Yashvantrao Gadakh Agrowon
काळजी पशुधनाची

Nagar Cow Death : संकट येतात, जिद्दीने काम सुरू ठेवा, पाठीशी आहोत

जिद्दीने काम सुरू ठेवा, आम्ही पाठीशी आहेत,’’ असा सल्ला देत नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी लोहगाव (ता. नेवासा) येथील रोहिदास ढेरे यांना आधार दिला आहे.

टीम ॲग्रोवन

‘‘संकट तर येतच असतात, त्याला धैर्याने तोंड द्यावे लागते. तुझ्यावर अचानक संकट आले तरी खचून जाऊ नको, जिद्दीने काम सुरू ठेवा, आम्ही पाठीशी आहेत,’’ असा सल्ला देत नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी लोहगाव (ता. नेवासा) येथील रोहिदास ढेरे यांना आधार दिला आहे.

गडाख कुटुंबाकडून ढेरे यांना दीड लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.लोहगाव येथील रोहिदास ढेरे यांच्या गोठ्यातील २९ पैकी २२ मोठ्या गाईंना विषबाधा (Poisoning To Cow) होऊन दगावल्या आहेत.

चाऱ्यातून विषबाधा झाल्याने एकापाठोपाठएक अशा आठ दिवसांत सुमारे २२ गाईंचा मृत्यू झाला. सुरुवातीला पाच गाईंचा मृत्यू झाल्यानंतर उर्वरित गाईंवर उपचारासाठी तीन लाख औषधांवर खर्च केला, तरीही गाई दगावल्या. ढेरे कुटुंबाला सावरण्यासाठी परिसरातील दूध उत्पादक, गावकरी, व संस्थांच्या पुढाकाराने दोन दिवसांपूर्वी त्यांना तीनलाख रुपयांची मदत करण्यात आली.

शुक्रवारी (ता.३०) माजी खासदार व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी रोहिदास ढेरे, रामदास ढेरे, सारंगधर ढेरे, कुशिनाथ ढेरे यांच्याकडे दीड लाखांची मदत दिली. या वेळी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष विश्वासराव गडाख, मुळा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, माजी संरपंच भाऊसाहेब राजळे,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

VB-G RAM G : अपयशाच्या स्मारकाचे नामांतर

Livestock Care: वाढत्या थंडीमध्ये पशुधनाची काळजी

Nagpur Winter Session: गारठलेले विरोधक अन् सुसाट सत्ताधारी

Pomegranate Export: वाशीतून डाळिंबांचा पहिला कंटेनर अमेरिकेला रवाना

Wheat Sowing: पुणे विभागात गहू पेरणी ८२ टक्क्यांवर

SCROLL FOR NEXT