goat selection criteria
goat selection criteria Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Farming : शेळीपालनासाठी शेळी आणि बोकडाची निवड कशी करावी?

Roshani Gole

शेळीपालन (goat farming) व्यवसायासाठी शेळ्यांची निवड करताना हा व्यवसाय मांस (mutton) उत्पादनासाठी, प्रजननासाठी (breeding) कि दूध उत्पादनासाठी (milk production) करायचा आहे. याबबत शेळीपालकांचे मत स्पष्ट असले पाहिजे. शेळीची किंवा बोकडाची निवड करताना कमी वयाच्या मादीची आणि नराची निवड करावी. असे केल्याने त्यांचे जास्तीत जास्त पैदासक्षम आयुष्य आपल्या गोठ्यात जाईल.

मांस उत्पादनासाठी शेळीपालन करायचे झाल्यास, जास्त वजन वाढ देणाऱ्या शेळीची किंवा बोकडाची निवड करावी. दूध उत्पादनासाठी करायच असल्यास चांगल्या दुधाचे उत्पादन देणाऱ्या शेळ्यांची निवड करावी. ब्रीडिंगसाठी करायचा असल्यास, नर आणि मादी दोघांचे गुणधर्म उत्तम असले पाहिजेत.

शेळीची खरेदीसाठी निवड करताना प्रथम तिचे वय लक्षात घ्यावे. प्रत्येक वेळी शेळी विकत घेऊन तिचं संगोपन करण्यापेक्षा आपल्या गोठ्यातच चांगल्या प्रतीच्या शेळ्यांची जोपासना करावी हे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरेल.

शेळी निवडताना लांबट, उंच आणि जातिवंत शेळीची निवड करावी. बोकड निवडताना तो जुळ्यातील किंवा तिळ्यातील जन्म झालेला असावा. यामुळे आपल्या कळपातील शेळ्यांना जुळे किंवा तिळे होण्याचे प्रमाण वाढते. अधिकाधिक उत्पादनासाठी शेळीपासून दोन वर्षात ३ वेत मिळालीच पाहिजेत.

नर हा उंच, वजनदार आणि चपळ निवडावा. प्रजननासाठी नराची निवड केल्यानंतर तो अठरा महिन्याचा झाल्यावर शेळीला दाखवावा. ज्या ठिकाणी शेळ्यांमध्ये गर्भपाताचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणचा नर वापरू नये.

शेळी लठ्ठ नसावी, चपळ असावी. शेळी धष्टपुष्ट आणि निरोगी असली पाहिजे. शेळी दोन किंवा दोनपेक्षा जास्त पिल्लांना एका वेळेस जन्म देणारी असावी. शेळी उभी राहताना तिचे पाय एकमेकांस समांतर आणि मजबूत असले पाहिजेत. शेळीचे तोंड लांब असावे. मान लांब पातळ आणि खांद्याशी जुळलेली असावी. शेळीचे सड लांबट व मऊ असावेत, कासेची शरीराशी घट्ट बांधणी असावी. शेळी खरेदी करताना शक्यतो दोन दाती व एक वेत दिलेली शेळी विकत घ्यावी.

शेळीची निवड करताना शेपटीजवळील दोन हाडातील अंतर जास्त असले पाहिजे. त्यामुळे शेळीला विताना अडचण येणार नाही. शेळीला वरून पहिले असता, जमिनीकडे जाणारा आकार जेवढा मोठा तेवढी शेळीची गुणवत्ता चांगली समजावी. शेळीला पाठीमागून पाहिल्यास, पाठीमागून पुढचा भाग निमुळता होणारा, त्रिकोणाकृती पाचरीच्या आकाराचा असावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT