Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : सांगली जिल्हा ‘लम्पी’साठी नियंत्रित क्षेत्र घोषित

वाळवा तालुक्यातील शेखरवाडी येथील चार संकरित गाई व चिकुर्डे गावातील एका लम्पीसदृश बाधित संकरित गाईच्या रक्ताचे, नाकातील स्रावाचे व अंगावरील नोड्यूलचे नमुने प्रयोगशाळेतून लम्पी स्कीन आजारासाठी पॉझिटिव्ह आले आहेत.

टीम ॲग्रोवन

सांगली ः वाळवा तालुक्यातील शेखरवाडी येथील चार संकरित गाई व चिकुर्डे गावातील एका लम्पीसदृश बाधित (Lumpy Skin Infected) संकरित गाईच्या रक्ताचे, नाकातील स्रावाचे व अंगावरील नोड्यूलचे नमुने प्रयोगशाळेतून लम्पी स्कीन आजारासाठी (Lumpy Skin Disease) पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी संपूर्ण जिल्हा जनावरांमधील लम्पी स्कीन आजारासाठी नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.

लम्पी चर्मरोगावर नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निर्मूलन करता येईल आणि गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी यांची, ज्या ठिकाणी ते पाळले जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. गोजातीय प्रजातीची बाधित असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी, बाधित प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गावात किंवा अन्य साहित्य आणि अशा बाधित प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी, नियंत्रित क्षेत्राबाहेर नेण्यास कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात आली आहे.

प्रयोगशाळा निदानामध्ये जिल्ह्यातील ज्या भागांतील पशुपालकांच्या गोजातीय व म्हैसजातीय प्रवर्गातील जनावरांना लम्पी त्वचा आजाराची लागण झाल्याचे निष्कर्ष पॉझिटिव्ह येतील अथवा बाह्य लक्षणांवरून आजाराचे निदान झाल्याची खात्री झाल्यास अशा ठिकाणापासून पाच किलोमीटर त्रिज्येच्या परिघामधील सर्व संक्रमित न झालेल्या जनावरांचे रिंग पद्धतीने लसीकरण करून रोगाचा फैलाव इतरत्र होणार नाही, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी कराव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत.

‘गोकुळ’, ‘वारणा’कडून जनावरांना मोफत लसीकरण

लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ व वारणा दूध संघाकडून जनावरांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. ‘गोकुळ दूध संघाच्या सर्व पशुवैद्यकीय केंद्रांवर लसीकरणाची सुविधा आहे. पशुवैद्यकीय केंद्रांवर लसपुरवठा करण्यासंबंधी नियोजन केले आहे,’ अशी माहिती गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली. गोकुळ दूध संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी एल. एस. एस. व कृत्रिम रेतन सेवक यांच्यामार्फत मोफत लसीकरण करण्यात येत आहे. ‘या लसीकरणामध्ये प्राथमिक दूध संस्थांनी पुढाकार घ्यावा’, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

वारणा दूध संघाच्या वतीने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील वारणा दूध संघास दूधपुरवठा करणाऱ्या उत्पादकांच्या ३ लाख जनावरांना विनामूल्य लस देणार असल्याचे संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यात २५ हजार व कोल्हापूर जिल्ह्यात २० हजार जनावरांना मोफत लस दिली असल्याचेही डॉ. कोरे यांनी सांगितले. जनावरांमध्ये लम्पी स्कीनचा आजार वाढत असला, तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. तीन लाख लसी खरेदी केल्या आहेत, असे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

Cotton Market Price: कापूस दबावातच; तसेच काय आहेत सोयाबीन, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खरबुजाचे आजचे बाजारभाव

Crop Damage Survey: आंबा, काजू नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू

SCROLL FOR NEXT