Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Heatstroke : उष्माघातापासून जनावरांचे संरक्षण

Animal Care : उन्हाळ्यात शक्यतो जनावराला सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा चारण्यासाठी सोडावे. जनावरांच्या चाऱ्यामध्ये जास्तीत जास्त हिरव्या चाऱ्याचा (मका) वापर करावा. जेणेकरून त्यांची पचनक्रिया व्यवस्थित राहाते. पोटाचे आजार होणार नाहीत.

Team Agrowon

डॉ. रविराज सूर्यवंशी,डॉ.अनिल पाटील

Protection of Animals from Heatstroke : पशू आरोग्याचा विचार केला तर उन्हाळ्याच्या काळात (मार्च ते मे महिना) जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे. जनावराला दिवसभर मुबलक व स्वच्छ पाणी असावे.

गोठ्याची उंची जास्त असावी, जेणेकरून नैसर्गिक हवा मोकळेपणाने मिळते. गोठा थंड राहण्यास मदत होते. छपराचा गोठा असल्यास त्यावर पालापाचोळा किंवा ताडपत्री टाकावी जेणेकरून तापमान वाढणार नाही.

संकरित गायीच्या गोठ्यात फॉगर्स लावावेत. यामुळे गोठा आणि जनावरांच्या शरीराचे तापमानाचे संतुलन राहण्यास मदत होते. उष्माघातापासून संकरित गाईचे संरक्षण होते. गोठ्याच्या सभोवती झाडे असावीत.त्यामुळे गोठा थंड आणि आरामदायी असेल.

उन्हाळ्यात शक्यतो जनावराला सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा चारण्यासाठी सोडावे, जेणेकरून आपण जनावरांना उष्मघातापासून दूर ठेवू शकतो. पाणी साठवण्याचे हौद चुन्याने रंगवावा. त्यामध्ये तुरटी फिरवल्यास पाणी स्वच्छ व निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते. दररोजच्या पाण्यामध्ये मीठ व थोडा गूळ (प्रत्येकी ५० ग्रॅम अंदाजे) टाकल्यास त्यामुळे जनावरे जास्तीत जास्त पाणी पितात.

जनावरांच्या चाऱ्यामध्ये जास्तीत जास्त हिरव्या चाऱ्याचा (मका) वापर करावा. जेणेकरून त्यांची पचनक्रिया व्यवस्थित राहाते. पोटाचे आजार होणार नाहीत.

माजावर आलेल्या जनावरांचे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा रेतन करावे. या जनावरांची योग्य काळजी घ्यावी.

दुभत्या जनावरांमध्ये योग्य पशुआहार, हिरवा चारा, मुरघासाचा वापर, खनिज मिश्रण व वेळोवेळी जंतनाशक औषधांचा वापर केल्यास संकरित जनावरे आजारी पडत नाहीत.

शेतीमध्ये मशागत करण्याऱ्या बैलांकडून सकाळी किंवा संध्याकाळी कामे करून घ्यावीत, जेणेकरून त्यांना उष्माघात होणार नाही. उष्माघाताची लक्षणे म्हणजे डोळे लाल होणे, भूक मंदावते, नाकपुडी कोरडी होणे , शरीराचे तापमान वाढणे, नाकातून रक्त येणे, श्वास जोरात घेणे, धापा टाकणे, चक्कर आल्यासारखी वाटते.

उष्णतेचा ताण सर्व उच्च तापमानाशी संबंधित ताण दर्शवतो, ज्यामुळे जनावरांच्यामध्ये थर्मोरेग्युलेटरी बदल होतात. अति उष्ण दमट किंवा उष्ण कोरड्या हवामानात, घाम गाळून आणि धापा टाकून उष्णता नष्ट करण्याची जनावरांची थर्मोरेग्युलेटरी क्षमता धोक्यात येते आणि उष्णतेचा ताण निर्माण होतो. तीव्र उष्णतेच्या ताणामुळे शरीराचे तापमान वाढते, नाडीचा वेग वाढतो, परिघीय रक्त प्रवाह वाढतो, खाद्याचे सेवन कमी होते आणि पाणी पिण्याचे प्रमाण वाढते.

उष्माघात प्रतिबंधात्मक उपाय :

जनावरांना सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत चारण्यासाठी सोडू नये.

खाद्यामध्ये वाळलेला चाऱ्याचा जास्तीचा उपयोग करू नये. हिरव्या चाऱ्याचा वापर करावा.

गोठ्यामध्ये जास्त जनावरांना बांधू नयेत. जेणेकरून गर्दी होऊन श्वास घेणे अवघड होते.

जनावरांना शुद्ध व थंड पाणी पाजावे.

उष्माघात झालेल्या जनावरांवर पशुतज्ज्ञांच्याकडून उपचार करावेत.

डॉ. रविराज सूर्यवंशी, ८०८०५९५२८०, डॉ. अनिल पाटील ( पशुप्रजनन विभाग, पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि.लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Crisis: कितीही संकटे आली तरी शेतकरी उमेद हारत नाही : आसाराम लोमटे

October Crop Loss: पावसामुळे ऑक्टोबरमध्ये ७४३६ हेक्टरला फटका

Sugarcane Price Protest: ...तर ‘त्या’ कारखान्यांवर हल्लाबोल आंदोलन : शेट्टी

CCI Rules: ‘सीसीआय’च्या अटी पूर्ण करताना दमछाक

Maharashtra Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार

SCROLL FOR NEXT