FMD Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

FMD Vaccine : लाळ्या खुरकूत, ब्रुसेल्ला लसीकरणाचे आवाहन

केंद्र व राज्य शासनाने राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४ ते ८ महिने वयोगटातील मादी वासरांना लसीकरण सुरू आहे.

टीम ॲग्रोवन

सांगली ः राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २०२४-२५ पर्यंत लाळ्या खुरकूत (FMD Disease) आणि सांसर्गिक गर्भपात (ब्रुसेल्ला) या दोन्ही रोगांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण साध्य करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत लाळ्या खुरकूत आजार प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या मोहिमेत पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. एस. बेडक्याळे यांनी केले आहे. केंद्र व राज्य शासनाने राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४ ते ८ महिने वयोगटातील मादी वासरांना लसीकरण सुरू आहे.

तसेच ४ महिने वयोगटावरील सर्व लहान मोठ्या गाय व म्हैस वर्ग जनावरांतील लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लसीकरण १९ डिसेंबरपासून सुरू आहे. पशुपालकांनी त्यांच्याकडील ४ महिने वयोगटावरील सर्व लहान मोठ्या गाय व म्हैस वर्ग जनावरांना लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लसीकरण, ४ ते ८ महिने वयोगटातील मादी वासरांना व रेडकांना सांसर्गिक गर्भपात (ब्रुसेल्ला) या आजारावरील लसीकरण करून घ्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture FPO: कवठेत कृषी प्रक्रिया, उपक्रमांची ‘समृद्धी’

Onion Planting Machine: कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची यंत्राला पसंती

Safflower Cultivation: करडई पिकाची लागवड १५१ टक्क्यांवर

Guava Farming: पेरूतून मिळविले आर्थिक स्थैर्य

Bedana Price: बेदाण्यात किलोमागे १५ ते २० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT