Radhika Mhetre
शरीराच्या सामान्य दैनंदिन कामासाठी कॅल्शिअम १६ ग्रॅम प्रति दिवस आणि फॉस्फरस ७ ग्रॅम प्रति दिवस याप्रमाणे गरज असते.
सामान्य चयापचय, दूध उत्पादन, पुनरुत्पादन आणि शरीर प्रणालीच्या विकासासाठी आवश्यक आहे.
गर्भधारणा, पुनरुत्पादनासाठी महत्त्वाचा घटक आहे. गर्भधारणेदरम्यान मॅग्नेशिअम आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोनचे प्रमाण यांच्यात थेट संबंध दिसतो.
प्रथिने, हार्मोन आणि एन्झाइम्ससाठी महत्त्वाचा घटक. चयापचय प्रक्रियेसाठी नायट्रोजन, सल्फर योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे.
कमतरतेमुळे पचनसंस्था सुरळीतपणे कार्य करत नाही. साधारणपणे १ ते २ टक्के प्रमाणात पशुखाद्य आणि धान्य मिश्रणात मिसळावे.
लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन परिपक्वतासाठी आवश्यक. कमतरतेमुळे अशक्तपणा येतो. लोकरीच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. माजास विलंब होतो.
जनावरांची वाढ, गर्भधारणा, प्रजनन क्षमता आणि कंठ ग्रंथीसाठी महत्त्वाचे. कमतरतेमुळे गलगंड, प्रजनन समस्यांमध्ये स्त्रीबीजांचा विलंब, वंध्यत्व आणि वजन वाढणे ही लक्षणे दिसतात. गर्भपाताची शक्यता असते.
हिमोग्लोबिन आणि मसल मायोग्लोबिन संश्लेषणासाठी आवश्यक घटक. कमतरतेमुळे शरीराचे तापमान कमी राहते.