हे परिणामकारक तंतुमय पदार्थ विशेषतः लांब धाटाचे गवत योग्य स्थितीत वाळवून (हे बनवून) जनावरांना दिल्यास त्यातून पुरवठा केला जातो.
  • तंतुमय पदार्थामधील सेल्युलोज, हेमिसेल्युलोज यांचे पचन होवू शकते, परंतु लिग्नीनचे पचन होत नाही. यामुळे निबर चारा, स्थितीच्या पुढे गेलेला चारा, जास्त दिवस शेतात राहून वाळणारा चारा यामध्ये लिग्नीनचे प्रमाण जास्त होऊन त्याची पचनक्षमता कमी होते. म्हणून उत्तम तंतुमय पदार्थ मिळविण्यासाठी चाऱ्याची कापणी योग्य स्थितीमध्ये करणे अत्यंत गरजेचे आहे.
  • जनावरांच्या आहारातील तंतुमय पदार्थाचे फायदे 

  • जनावरांच्या पोटाची, आतडयाची योग्य हालचाल होऊन पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढते.
  • जनावरांचे पोट गच्च होणे, पोटफुगी टाळली जाते.
  • तंतुमय पदार्थ पोटातील पाणी शोषून घेऊन फुगतात. यामुळे जनावरांना पोट भरल्याचे समाधान मिळते.
  • जनावरांची पाणी पिण्याची क्षमता वाढते.
  • दुधातील फॅटचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
  • जनावरांची स्वयंक्रिया उत्तम राहते.
  • जनावरांचे पोट साफ होण्यास मदत होते.
  • जनावरांतील स्थूलपणा कमी करण्यास मदत होते.
  • रक्तातील कोलेस्ट्रॉल व साखरेचे नियंत्रण करण्यास तंतुमय पदार्थ मदत करतात.
  •  जनावरांची चर्वण क्षमता उत्तम राहते. लाळ जास्त प्रमाणात तयार होऊन ती चाऱ्यामध्ये मिसळली जाते. यामुळे कोटीपोटातील सामू टिकून राहण्यास मदत होते.
  • पोटाची व आतड्याची शोषणक्षमता उत्तम राहते.
  • कोटीपोटातील, आतडयातील उपयुक्त जीवजंतुच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करतात.
  • कोटीपोटातील तयार होणाऱ्या व्होलाटाईल फॅटी ॲसिडचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते.
  • जनावरांतील चारा खाण्याचे प्रमाण नियंत्रित केले जाते.
  • तंतुमय पदार्थांची उपयोगिता वाढविण्यासाठी उपाययोजना 

  • चाऱ्याची कुटी एकदम बारीक न करता १ ते २ इंच आकाराची करावी. एकदम लहान तुकडे केल्यास तंतूमय घटकांची उपयुक्तता कमी होते.
  • जनावरांच्या आहारात लांब धाट असलेला चारा योग्य स्थितीत वाळवून द्यावा.
  • शेतातील दुय्यम पदार्थावर, युरिया, मळी/ गूळ, क्षारमिश्रण, वाफ, सोडियम हायड्रॉक्साईड, अमोनियम हायड्रॉक्साईडची योग्य प्रमाणात प्रक्रिया करावी.
  • जनावरांच्या दैनंदिन आहारामध्ये वाळलेला चाऱ्याचा योग्य प्रमाणात ‘टोटल मिक्स राशन' पदधतीने वापर करावा.
  • वाळलेला चारा, पशुखाद्य वापरून संतुलित संपूर्ण खाद्य गोळीपेंड तयार करावी.
  • वाळलेला चारा, पशुखाद्य यांचे ब्लॉक्स तयार करावेत.
  • जनावरांना पिण्यास मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे.
  • जनावरांच्या आहारात केवळ वाळलेला चाराकिंवा हिरव्या चाऱ्याचा वापर न करता दोन्हीचे मिश्रण द्यावे.
  • चाऱ्याची कापणी योग्य स्थितीत करावी.
  • संपर्क : डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४ (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर जि. लातूर)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

    Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

    Maharashtra Assembly Election Result 2024 : वऱ्हाडामध्येही महायुतीचा बोलबाला

    Maharashtra Election Result : ‘लाडक्या बहिणीं’चा आशीर्वाद महायुतीला!

    Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

    SCROLL FOR NEXT