Livestock Market Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Market : आळेफाटा येथील बाजारात २०९ गाईंची विक्री

Animal care : आळेफाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ७) झालेल्या गाईंच्या बाजारात २०९ च्यावर झाली आहे.

Team Agrowon

Pune News : आळेफाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ७) झालेल्या गाईंच्या बाजारात २०९ च्यावर झाली आहे. जिल्ह्यात सर्वात मोठा गाईंचा बाजार जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या आळेफाटा येथील उपबाजारात दर गुरुवारी भरत असतो. येथील बाजारात पारनेर, अकोले, पुणे, नाशिक, संगमनेर, ठाणे, अहमदनगर तसेच इतर ठिकाणांहून संकरित दुधाळ जातीच्या गाई विक्रीसाठी येत असतात.

या आठवड्यात भरलेल्या बाजारात २१४ संकरित गाई विक्रीसाठी आल्या होत्या. यामध्ये १९१ गायींची विक्री होऊन २० हजारांपासून ७० हजार रुपयांपर्यंत विक्री झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे, संचालक नबाजी गाडगे, सचिव रुपेश कवडे आणि आळेफाटा येथील कार्यालय प्रमुख प्रशांत महाबरे यांनी दिली.

दरम्यान गेल्या आठवड्यात या परिसरात पाऊस चांगला झाला असल्याने जनावरांसाठी चारा, पाणी उपलब्ध झाल्याने येथील गाई बाजारात या आठवड्यात दूध गवळी, शेतकरी तसेच व्यापा ऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून येत होती.

दुधाचे बाजारभाव उतरले असले तरी गाईंच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असून किमतीत देखील वाढ झालेली आहे, अशी माहिती रुपेश कुऱ्हाडे, अमोल कुऱ्हाडे, सलमान तांबोळी, दिलीप सरमाळे, विजय थोरात, अमोल मोडवे, सिकंदर शेख, नन्नु शेख या व्यापाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT