Kharif Season: मॉन्सून आगमनानतंर गेले दोन दिवस जिल्ह्याच्या सर्वच भागांत पावसाच्या दमदार सरी पडत आहे.सोमवारी सायकांळी सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात पावसाच्या सरी झाल्या. मात्र रात्रीपासुन जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात रोपवाटिकांची कामे हाती घेतली आहे. बियाणे खरेदीकरिता शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांवर देखील गर्दी केल्याचे चित्र आहे..जिल्ह्यात शनिवारी (ता. ६) दुपारी मॉन्सून दाखल झाला. झाला. त्यानतंर रविवारी काही भागांत जोरदार, तर काही भागात हलका पाऊस झाला.सोमवारी दिवसभर पावसाचे वातावरण होते. परंतु दिवसभर पाऊस झाला नव्हता. सायकांळी सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. परंतु रात्री जिल्हयात सर्वत्र पावसाच्या दमदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली. .Sindhudurg Rain Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस सुरूच.देवगड, दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यात जोरदार पाऊस झाला तर उर्वरित जिल्ह्यात देखील दमदार सरी कोसळल्या. मंगळवारी (ता.९) सकाळपासून देखील जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या सरी सुरू होत्या. पावसामुळे शेतकऱ्यांनी भात रोपवाटिकांची कामे हाती घेतली आहेत. सोमवारी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांवर बियाणे खरेदीकरिता मोठी गर्दी शेतकऱ्यांनी केली होती. मंगळवारी पहाटेपासून शेतकऱ्यांनी नांगरणीला सुरुवात केली..Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले .जिल्ह्यात उद्या येलो अलर्टहवामान विभागाने उद्या सिंधुदुर्गला येलो अलर्ट दिला आहे.त्यामुळे जिल्ह्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. या कालावधीत ३० ते ४० किमी वेगाचे वारे,विजांचा लखलखाट होण्याची शक्यता देखील आहे..तालुकानिहाय पाऊसदेवगड-३८ मिमी, मालवण-१४ मिमी, सावंतवाडी-२५ वेंगुर्ला-१४ मिमी, कणकवली-४ मिमी, कुडाळ-१६, वैभववाडी १० मिमी, दोडामार्ग ३०.७६ मिमी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.