Lumpy Skin Agrowon
ॲनिमल केअर

Lumpy Skin: सांगलीत सहा हजारांवर जनावरे बाधित

लम्पी स्कीन आजाराची शुक्रवारी (ता. १८) दिवसभरात २१९ जनावरांना बाधा झाली. याबरोबरच आजवरच्या एकूण बाधित जनावरांची संख्या सहा हजारांवर पोहोचली.

Team Agrowon

सांगली ः लम्पी स्कीन (Lumpy Skin) आजाराची शुक्रवारी (ता. १८) दिवसभरात २१९ जनावरांना बाधा झाली. याबरोबरच आजवरच्या एकूण बाधित जनावरांची संख्या सहा हजारांवर पोहोचली. शुक्रवारअखेर ४८६ जनावरांचा मृत्यू झाला. सद्यःस्थितीत ३५०४ जनावरांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात जनावरांत लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून मृतांची संख्या वाढत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

गेल्या काही दिवसांत लम्पी स्कीनचा प्रसार वेगाने होत आहे. सोमवारचा (ता. १४) अपवाद वगळता दररोज दोनशेहून अधिक जनावरांना लम्पी स्कीनची बाधा होत आहे. तर बाधित जनावरे मृत होण्याचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या चार दिवसांत ६७ बाधित जनावरांचा मृत्यू झाला आहे. आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र संसर्ग कमी होत नसल्याचे दिसत आहे.

जनावारांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा वाढता संसर्ग आणि बाधित जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण पाहता बळीराजा आपले पशुधन वाचवण्यासाठी चिंतेत आहे. दिवसभरात नव्याने २१९ जनावरांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आजअखेर जिल्ह्यात लम्पी स्कीनची बाधा झालेल्या जनावरांची संख्या सहा हजार ६९८ झाली आहे. यापैकी २ हजार ७०८ जनावरे लम्पी स्कीन आजारातून बरी झाली आहेत, तर ३ हजार ५०४ जनावरांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारअखेर ४८६ बाधित जनावरांचा मृत्यू झाला आहे.

तालुकानिहाय बाधित जनावरांची संख्या

(मृत जनावरे)

मिरज १७८८ (११७)

आटपाडी ९२७ (५३)

पलूस ४३१ (४७)

वाळवा १०३९(७०)

खानापूर ७०१ (५६)

तासगाव ४२७ (३६)

कडेगाव २०९ (१०)

कवठे महांकाळ ३५१ (३९)

जत ७०८ (५६)

शिराळा ११७ (३)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT