Before Monsoon Vaccination Of Animals
Before Monsoon Vaccination Of Animals Agrowon
काळजी पशुधनाची

जनावरांचे मान्सूनपूर्व लसीकरण का करावे?

Team Agrowon

पावसाळ्यामध्ये (monsoon)वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढलेलं असतं. ओलसर वातावरणात सूक्ष्म जिवाणूंची वाढही झपाट्याने होत असते. परिणामी पावसाळ्यात जनावरांना विविध रोगांची लागण होत असते. आजाराची तीव्रता जास्त असल्यास जनावरे दगावण्याचीही शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण (Vaccination) करणे गरजेचं आहे.

पावसाळ्यात आपल्या पशुधनाचे साथीच्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. सर्वसाधारणपणे पावसाळ्यात जनावरांना घटसर्प (H.S), फऱ्या(black quarter), आंत्रविषार, पीपीआर (PPR) या रोगांची बाधा होत असते. या रोगांविरुद्ध लसीचा पुरवठा पावसाळ्यात पशुसंवर्धन खात्यामार्फत दरवर्षी केला जातो. वेळेत लसीकरण केल्यास आपल्या पशुधनाचे साथीच्या रोगापासून संरक्षण करता येईल. मात्र लसीकरणाआधी आपल्या पशुधनाचे जंत निर्मुलन (Deworming) केल्यास चांगला फायदा दिसून येतो.

शेतकऱ्याकडील गायी-म्हशी, शेळ्या-मेंढ्या यांसारखी जनावरे घटसर्प, फऱ्या, फाशी, आंत्रविषार यांसारख्या साथीच्या रोगामुळे तडकाफडकी मृत्यु पावतात. जनावरांना या रोगांची लागण झाल्यानंतर उपचार करण्यास फारसा वेळ मिळत नाही. बाधित जनावरांवर वेळेत उपचार न केल्यास त्यांचा मृत्यु होऊन, शेतकऱ्यांची प्रचंड हानी होते. या सर्व रोगांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करणे गरजेचं आहे. त्यामुळे त्या विशिष्ट रोगाची साथ आल्यानंतर देखील, जनावरांमध्ये त्या रोगाविरुद्ध प्रतिकार करण्याची शक्ती तयार झालेली असते.

पावसाळ्यात शेतीच्या कामांमुळे किंवा वातावरणातील ओलसरपणामुळे जनावरांची खुरे सतत ओलसर राहतात. परिणामी जनावरांना लाळ्या खुरकूत सारख्या रोगांची बाधा होत असते. लाळ्या खुरकूतमध्ये जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी, त्यांची उत्पादन क्षमता कमालीची घटते.

पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास, जनावरांची उत्पादकता टिकून राहण्यास मदत होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT