dairy cow lactation curve  agrowon
काळजी पशुधनाची

दुधासाठी दुसऱ्या वेतातील जनावरे का निवडावीत?

दुग्ध व्यवसायासाठी जनावरे निवडताना नेहमी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातील जनावरे निवडावीत. वेतानुसार दूध उत्पादनात वाढ होत असते.

Team Agrowon

दुग्धव्यवसाय आर्थिक दृष्ट्या परवडण्यासाठी आपल्या गोठ्यात जातिवंत दुधाळ गायी-म्हशी (cow buffalo) असल्या पाहिजे. दुधाळ जनावरांचे काही खास गुणधर्म असतात. या गुणधर्माचा विचार करूनच जनावरांची खरेदी केली पाहिजे. फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी एका वेतातील गायीचे दूध उत्पादन साधारणपणे कमीतकमी ३६०० लिटर असायला हवे.

दुधाच्या व्यवसायासाठी जनावरे निवडताना नेहमी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातील (lactation) जनावरे निवडावीत. त्यांचे वय साधारणपणे ३ ते ४ वर्षाचे असावे. कोणत्याही दुधाळ जनावरांमध्ये एका ठराविक वयापर्यंत, वेतांमध्ये दूध उत्पादन (milk production) वाढत जाते.

पहिलारू कालवड असल्यास पहिल्या वेतापेक्षा दुसर्‍या वेतात दूध उत्पादनात वाढ दिसून येते. जनावरांच्या वयानुसार त्यांच्या वजनात वाढ होत असते. कासेची वाढ देखील चांगली होत असते. सडाचे आकारमान वाढत असते. यासर्व कारणामुळे जनावरांच्या दूध उत्पादन क्षमतेत आधीच्या वेताच्या तुलनेत वाढ दिसून येते.

साधारणपणे गायी-म्हशी त्यांच्या पूर्णक्षमतेनुसार जास्तीत जास्त दुधाचे उत्पादन हे चौथ्या आणि पाचव्या वेतात देत असतात. पुढील वेतातील दूध उत्पादन स्थिर राहून त्यापुढील वेतातील दुधाचे उत्पादन कमी-कमी होत जाते. सर्वसाधारणपणे आपल्याकडील दुधाळ जनावरे चौथ्या किंवा पाचव्या वेतात किती दुधाचे उत्पादन देऊ शकतील. याचा अंदाज पशुपालक पहिल्या वेतातील दूध उत्पादनावरून बांधू शकतात.

यासाठी खालील सुत्राचा वापर करावा-

चौथ्या किंवा पाचव्या वेतातील दूध उत्पादन काढण्यासाठी = पहील्या वेतातील एकुण उत्पादन X १.३

पहिलारू गायीचे पहिल्या वेतातील दूध उत्पादन २००० किलो इतके आहे.

तर चौथ्या किंवा पाचव्या वेतात ती गाय

२००० X १.३ = २६०० किलो दुधाचे उत्पादन देईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT