Dog Rabies Vaccination : राज्यातील १८ लाखांवर कुत्र्यांचे होणार रेबीजप्रतिबंधक लसीकरण

Zero Rabies Death : केंद्र सरकारच्या स्तरावर देशभरात ‘मिशन झीरो रेबीज डेथ’ राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. २०३० पर्यंत याअंतर्गत देश रेबीजमुक्‍त करण्यावर भर दिला जाणार आहे.
Dog Rabies Vaccination
Dog Rabies Vaccination Agrowon
Published on
Updated on

Nagpur News : केंद्र सरकारच्या स्तरावर देशभरात ‘मिशन झीरो रेबीज डेथ’ राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. २०३० पर्यंत याअंतर्गत देश रेबीजमुक्‍त करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी देशभरातील भटक्‍या आणि पाळीव कुत्र्यांचे लसीकरण केले जाणार आहे. राज्यात कुत्र्यांची संख्या सुमारे २२ लाख १२ हजार ०६४ असून त्यातील ८५ टक्‍के कुत्र्यांची रॅबीजप्रतिबंधक लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

जगातील १५० देशांत कुत्र्यांच्या चावण्यामुळे होणाऱ्या रेबीज विषाणूचा प्रसार व त्यातून होणारे मृत्यू ही समस्या गंभीर झाली आहे. जगभरात दरवर्षी सुमारे ७० हजारांवर व्यक्‍तींचा रेबीजमुळे मृत्यू होतो. भारतात १.७७ दशलक्ष इतक्‍या मोठ्या संख्येत कुत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून २५ लाख लोकांना चावा घेतला जातो. यातील पाच लाखांवर मुले असतात, असे अभ्यासाअंती समोर आले आहे.

कुत्रा चावल्यानंतर वेळीच उपचार न घेतल्याने दगाविणाऱ्यांची संख्या भारतात २७ हजारांवर आहे. २०२४-२५ या वर्षात हे प्रमाण कमी होत २० हजारांवर आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली. राज्यात २२ लाख १२ हजार ०६४ इतक्‍या मोठ्या प्रमाणावर कुत्री आहेत. ‘झीरो रेबीज डेथ’ मोहिमेअंतर्गत राज्यातील या कुत्र्यांचे लसीकरण केले जाणार आहे.

Dog Rabies Vaccination
Animal Vaccination :लसीकरण वेळापत्रक घातक आजारांपासून संरक्षणाची महत्वाची पावले

त्याकरिता पहिल्या टप्प्यात राज्याला कुत्र्यांना देण्यासाठी म्हणून रॅबीजप्रतिबंधचे सुमारे १८ लाख १२ हजार डोज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिसरात पशुसंवर्धन विभाग मोहीम राबवीत लसीकरणाचे काम करणार आहे. त्याकरिता अशासकीय संस्थांची मदत घेण्याचे देखील प्रस्तावित आहे.

Dog Rabies Vaccination
Animal Vaccination : जनावरांना आत्ताच लसीकरण करा ; पावसाळ्यातील घातक आजार टाळा

राज्यातील ग्रामपंचायत हद्दीत देखील ग्रामपंचायत प्रशासनाच्या सहकार्याने मोहीम राबविण्यावर भर देण्याचे निर्देश आहेत. सरासरी ७० टक्‍के लसीकरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत व्हावे, असे अपेक्षित आहे. उपलब्ध लसींच्या डोजचा विचार करता माध्यमातून राज्यातील ८५ टक्‍के कुत्र्यांचे रेबीजप्रतिबंधक लसीकरण शक्‍य होणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्‍त प्रवीणकुमार देवरे यांनी दिली.

...अशी आहे विभागनिहाय कुत्र्यांची संख्या (पाळीव-- मोकाट--एकूण)

मुंबई ः १,७४,९०८--१,९४,०४१--३,६७,९४९

नाशिक ः १,३३,०९७--२,०४,१७१--३,३७,२६८

छत्रपती संभाजीनगर ः ८८२०२--१,२४,७६१--२,१२,९६३

लातूर ः ७२३८७--१,१९,२००--१,९१,५८७

अमरावती ः ६६१७६--१,७८,५९२--२,४४,७६८

नागपूर ः १,०१,३३१--१,०३,११७--२,०४,४४८

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३० पर्यंत देश रेबीजमुक्‍त करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील २० लाखांपेक्षा अधिक कुत्र्यांचे लसीकरणासाठी रेबीजप्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात या माध्यमातून ८५ टक्‍के कुत्र्यांचे लसीकरण होईल.
- डॉ. वाय. ए. पठाण, सहआयुक्‍त, पशुसंवर्धन विभाग, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com