Animal Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Vaccination : पुणे जिल्ह्यात १८ लाख ८४ हजार जनावरांचे लसीकरण

Animal Care : पावसाळ्यापूर्वी जनावरांमधील विविध आजारांच्या लसीकरणाची मोहीम पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हाती घेतली होती.

Team Agrowon

Pune News : पावसाळ्यापूर्वी जनावरांमधील विविध आजारांच्या लसीकरणाची मोहीम पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हाती घेतली होती. जिल्ह्यात आत्तापर्यंत १८ लाख ८४ हजार २०५ जनावरांना विविध आजारांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी दिली.

जिल्ह्यात एकूण २० लाख ११ लाख ४३१ एवढे गाय, म्हैस, बैल आणि शेळ्या मेंढ्या आहेत. यामध्ये गाय म्हैस आणि बैलाची संख्या ही ११ लाख ४४ हजार ८९३ एवढी आहे. तर शेळ्या मेंढ्यांची संख्या ८ लाख ६६ हजार ५३८ एवढे आहेत. मात्र, गेल्या काही वर्षात जनांवरामधील लम्पी स्किन, घटसर्प, फऱ्या, पीजीआर अशा विविध आजारांनी डोके वर काढले आहे.

या आजारांमुळे अनेक जनावरे दगावतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. ते होऊ नये, यासाठी पुणे जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी जनावरांमधील घटसर्प, फऱ्या, तर शेळ्यांमधील आंत्रविषार, पीजीआर लम्पी स्किन अशा आजारांवर लसीकरण करण्यात येऊ लागले आहे. यंदाही या आजारांवरील लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली आहे. जून महिना लागल्याने त्याचा फायदा दिसून येतो. त्यामुळे या आजारामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होते.

गेल्या एक महिन्यापासून जिल्ह्यातील अनेक भागांत लम्पी स्किन या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनावरांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. उष्ण व आर्द्र हवामानात या रोगाचा जास्त प्रसार होतो. या रोगाची बाधा गाय व म्हैस वर्गातील सर्व वयोगटाच्या जनावरांना होते. लहान वासरांमध्ये रोगाची तीव्रता अधिक दिसून येते. या रोगाचा प्रसार साधारण १० ते २० टक्के जनावरांमध्ये होतो.

देशी जनावरांपेक्षा संकरीत जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. त्यामुळे चालू वर्षी तब्बल पाच लाख ४८ हजार ५३५ शेळ्या, मेंढ्यांना लम्पी आजाराचे लसीकरण करण्यात आले आहे. तर, पीजीआरचे सात लाख ४१ हजार ४२४, आंत्र विषाराचे १ लाख ४८ हजार ४८२ शेळ्या मेंढ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. जनावरांमधील घटसर्प आणि फऱ्याचे चार लाख ४५ हजार ७६४ जनावरांचे लसीकरण केले आहे.

दर वर्षी पावसाळ्यात जनावरांमधील आजार हे वाढताना दिसून येतात. त्यामुळे शेतकऱ्याकडे असलेल्या पशुधनाचे मोठे नुकसान होते. हे नुकसान काही हजारांमध्ये असते. हे होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लसीकरण करण्यात आले आहे. जुलैनंतर लाळ्या खुरकतीचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.
- डॉ. विष्णू गर्जे, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

Farmer Compensation: भरपाईतही नव्या दरामुळे फटका

Leopard In Solapur: बिबट्यांची संख्या पन्नास की शंभर?

White Grub Infestation: हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

Onion Farmers: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT