Poultry Farming
Poultry Farming Agrowon
काळजी पशुधनाची

Poultry Farming : शेतकरी नियोजन : कुक्कुटपालन

Team Agrowon

Poultry Business :

शेतकरी ः श्रीकांत पांडुरंग काळभोर

गाव ः रामकृष्णनगर, ता. जि. सातारा

एकूण शेड ः १ (२०० बाय ३० फूट)

एकूण पक्षी ः ५ हजार

सातारा जिल्ह्यातील रामकृष्णनगर येथील श्रीकांत काळभोर यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूर्णवेळ शेती करण्यास सुरुवात केली. त्यांची एकत्रित कुटुंबाची ५ एकर शेती आहे. त्यात ऊस साडेचार एकर तर गहू ३० गुंठे क्षेत्रावर आहे.

सर्वाधिक क्षेत्र ऊस लागवडी (Sugarcane Cultivation) खाली असल्याने वर्षातून एक वेळच पैसे येत असे. त्यामुळे नियमित उत्पन्नाच्या दृष्टीने पूरक व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले. विविध पूरक व्यवसायांची चाचपणी केल्यानंतर त्यांनी कुक्कुटपालन व्यवसाय (Poultry Business) करण्याचे ठरविले.

परिसरातील विविध कुक्कुटपालन प्रकल्पास त्यांनी भेट देत अभ्यास केला. व्यवसायातील बारकावे आणि अर्थशास्त्र समजून घेतले. त्यानुसार खासगी कंपनीसोबत २०१९ मध्ये करार पद्धतीने ब्रॉयलर कुक्कुटपालनास (Poultry Farming) सुरुवात केली.

व्यवस्थापनातील बाबी ः

- कुक्कुट पक्ष्यांसाठी ३० बाय २०० आकाराचे पाच हजार पक्षी क्षमतेच्या शेडची उभारणी केली.

- खासगी कंपनीसोबत केलेल्या करारानुसार पिले आणण्यास सुरुवात केली. व्यवसायास प्रत्यक्ष सुरुवात केल्यानंतर त्यातील अडचणी समजत गेल्या. त्यातून सकारात्मक मार्ग काढत व्यवसाय यशस्वी केला.

- साधारण ५ हजार पक्ष्यांची एक बॅच ४० ते ४५ दिवसांची असते. अशा वर्षभरात साधारण ५ ते ६ बॅच ते घेतात.

- प्रति वर्ष साधारणपणे २४ ट्रॉली कोंबडी खत उपलब्ध होते. त्याचा शेतीमध्ये वापर केला जातो. तसेच उर्वरित खताची विक्री केली जाते.

- पक्ष्यांची बॅच गेल्यानंतर शेडमधील कोंबडी खत काढले जाते.

- रोगप्रतिबंधक उपाययोजना म्हणून संपूर्ण शेड स्वच्छ करून निर्जंतुकीकरण केले जाते. त्यानंतर शेडमध्ये चुना पसरला जातो. फॉगिंग केले जाते.

- शेडमध्ये भाताचे तूस पसरून घेतले जाते.

- खाद्य तसेच पाण्याची भांडी आणि इतर साहित्य स्वच्छ त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते.

बॅच नियोजन ः

- स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थापन ही यशस्वी कुक्कुटपालनाची गुरुकिल्ली असल्याचे श्रीकांत सांगतात. प्रत्येक बॅच गेल्यानंतर नवीन बॅच घेण्यापूर्वी योग्य पूर्वनियोजन केले जाते.

- पक्षी शेडवर आणल्यानंतर पहिले तीन दिवस त्यांना गूळ पाणी दिले जाते.

- सुरुवातीचे तीन दिवस दररोज सायंकाळी अँटिबायोटिक औषधे दिली जातात.

- पक्षी वयाने मोठे होतील त्यानुसार त्यांना पुरेशी जागा उपलब्ध करून दिली जाते.

- शेडमधील वातावरण स्वच्छ व प्रसन्न ठेवण्यावर भर दिला जातो. त्यानुसार योग्य त्या उपाययोजना केल्या जातात.

- शेडमध्ये टाकलेल्या तुसामुळे दुर्गंधी पसरून आजाराची बाधा होण्याची शक्यता असते. त्यासाठी वेळोवेळी तूस हलविले जाते. आवश्यकता भासल्यास बदलले जाते. तूस ओले होणार नाही याची काळजी घेतली जाते.

- पक्ष्यांना दररोज सकाळी साडेसात व सायंकाळी पाच वाजता खाद्य दिले जाते.

आरोग्य व्यवस्थापन ः

- पक्ष्यांची मरतूक टाळण्यासाठी आरोग्य व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो.

- पिलांना पहिली लस ७ व्या दिवशी, दुसरी लस १४ व्या दिवशी, तर तिसरी लस २१ व्या दिवशी दिली जाते.

- लसीकरण करण्यापूर्वी ६ तास आणि लसीकरणाच्या ६ तासांनंतर पक्ष्यांना पिण्यासाठी साधे पाणी दिले जाते.

- कंपनीतील तज्ज्ञांकडून शेडवरील प्रत्येक बॅचमधील पक्ष्यांची ५ ते ६ दिवसांनी तपासणी केली जाते.

- कोंबड्यांवर बदलत्या तापमानाचा लगेच परिणाम होतो. त्यासाठी शेडमध्ये तापमान नियंत्रित करणे अत्यंत आवश्यक आहे. शेडच्या बाजूने २०० मायक्रॉन जाडीचा कागद लावलेला आहे.

- वातावरण बदलानुसार योग्य व्यवस्थापन केल्यामुळे पक्ष्यांची वाढ चांगली होऊन मर कमी होते.

श्रीकांत काळभोर, ९३२५९८५७१६, (शब्दांकन ः विकास जाधव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT