FMD Vaccination Agrowon
ॲनिमल केअर

FMD Vaccination : लाळ्या खुरकूत लसीकरण मोहीम लवकरच

लाळ्या खुरकुतीच्या ७ लाख लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील जनावरांना लवकर लाळ्या खुरकूत लसीकरण मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.

टीम ॲग्रोवन

सांगली ः लाळ्या खुरकुतीच्या ७ लाख लसींचा (FMD Vaccine) साठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील जनावरांना लवकर लाळ्या खुरकूत लसीकरण (FMD Vaccination) मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने (Department Of Animal Husbandry) दिली. जिल्‍ह्यात ११ लाख ३ हजार ५९३ पशुधनाची संख्या आहे. लम्पी स्कीन आजाराच्या प्रादुर्भावामुळे लाळ्या खुरकूत लसीकरणाची मोहीम लांबणीवर पडली होती.

त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून लाळ्या खुरकूतचे लसीकरण होण्यास अडचणी आल्या होत्या. गेल्या आठवड्यात ५० हजार डोस उपलब्ध होते. लसींचा पुरेसा साठा नसल्याने जिल्हा पशुसंवर्धन विभागाने वरिष्ठ कार्यालयाकडे लसींची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे सात लाख डोस उपलब्ध झाले आहेत.

जिल्ह्यात पुशधनांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने पशुपालकांच्यात भीतीची वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लाळ्या खुरकूतचे लसीकरण कधी करणार, असा प्रश्न पशुपालकांनी उपस्थित केला होता. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने तातडीने लसींसाठी पाठपुरावा करत लसींची उपलब्धता करून घेतली आहे. जिल्ह्यात सध्या साडे सात लाख डोस उपलब्ध असून लसींचा साठा मुबलक आला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम लवकर सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, ज्या गावांतील पशुधनांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. त्या गावांत लाळ्या खुरकुतीचे लसीकरण आताच केले जाणार नाही. त्या जनावरांना पुढच्या टप्प्यात लसीकरण करण्याचे नियोजन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. प्रत्येक तालुक्याच्या मागणीनुसार तालुक्याला लसी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

जिल्ह्यात लाळ्या खुरकूतचे ५० हजार डोस शिल्लक होते. आता ७ लाख डोस उपलब्ध झाले आहेत. लवकरच लाळ्या खुरकूत लसीकरण मोहीम सुरू केली जाईल.

- डॉ. सदाशिव बेडक्याळे, सहायक उपायुक्त पशुसंवर्धन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT