Animal care Agrowon
ॲनिमल केअर

Animal Care : कशी दूर कराल कालवडीतील वंधत्वाची समस्या?

Team Agrowon

Milk Production : दुधाळ जनावरांच्या (Milch Animal) व्यवस्थापनात वर्षाला वासरू व नियमित दूध उत्पादनाकरिता प्रजनन व्यवस्थापन चांगले असणे गरजेचे आहे.

योग्य जनावरांची निवड, गोठ्याचे व्यवस्थापन, संतुलित आहाराचा पुरवठा, पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर, आरोग्याचे नियोजन, लसीकरण, जंतनाशकाचे नियोजन, इ. बाबींचा वाचार प्रजनन व्यवस्थापनात करावा.

जनावराच्या प्रजनन व्यवस्थेमध्ये वेगवेगळे प्रकारचे अडथळे दिसून येतात. त्यामुळे जनावरामध्ये वंधत्व आढळून येते. 

दुध उत्पादन व्यवसाय फायद्यासाठी वंधत्व निर्मुलनाकरीता खालील बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.  

पहिल्या माजाच्या वेळी कालवडीचे २२५ ते २५० किलोग्राम वजन असावे. 

पहिल्या माजाचे लक्षणे ओळखून सुरुवातीच्या दोन माजामध्ये रेतन करू नये. तिसऱ्या माजाच्या वेळी योग्य रित्या रेतन करणे आवश्यक आहे. 

सततचा संतुलित आहाराचा पुरवठा करणे गरजेचे आहे.

हिरव्या व वाळलेल्या चाऱ्यांचा पुरवठा करावा.

गर्भाशय सुस्थितीत राहावे, दुध वाढीसाठी आणि जनावरांच्या शरीर वाढीसाठी कालवडीला नियमीत क्षार मिश्रण द्यावे. 

तंज्ञ पशुवैद्यकाकडून गर्भाशयाची सखोल तपासणी करून घ्यावी. गर्भाशयाच्या आजाराच्या निदानानुसार उपचार करावेत.

जनावराला वेळेवर जंतनाशकाची मात्रा द्यावी.  

कालवड लवकर माजावर येण्यासाठी जीवनसत्वे, क्षार मिश्रण आणि काही वनस्पतीजन्य औषधाचा वापर करावा.

कालवडीला मोड आलले धान्य दररोज किमान १५ दिवस ५० ते १०० ग्रॅम खाद्यातून दिल्यास लवकर व स्पष्ट माज दिसू शकतो.

अनेक जनावरे एकत्रितपणे काही संप्रेरकाचा वापर करून माजावर येऊ शकतात. रेतनही एकत्रितपणे करता येते. 

कालवडीतील योग्यवेळी माज ओळखून विल्यानंतर योग्य व्यवस्थापन ठेवावे.      

योग्य वेळी रेतन करुन  तांत्रिक पद्धतीचा अवलंब करावा. जनावरे सकाळी माज दाखवत असतील तर सायंकाळी रेतन करावे. सायंकाळी माज असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी रेतन करणे योग्य असते. 

रेतनांनंतर जनावरांची योग्य काळजी घेतले पहिजे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season : सांगली जिल्ह्यात पावसामुळे गाळप हंगाम लांबण्याची शक्यता

Crop Damage Compensation : खानदेशात ‘केवायसी’अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड रखडली

Vidhan Sabha Election Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात २१.२४ लाख मतदार

Vidhan Sabha Election Beed : बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघात २१ लाखांवर मतदार

SCROLL FOR NEXT