Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumy Skin : लम्पी स्कीन प्रादुर्भावामुळे नाशिकमधील कत्तलखाने बंद

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने त्यासंदर्भात महापालिकेला आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिसूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्य लम्पी स्कीन आजाराकरिता नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

टीम ॲग्रोवन

नाशिक : लम्पी स्कीन त्वचा (Lumpy Skin Disease)आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिका हद्दीतील महात्मा फुले मार्केट व भद्रकाली येथील कत्तलखान्यांमध्ये म्हैसवर्गीय जनावरांच्या कत्तलीवर निर्बंध लावले आहेत. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन (Livestock) विभागाने त्यासंदर्भात महापालिकेला आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिसूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्य लम्पी स्कीन आजाराकरिता नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात सर्व गुरे, म्हशी नियंत्रण क्षेत्रातील आणि त्या बाहेरील अन्य ठिकाणी ने-आण करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.

त्या अनुषंगाने आणि लम्पी स्कीन आजाराचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महापालिका कार्यक्षेत्रातील महात्मा फुले मार्केट आणि भद्रकाली येथील कत्तलखान्यामध्ये म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या नाशिक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयानेदेखील नाशिक महापालिकेला कत्तलखाने बंद ठेवण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. लम्पी स्कीन आजाराच्या पार्श्वभूमीवर महापालिका खबरदारी घेत असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.गोजातीय प्रजातीची बाधित असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय

प्रजातीच्या कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य अशा प्राण्यांचे शव कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन नियंत्रीत क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात आली आहे.

गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशींचा कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रीत क्षेत्रात गोजातीय प्रजातींचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात येत आहे. असे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी काढले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: शेवगा भाव नरमले; सोयाबीन स्थिरावले, कापसात चढ उतार, केळीचे दर टिकून तर गवार तेजीतच

PM Kisan Yojana: अर्थसंकल्पात 'पीएम किसान'साठी किती तरतूद?; २२ वा हप्ता 'या' तारखेला मिळू शकतो

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसीतील चुकीमुळे लाभ बंद झालेल्या महिलांसाठी दिलासा! शासन फेरपडताळणी सुरू करणार

Ambeohol Dam Project Issue: आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचे भिजत घोंगडे

Union Budget 2026: काजू, नारळावर भर; शेतकऱ्यांसाठी ठोस धोरण नाही

SCROLL FOR NEXT