marathwadi buffalo Agrowon
काळजी पशुधनाची

का म्हणतात या म्हशीला मराठवाड्याचं काळं सोनं ?

मराठवाडी म्हैस अतिशय काटक असून फक्त चाऱ्यावरच ३ ते ५ लिटर दुधाचे उत्पादन देण्याची क्षमता आहे.

Roshani Gole

मराठवाडी म्हैस (marathvadi buffalo) ही प्रामुख्याने हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड या जिल्ह्यात आढळून येते. मराठवाडी म्हैस अतिशय काटक असून फक्त चाऱ्यावरच ३ ते ५ लिटर दुधाचे उत्पादन देण्याची क्षमता आहे. मध्यम बांध्याची म्हशीची ही जात शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या म्हशीला दुधणाथडी असेही म्हंटले जाते. मराठवाड्यातील वातावरणात ही म्हैस जुळवून घेऊन चांगल्या दुधाचे उत्पादन देते म्हणून तिला मराठवाड्याचे काळं सोनं म्हंटल जाते.

शारीरिक वैशिष्ट्ये-

- या म्हशींचा रंग भुरकट ते गडद काळा असतो.
- काहीवेळेस या जातीच्या म्हशींच्या कपाळावर पांढऱ्या रंगाच्या छटा आढळून येतात.
- या म्हशींचे कपाळ रुंद, मान लांब आणि डोळे साधारण लालसर असतात.
- कानांचा आकार मध्यम असून ते खाली झुकलेले असतात.
- शिंगे मध्यम लांबीचे असून, मानेशी समांतर खांद्यापर्यंत आलेले असतात.
- शेपूट मध्यम लांबीची असून, शेपटीचा गोंडा पांढरा असतो.
- खुरांचा रंग काळा असतो. खुरांची बांधणी घट्ट असते.
- एका वेतातील दूध उत्पादन १२०० ते १२५० किलोपर्यंत मिळते.
- प्रथम विण्याचे वय हे ५२ महिने इतके असते.
- दोन वेतातील अंतर ५३० दिवसांचे असते.

इतर म्हशींच्या जातीच्या तुलनेत, मराठवाड्यातील मराठवाडी म्हैस दुर्लक्षित झाली आहे. या स्थानिक जातीच्या म्हशींचे संवर्धन आणि संगोपन करण्यासाठी पशुपालकांनी संघटीत होऊन काम केले पाहिजे. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभाग आणि पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी यांच्या संयुक्त प्रयत्नांची गरज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT