Bloat treatment in animal Agrowon
तज्ज्ञ मुलाखती

जनावरांमध्ये दिसून येणाऱ्या पोटफुगीवर कोणते उपाय कराल?

जनावरांचे व्यवस्थापन करत असताना अनेकदा काही अखाद्य, घातक-विषारी पदार्थ जनावरांच्या पोटात जातात. अशाने जनावरांना पोटफुगी होत असते. जनावरांमधील पोटफुगी, त्याची कारणे आणि त्यावरील उपाय या विषयावर पशु आहारतज्ज्ञ डॉ. अक्षय वानखडे यांच्याशी साधलेला संवाद.

Roshani Gole

१. रवंथ करणाऱ्या जनावरांची पचन संस्था नेमकी कशी कार्य करते ?

रवंथ (rumination) करणाऱ्या जनावरांचे पोट हे कोटी पोट, जाळी पोट, पडदे पोट आणि खरे पोट (abomasum)या चार कप्प्यांमध्ये विभागलेले असते. कोटी पोट (rumen) अन्ननलिकेसोबत जोडले गेलेले असते. चर्वण केलेले खाद्य कोटी पोटात एका ठिकाणी जमा होऊन त्याचा गोळा तयार होतो. यात मुख्यत्वे न पचलेले अन्नघटक असतात. ज्यांचे रवंथ प्रक्रियेमध्ये पुन्हा चर्वण केले जाते. कोटीपोटाच्या भित्तीकेमधून विविध घटक शोषले जातात, तसेच सूक्ष्मजीवाणुद्वारे प्रथिने (protein), कर्बोदके (carbohydrates) यांचे साध्या प्रकारात रुपांतर केले जाते. कोटी पोटाचा सामू कमी जास्त झाल्यास पोटफुगी होऊ शकते. खाद्यामध्ये लोखंडी, धारधार अखाद्य वस्तू जाळी पोटात अडकून बसतात. जाळी पोट हे मधमाश्यांच्या जाळ्यासारखे असते. पडदे पोटामध्ये विविध प्रकारचे अनेक पडदे असतात. खऱ्या पोटामध्ये संप्रेरकामार्फत (hormones) विघटन केले जाते. पचनक्रिया तोंडामध्ये सुरु होऊन लाळ मिसळली जाते. हे लाळ मिश्रित खाद्य कोटीपोटामध्ये जाते. मोठ्या जनावरांनी दिसणारा चारा पटापट खाल्यानंतर ते कोटी पोटात जाऊन तरंगत राहते. जनावरे बसल्यावर परत हे अन्न तोंडात आणून त्यात लाळ मिसळली जाते, यालाच आपण रवंथ करणे असे म्हणतो.

२. पोटफुगीची नेमकी कारणे कोणती आणि त्याचे प्रकार कोणते आहेत ?

यात प्रामुख्याने दोन प्रकार येतात. शरीरात अधिक प्रमाणात तयार होणाऱ्या वायुमुळे (gas) आणि तयार होणारे वायु आवश्यक प्रमाणात शरीराबाहेर टाकले न गेल्याने. प्राथमिक अवस्थेतील पोटफुगी आहारातील बदलामुळे होत असते. यात सहज पचणाऱ्या प्रथिनांचा अधिक प्रमाणातील समावेश तसेच सुक्या चाऱ्याचे कमी प्रमाण, आहारातील अचानक बदल यांचा समावेश होतो. द्वितीय अवस्थेतील पोटफुगी वायु शरीराबाहेर न टाकल्यामुळे होत असतो. अन्ननलिकेत काही अन्नघटक फसून राहिल्याने, खाद्याचे कमी प्रमाणात सेवन केल्याने दिसून येते.

३. जनावरांच्या पोटामध्ये पोटफुगीची अवस्था कशा प्रकारे तयार होत असते?

जनावरांच्या आहारामध्ये सहज पचणाऱ्या कर्बोदकांचा जास्त समावेश केल्यास कोटीपोटातील विशिष्ट जीवाणूंची संख्या वाढू लागते. या जीवाणूंनी स्त्रावलेले द्रव हे न विरघळणारे असते. प्रथिनयुक्त चाऱ्याचे अधिक प्रमाण, वायु अधिक प्रमाणात तयार झाल्याने छातीच्या पडद्यावर दबाव येतो. परिणामी श्वास घेण्यास त्रास होतो. ऑक्सिजनची कमतरता भासू लागते.

४. जनावरांना पोटफुगी झाल्यानंतर ते ओळखण्याची प्रारंभिक लक्षणे कोणती?

जनावरांचे डावीकडील पोट फुगलेले दिसून येते. त्या ठिकाणी हात मारल्यास विशिष्ट प्रकारचा आवाज घुमतो. पोटदुखी होते, जनावर वारंवार लघवी आणि शेण टाकते. श्वास घेण्यास त्रास होतो. परिणामी जनावर मान वर करून श्वास घेण्यास सुरुवात करते. कोटीपोटाची हालचाल कमी होते.

५. पशुपालकांनी आहारातून पोटफुगीचे निवारण कसे करावे?

पोटफुगी झाल्यानंतर लगेचच त्यांना दिले जाणारे खाद्य आणि पाणी थांबविले पाहिजे. आहारातील अधिकच्या प्रथिनयुक्त चाऱ्याचा समावेश टाळावा. भरडलेल्या धान्याचा कमी प्रमाणात वापर करावा. आहारात तंतुमय पदार्थांचा योग्य प्रमाणात वापर करावा, यामुळे जनावरांना चयापचय क्रियेत मदत होते. पहाटेच्या किंवा सायंकाळच्या वेळी चरायला सोडू नये. आहारात बदल करताना तो टप्प्या-टप्प्याने करावा. पोटफुगी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर जनावरांना उंच भागावर उभे करावे. तोंडाकडील भाग वरच्या दिशेने ठेवावा. यामुळे वायु बाहेर पडण्यास मदत होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton MSP: हमीभावाने कापूस विक्रीसाठी ४० हजार शेतकरी प्रतीक्षेत

Tamarind Price: अहिल्यानगरमध्ये चिंचेला प्रति क्विंटल २५००० रुपये दर

Sugar Purchase Enquiry: साखर खरेदीसाठी केवळ चौकशीच; करार नाहीत

Grape Packing Material Price: द्राक्ष पॅकिंग मटेरिअल दरात १५ टक्क्यांपर्यंत वाढ

Maharashtra Weather: राज्यात वादळी पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT