Heat synchronization in animals
Heat synchronization in animals Agrowon
तज्ज्ञ मुलाखती

जनावरांतील माज संकलन तंत्रज्ञान म्हणजे काय?

Roshani Gole

क्षेत्रीय स्तरावर जनावरांचे व्यवस्थापन करत असताना आपल्या गोठ्यातील जनावरे एकत्रित माजावर आल्यास त्यांचे व्यवस्थापन करणे सुलभ होते. जनावरांतील माज संकलन तंत्रज्ञान (heat synchronization) या विषयावर डॉ. अजित माळी, सहाय्यक प्राध्यापक, पशुप्रजनन शास्त्र, पशुवैद्कीय महाविद्यालय सातारा यांच्याशी साधलेला विशेष संवाद.

१. जनावरांतील माज संकलन तंत्रज्ञान म्हणजे काय?

आपल्या गोठ्यातील १० जनावरांपैकी ३ जनावरे गाभण असून उरलेली भाकड (dry animals) असतील, तर या भाकड जनावरांना साधारणपणे दुधाचे भाव लक्षात घेऊन, चाऱ्याची उपलब्धता पाहून तसेच गाय विल्यानंतर गायीला आणि वासरांना सुद्धा काही अडचण येणार नाही अशा सर्व गोष्टींची सांगड घालून जनावरांना कृत्रिम संप्रेरकांच्या मदतीने एकाच वेळी माजावर आणणे म्हणजे माज संकलन तंत्रज्ञान होय. जर आपल्याकडे २० गायी असतील तर ५ गायी या चालू महिन्यात विल्या पाहिजे, दुसऱ्या पाच गायी पुढील ३ महिन्यांनी विल्या पाहिजे. म्हणजेच गोठ्यातील एकूण दूध उत्पादन वर्षभर सारखे राहील अशा दृष्टीने जनावरांचे माज संकलन करावे. यासाठी गोठ्यातील जनावरांचे वर्गीकरण करून त्यांना त्यानुसार माजावर आणावे.

2. जनावरांतील माज संकलन तंत्रज्ञानाचा जनावरांच्या वंध्यत्वाशी काही संबध आहे का?

माज संकलन तंत्रज्ञान म्हणजे एकापेक्षा जास्त जनावरे एकाच वेळी माजावर आणणे. साधारणपणे गाय विल्यानंतर ६० ते ७० दिवसांत माजावर आली पाहिजे. पण असे होताना दिसत नाही, याउलट कधी-कधी विल्यानंतर चार ते सहा महिने गाय माजावर येत नाही. वंध्यत्वाच्या प्रकारात, गाय माजावर न येणे किंवा माजावर आलेली गाय गाभण न राहणे. नैसर्गिक किंवा कृत्रिम रेतन केल्यानंतर निरोगी, सुदृढ वासराच्या जन्मापर्यंतचा काळ म्हणजे सुलभ प्रजनन. वंध्यत्व निवारण करण्याकरता माज संकलन तंत्रज्ञान महत्वाचे आहे.

3. जनावरांमधील माज संकलन नेमके कोणत्या वेळी केले पाहिजे?

जनावर विल्यानंतर कमीत कमी ६० दिवस झालेले पाहिजेत. पहिल्यांदा माजावर येणाऱ्या कालवडीचे वजन साधारणतः ३०० किलो असले पाहिजे. गायीचा शरीर सूचनांक लक्षात घेऊन शेवटच्या तीन लहान बरगड्याच फक्त दिसतील असे किंवा पुढील ३ मोठ्या बरगड्या नाही दिसल्या पाहिजे. पाठीच्या शेपटीच्या भागाकडील फुगीरपणा कमी असला पाहिजे.

4. गायी-म्हशी प्रमाणे शेळी किंवा मेंढीमध्ये माज संकलन तंत्रज्ञानाचा वापर आपण करू शकतो का?

नक्कीच, शेळ्या-मेंढ्याचे संगोपन पूर्वीच्या काळी भटकंती करून केले जाई. परंतु आजकाल स्टाॅल फीडिंगची (stall feeding) संकल्पना आली आहे. शेळी विल्यानंतर जास्तीत जास्त ४० ते ४५ दिवसांनी माजावर आली पाहिजे. पशुवैद्काच्या सल्ल्याने शेळी-मेंढी मध्ये सोनोग्राफी तंत्रज्ञानाचा वापर उपयोगी ठरतो. शेळीमध्ये माज संकलन तंत्रज्ञानाचा वापर करत असताना शेळीच्या बोकडाची मागणी लक्षात घेऊन करावी. विणाऱ्या शेळ्या एप्रिल किंवा मे महिन्यात विल्या पाहिजे जेणेकरून ५-६ महिन्याचा बोकड योग्य विक्रीस तयार होईल. फक्त योग्य संप्रेरकांचा प्रमाणात वापर महत्वाचा आहे.

5. जनावरांना एकत्रित माजावर आणण्यासाठी एकूण खर्च किती येतो?

गायी म्हशींमध्ये २१ दिवसांचा तर शेळ्या-मेंढ्यामध्ये १७ ते २१ दिवसांचे ऋतुकाळ चक्र असते. जनावरांच्या ऋतुकाळ चक्रानुसार, त्यातील अवस्थेनुसार उपचार पद्धती बदलत असते. बाजारात उपलब्ध असलेली औषधे वापरूनच उपचार केले जाते. साधारणतः ६०० ते ७०० रुपये किमंतीची कृत्रिम संप्रेरकांची औषधे गायी-म्हशीमध्ये तर शेळी मेंढीमध्ये ३०० ते ३५० रुपये किमंतीची औषधे पुरेशी असतात. CIDR गर्भाशयाच्या मुखाजवळ ८ ते १० दिवस ठेवेले जाते त्याचा साधारण खर्च ८०० ते ९०० रुपये येत असतो. संप्रेरक हे दुहेरी शास्त्र आहे, म्हणजे ते तुमचा फायदाही करते सोबत तोटाही करू शकते. जनावरांना एका सुनियोजित वेळी माजावर आणायचे असल्यास योग्य संप्रेकरक सुनिश्चित मात्रेत वापरल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. माज संकलन तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्याने गोठ्यातील जनावरे सुनिश्चित वेळी गाभण राहून आपल्या गोठ्यात नवीन वासरू, करडे जन्मला येऊ शकतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT