Newsborn Calf Agrowon
काळजी पशुधनाची

Calf Management : वासरांमध्ये केस गळती का होते?

Calf Care Management : कधी- कधी वासरांच्या आंगावरील केस गळून जातात. त्यांच्या अंगाला खाज सुटते. वेळेवर निदान न झाल्यामुळे आणि उपचार न केल्यामुळे वासरांच्या त्वचा उघडी पडते. हे कशामुळे होतं हेच काही पशुपालकांच्या लक्षात येत नाही.

Team Agrowon

Animal Care : कधी- कधी वासरांच्या आंगावरील केस गळून जातात. त्यांच्या अंगाला खाज सुटते. वेळेवर निदान न झाल्यामुळे आणि उपचार न केल्यामुळे वासरांच्या त्वचा उघडी पडते. हे कशामुळे होतं हेच काही पशुपालकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे अशावेळेस लक्षणे ओळखून पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन उपचार करण्याची गरज असते.

वासरे २ ते १० आठवडे वयाची असताना त्यांच्यात व्हिटॅमिन-सी ची कमतरता आढळून येते. नैसर्गिकरित्या जनावरांच्या पोटात व्हिटॅमिन सी तयार होत असतं पण ते वासरांमध्ये कमी प्रमाणात तयार होते. दुभत्या गायीमध्ये ग्लूकोजचे प्रमाण कमी असल्यानं व्हिटॅमिन सी ची कमतरता आढळून येते. जनावरांना किटोसीस झाल्यावर शरीरातील ‘व्हिटॅमिन सी’ चे प्रमाण कमी होते. दुभत्या गाईमध्ये व्हिटॅमिन-सी कमी असते. लहान वासरांतील वासरांमधील ‘व्हिटॅमिन- सी’च्या कमतरतेची लक्षणे ओळखणं गरजेच आहे.

वासरांमध्ये व्हिटॅमिन- सी ची कमतरता निर्माण झाल्यानंतर त्यांचे केस गळून जातात. वासरांच्या त्वचेवर लालसरपणा येतो. खाज न येता केस गळून गेल्याने वासरांची त्वचा उघडी पडते.मांड्यांचे, पायांचे केस पूर्णपणे निघून जातात. कधी कधी वेळीच योग्य उपचार न झाल्यास तोंडाचे व मानेचे केस निघून त्वचा उघडी पडते.

जमिनीत असलेले क्षार, वापरलेली खते आणि पाणी, चाऱ्याचा प्रकार यासारख्या घटकांवरून चाऱ्यातील खनिजांचे प्रमाण ठरत असतं. द्विदल चाऱ्यामध्ये कॅल्शियम चे प्रमाण जास्त असते. जलद गतीने वाढणाऱ्या हिरव्या कोवळ्या चाऱ्यात मॅग्नेशियमचे प्रमाण कमी असते.

जसा चारा जुना होत असतो ते त्यातील स्फुरदच प्रमाण कमी कमी होत असते. काही व्हिटामिन नैसर्गिकरीत्या जनावरांच्या शरीरात तयार होत असतात. त्यामुळे जनावरांना सकस चारा खायला देणं अत्यंत गरजेचं आहे. याशिवाय वासरांना डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन सी चा पुरवठा करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavistar AI App: ‘महाविस्तार एआय’कडे दुर्लक्ष; नोंदणीला मंद गती

Unseasonal Rain: पश्चिम विदर्भात पूर्वमोसमीचा सलग तडाखा

Marathwada Water Stock: मराठवाड्यात प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने घटतोय

Village Story: आठवणींची फुलवात...

El Nino Impact on Monsoon: एप्रिल महिन्यात पाऊस दणका देणार का?

SCROLL FOR NEXT