Animal  Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Heatstroke : जनावरांतील उष्माघाताची लक्षणे

Animal Care : जनावर एका विशिष्ट तापमानापर्यंत शरीराचे तापमान नियंत्रण करू शकतात. पण एका विशिष्ट कालावधीनंतर शरीर तापमान नियंत्रण करू शकत नाही आणि त्यामुळे उष्माघात होतो. उष्माघातामुळे डोळे खोल जातात, नाकपुडी कोरडी होते.नाडी आणि श्वसनाची गती वाढते. ही लक्षणे दिसतात तातडीने उपाययोजना करावी.

Team Agrowon

डॉ.कैवल्य देशमुख, डॉ.मीरा साखरे

Animal Heatstroke Management : वाढत्या उन्हामुळे जनावरांना उष्माघात, नाकातील रक्तस्राव,अपचन, विषबाधा दिसून येते. चाऱ्याची कमतरता, पाणी टंचाई याचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

वाढत्या तापमानामुळे जनावरांवर ताण येतो आणि चारा-पाणी खाणे कमी करतात. रवंथ कमी करतात. दूध उत्पादनात घट होते, वाढीवर परिणाम होतो, लवकर थकतात, शरीराची कातडी निस्तेज होते, गाभण राहात नाही, प्रजनन क्षमतेवर परिणाम दिसून येतात.

उष्माघात हा गाय, म्हैस, शेळी, मेंढी, श्वान, कोंबडी सर्व पाळीव प्राण्यात होऊ शकतो. उष्माघात म्हशींमध्ये जास्त होतो, कारण त्यांच्या त्वचेवरून सूर्यकिरणे परावर्तित होत नाहीत आणि कातडीत शोषले जातात.

म्हशींमध्ये घामग्रंथी कमी असतात. उष्माघात संकरित गाईंमध्ये देखील मोठ्या प्रमाणात दिसतो. जनावरांमध्ये तापमान नियंत्रित करण्याचे कार्य मेंदूतील हायपोथॉलेमस करते. जनावर एका विशिष्ट तापमानापर्यंत शरीराचे तापमान नियंत्रण करू शकतात. पण एका विशिष्ट कालावधीनंतर शरीर तापमान नियंत्रण करू शकत नाही आणि त्यामुळे उष्माघात होतो.

उष्माघात होण्याची कारणे

वातावरणातील तापमान वाढ.

शरीराचे तापमान नियंत्रित न करता येणे.

शरीरातील उष्णता बाहेर न पडणे.

इतर संसर्गजन्य आजार.

उष्माघाताची लक्षणे

पाणी तसेच चारा कमी खातात.

डोळे खोल जातात, नाकपुडी कोरडी होते.

नाडीची गती आणि हृदयाची गती वाढते.

श्वसनाची गती वाढणे, उघड्या तोंडाने श्वास घेणे.

बैल काम केल्यावर लवकर थकतात.

आतड्याची हालचाल कमी होते.

पचनक्रिया बिघडते, शेण घट्ट येते.

लघवी गडद पिवळ्या रंगाची येते. त्वचा कोरडी निस्तेज दिसते

दूध उत्पादनात घट येते.

वाढत्या वयाच्या वासरात वाढीवर परिणाम होतो.

गाय, म्हैस गाभण न राहणे, प्रजनन क्षमता कमी होते, दोन वेतातील अंतर वाढते, लवकर माजावर न येणे.

जनावर लवकर आजारास बळी पडते.

उपाययोजना

उन्हाच्या वेळेस सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जनावरांना झाडांच्या सावलीत (आंबा,वड,पिंपळ,चिंच) बांधावे. चारा खाण्याच्या वेळेत बदल करून त्यांना सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ ते ६ या वेळेस चरावयास सोडावे.

जनावरांना ऊर्जायुक्त खाद्य द्यावे. खाद्यात जीवनसत्त्व अ,ड,ई,क द्यावे. शक्य असल्यास २४ तास थंड पाणी द्यावे. दिवसातून चार-पाच वेळा पाणी पाजावे. खाद्यात हिरवा चारा मका, बरसीम, चवळीचा वापर करावा.

गोठ्याचा मुख्य भाग उत्तर-दक्षिण असावा.त्यामुळे सूर्यप्रकाश थेट येणार नाही. गोठ्यातील हवा खेळती असावी. गोठ्याभोवती सावली देणारी झाडे लावावी. गोठ्यात तापमान -आर्द्रता निर्देशांक दर्शविणारे थर्मामिटर असावे.

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी गोठ्यात पंखे लावावेत. जनावराच्या अंगावर थंड पाण्याचा सुती कपडे, पोते टाकावे.

वातावरणातील जास्तीच्या तापमानामुळे जनावरांची हालचाल कमी होते. परिणामी पचनसंस्थेचे आजार होऊ शकतात. पचनक्रिया सुधारण्यासाठी जनावरांना दररोज १ ते २ लिटर ताक पाजावे. पाण्यातून क्षार द्यावेत. जनावरांना ५ लिटर पाण्यात २५ ते ५० ग्रॅम गूळ, १० ग्रॅम मीठ आणि ५ ग्रॅम क्षार मिश्रण द्यावे.

संसर्गजन्य आजाराची खात्री करून घ्यावे. उष्माघात कमी होत नसल्यास इतर आजारासाठी पशुवैद्यकाकडून तपासणी करून घ्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT