About Dr. Panjabrao Deshmukh Krishi Ratna Award Agrowon
कृषी पूरक

कोणाला दिला जातो कृषिरत्न पुरस्कार ?

महाराष्ट्राचे थोर कृषि शास्त्रज्ञ डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी, शिक्षण आणि सहकार या तिन्ही क्षेत्रात उल्लेखनीय काम केले.

Team Agrowon

आपल्या समाजातील लोकांचा कृषी क्षेत्रात विकास होण्यासाठी, महाराष्ट्राचे थोर कृषि शास्त्रज्ञ डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी, शिक्षण आणि सहकार या तिन्ही क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. त्यांच्या या क्षेत्रातील कार्याला अभिवादन म्हणून २०००-२००१ पासून राज्यातील कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत '' डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार'' देण्यात येतो. कृषी क्षेत्राचा विस्तार, कृषी प्रक्रिया, पिक पद्धतीत बदल आणि कृषी उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यात योगदान देणाऱ्या व्यक्तींना, संस्थांना किंवा गटांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत '' डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार'' देण्यात येतो. या पुरस्कारासाठी दरवर्षी राज्यातून प्रगतीशील शेतकऱ्यांचे प्रस्ताव कृषि आयुक्तालयामार्फत मागविले जातात. या प्रस्तावांची योग्य ती छाननी केली जाते. समितीने निवड केलेल्या एका शेतकऱ्याला किंवा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो.हा पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात येतो.

या पुरस्कारा अंतर्गत ७५,०००/- रुपये रोख, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र दिले जाते. यासोबतच शेतकरी पुरुषाच्या पत्नीचा देखील साडी-चोळी देऊन सम्मान करण्यात येतो.

पहिला कृषिरत्न पुरस्कार हा २००१ मध्ये, महाराष्ट्र राज्य कृषक समाज, कृषक भवन, ३४७, नवी पेठ, जळगाव या संस्थेला देण्यात आला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT