Animal Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Vaccination : जनावरांच्या आजार नियंत्रणासाठी लसीकरणाचे वेळापत्रक

Animal Care: वेळेवर लसीकरणामुळे जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता सुधारते. त्यांना विविध प्रकारच्या संक्रामक आजारांपासून संरक्षण मिळते.

Team Agrowon

डॉ. कृष्णा गिऱ्हे, डॉ. संतोष स्वामी

Livestock Health: वेळेवर लसीकरणामुळे जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता सुधारते. त्यांना विविध प्रकारच्या संक्रामक आजारांपासून संरक्षण मिळते. लसीकरणामुळे येणारा ताप व शारीरिक ताण यांमुळे थोड्या प्रमाणात दूध उत्पादन कमी होऊ शकते; परंतु ते केवळ १ ते २ दिवसच राहते. पशूतज्ज्ञांच्या सल्यानेच लसीकरण करावे.

गाई, म्हशी,शेळ्या, मेंढ्या यांना लाळ्याखूरकूत,घटसर्प, फऱ्या व आंत्रविषार या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होतो. या आजारांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपचार करण्यास वेळ मिळत नाही.लाळ्या खूरकूत आजारामुळे जनावरे सहसा दगावत नाहीत. परंतु या रोगामुळे विशेषतः संकरित गाई व म्हशी अनुत्पादक होतात किंवा त्यांची उत्पादन क्षमता घटते, दुधाचे उत्पादन अर्ध्या पेक्षा कमी होते, तसेच वजनात झपाट्याने घट होते.

लसीकरणाचे फायदे

जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता सुधारते. त्यांना विविध प्रकारच्या संक्रामक आजारांपासून संरक्षण मिळते.

जनावरांचे प्रजनन कार्य सुधारते, आणि उत्पादीत होणाऱ्या पिढ्यांमध्ये गुणवत्ता वाढवते.

आजाराचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे औषधोपचार आणि उपचाराच्या खर्चात बचत होते.

जनावरांची आरोग्य स्थिती सुधारते, ज्यामुळे दूध, मांस, किंवा अंडी उत्पादनात वाढ होते.

जनावरांचे सर्वांगीण स्वास्थ्य आणि जीवन गुणवत्ता सुधारते.

लसीकरण करतानाचे नियोजन

कोणत्याही जनावराला लसीकरण करण्यापूर्वी, आठवडाभर आधी जंतनाशक औषध द्यावे.

जनावरांच्या शरीरावरील गोचीड, गोमाश्या, उवा, लिखा, पिसवा इत्यादी कीटकांचे योग्य प्रकारे नियंत्रण करावे.

रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना क्षार व जीवनसत्त्वांचा पुरवठा करावा.

उत्तम रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना चांगला सकस आहार द्यावा.

पशूतज्ज्ञांच्या सल्याने सर्व गाभण जनावरांना लस देणे महत्त्वाचे आहे. विशेषत: आंत्रविषार व धनुर्वांताची लस गाभण शेळ्या-मेंढ्यांना दिल्यामुळे व्यायल्यानंतर जनावरांना व पिलांना हे आजार होत नाहीत. कारण, नवजात पिलांना चिकाद्वारे रोगप्रतिकारशक्ती मिळते.

Chart

लसीकरणामुळे येणारा ताप व शारीरिक ताण यांमुळे थोड्या प्रमाणात दूध उत्पादन कमी होऊ शकते; परंतु ते केवळ १ ते २ दिवसच राहते, नंतर पूर्वीप्रमाणेच दूध उत्पादन मिळते.

लसीकरण केलेल्या जनावरांमध्ये थोडे दिवस कॉरटीकोस्टेरॉईड/ प्रतिजैविकांचा वापर करू नये.

लसीकरण केल्यानंतर जनावरांचे अति उष्ण व अति थंड वातावरणापासून संरक्षण करावे. दूरवरची वाहतूक टाळावी.

लसीकरणानंतर जनावरांमध्ये ताप येणे किंवा मान न हलवणे अशी लक्षणे आढळतात; परंतु ही लक्षणे तात्कालिक व सौम्य स्वरूपाची असतात.

लस दिल्यानंतर मानेवर गाठी येऊ नयेत म्हणून लस दिलेल्या जागेवर लगेचच हलक्या हाताने चोळल्यास गाठ येत नाही. आलेल्या गाठीला कोमट पाण्याने शेकले, तर गाठ जिरून जाते.

मांसात द्यायच्या लशी मांसातच टोचाव्यात, तसेच कातडीखाली टोचायच्या लशी कातडीखालीच टोचाव्यात; अन्यथा गाठी येण्याचे प्रमाण वाढते.

लसीकरण करताना घ्यावयाची काळजी

लस ही नेहमी थंड, कोरड्या ठिकाणी ठेवावी. (फ्रीजच्या खालच्या कप्प्यात ठेवावी, बर्फाच्या कप्प्यात ठेवू नये.)

लस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करताना उघड्यावर न आणता थर्मासमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत बर्फात ठेवून आणावी.

उघड्यावरील लस जनावरांना टोचू नये. दोन वेगवेगळ्या लशी एकत्र मिसळून टोचू नयेत. कळपातील सर्वच जनावरांना एकाच वेळी लसीकरण करून घ्यावे. लसीकरणाच्या जागेवर टिंचर आयोडीन/ स्पिरिट लावू नये.Chart

Chart

लस खरेदी करताना चांगल्या कंपनीची लस खरेदी करावी. कालबाह्य झालेली लस वापरु नये.

जनावराला ठरवून दिलेल्या मात्रेमध्येच पशूतज्ज्ञाकडून लसीकरण करावे. स्वतः कमी किंवा जास्त मात्रा वापरु नये.

लसीकरण हे दिवसातील थंड वेळी (सकाळी किंवा सायंकाळी) करावे.

लसीकरणासाठी वापरली जाणारी सुई किंवा सीरिज या उकळत्या पाण्यात निर्जंतुक केलेल्या असाव्यात, त्यांना कोणतेही रसायन लावू नये.

लसीकरण करण्यासाठी तयार केलेली लस लवकरात लवकर वापरून संपवावी. शिल्लक लशीचा साठा करू नये.

लसीकरणासाठी योग्य वय

घटसर्प आणि फऱ्या या रोगांचे लसीकरण सहा महिन्यांच्या वासरांना किंवा त्यापेक्षा मोठ्या वयाच्या जनावरांत करावे.

लाळ्या खूरकूत आजाराच्या नियंत्रणासाठी लसीकरण जर वासराच्या आईला केले नसेल, तर सहा ते आठ आठवडे वयाच्या वासरांना व त्यापुढील जनावरांना करावे.

आंत्रविषार नियंत्रक लस वासराच्या आईला दिली नसेल, तर ती वासराला पहिल्या आठवड्यात द्यावी आणि दिली असेल, तर चार ते सहा आठवडे वयाच्या वासराला द्यावी.

लसीकरणानंतर आजार उद्भवण्याची कारणे

लसीची साठवणूक योग्य पद्धतीने (थंड जागेत) केली नसल्यास.

मात्रा योग्य प्रमाणात व योग्य ठिकाणी न दिल्यामुळे.

लसीकरणातील अनियमितता, कालबाह्य झालेल्या लशीचा वापर करणे किंवा शिल्लक राहिलेल्या लशीचा पुढील वर्षी वापर करणे.

अशक्त, आजारी जनावरांना लसीकरण केल्यास किंवा जनावरांत अंतर व बाह्य परोपजीवींचा प्रादुर्भाव असल्यास, तसेच जनावरांत जीवनसत्त्व व क्षारांची कमतरता असल्यास.

- डॉ. कृष्णा गिऱ्हे, ९९२२४१७०१८,

(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT