Bulls Agrowon
काळजी पशुधनाची

बैल बाजारात दोनच दिवसात सहाशे बैलांची विक्री

खानदेशात प्रसिद्ध असलेल्या तळोदा शहरातील यात्रोत्सवातील बैल बाजारात एक हजार ते बाराशे बैल विक्रीसाठी आणण्यात आले होते.

अॅग्रोवन वृत्तसेवा

तळोदा, जि. नंदुरबार : येथील ग्रामदैवत कालिका मातेच्या यात्रोत्सवात भरलेल्या बैलबाजारात दोनच दिवसांत सहाशे बैलांची विक्री झाली असून, त्यातून जवळपास ७० लाखांची उलाढाल झाली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे बैल बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साह असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे बैल बाजाराची उलाढाल अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खानदेशात प्रसिद्ध असलेल्या तळोदा शहरातील यात्रोत्सवातील बैल बाजारात एक हजार ते बाराशे बैल विक्रीसाठी आणण्यात आले होते. शेतकऱ्यांची बैल खरेदीसाठी यात्रेला नेहमीच पसंती असते. जून महिन्यात खरीप हंगाम सुरू होत असल्याने शेतकरी येथूनच बैलाची खरेदी-विक्री खरेदी करण्याचे पसंत करतात.

गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातील तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार येथील व्यापाऱ्यांनी बैलजोडी विक्रीसाठी आणले आहेत. सातपुडा पर्वतात उताराच्या जमिनीवर चालू शकणाऱ्या बैलांची देखील येथे मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होते. त्यामुळे सातपुड्यातील शेतकऱ्यांनी देखील हजेरी लावली आहे. बैलांची विक्रीसाठी संख्या बघता चारा विक्रीतून मोठा रोजगार मिळाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने सोयीसुविधा पुरविल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Traditional Fisherman : पांरपरिक मच्छीमारांची मालवण येथील कार्यालयावर धडक

Wild Vegetables : गावागावांत रानभाजी महोत्सव व्हावा : पाटील

Crop Loan : बँकांनी सर्व कर्जाचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करावे

Onion Cultivation : कांदा लागवडीला वेग; क्षेत्र घटण्याची शक्यता

Girna River : गिरणा परिसरातील सर्वच बंधारे तुडुंब

SCROLL FOR NEXT