Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : दहा तालुक्यांत ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव

लम्पी स्कीन’ आजाराचा जिल्ह्यात १० तालुक्यांत प्रादुर्भाव आढळून आला आहे. यामुळे जिल्ह्यात पशूंच्या लसीकरणास सुरुवात झाली असून, पशुपालकांनी या आजाराबाबत सतर्कता बाळगावी, असे आवाहन केले आहे.

टीम ॲग्रोवन

बुलडाणा : ‘लम्पी स्कीन’ आजाराचा (Lumpy Skin Disease) जिल्ह्यात १० तालुक्यांत प्रादुर्भाव आढळून आला आहे. यामुळे जिल्ह्यात पशूंच्या लसीकरणास (Animal Vaccination) सुरुवात झाली असून, पशुपालकांनी या आजाराबाबत सतर्कता बाळगावी, असे आवाहन केले आहे.

जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यात लम्पी स्कीन प्रथमत: आढळून आला आहे. सध्यापर्यंत १० तालुक्यांत या रोगाची लागण झाली आहे. या तालुक्यांतील २७१ पशू बाधित झाले असून १७५ पशू रोगमुक्त झाले आहेत. यातील तीन पशूंचा मृत्यूही झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१ हजार ७७१ पशूंचे लसीकरण करण्यात आले आहे.

तर, ९७ हजार ६०० लस जिल्ह्यात उपलब्ध झाल्या आहेत. पशुपालकांमध्ये या आजाराविषयी गैरसमज निर्माण झाले आहेत. हा रोग पशूंपासून माणसांना होत नाही. हा रोग जनावरांवरील नियमित उपचाराने बरा होणारा आहे. पशुपालकांनी जनावरांमध्ये रोगाची लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा पंचायत समिती किंवा जिल्हास्तरीय कक्षाशी संपर्क करावा.

लम्पी हा आजार विषाणूजन्य आहे. माश्या, डास, गोचिड, चिलटे, बाधित जनावरे यांचा प्रत्यक्ष स्पर्श, दूषित चारा आणि पाणी यामुळे प्रादुर्भाव होतो. अंगावर १० ते ५० मिमी व्यासाच्या गाठी येतात. सुरुवातीस भरपूर ताप, डोळे, नाकातून चिकट स्राव, चारा पाणी खाणे बंद किंवा कमी, दूध उत्पादन कमी होणे, काही जनावरांच्या पायावर सूज येऊन लंगडणे ही लक्षणे आहेत.

...अशी घ्यावी पशुधनाची काळजी

गोठ्यामध्ये डास, माश्या, गोचीड होणार नाही याच दक्षता घ्यावी.

जनावरांवर उपचार करताना नवीन सीरिंज निडलचा वापर करावा.

गोठ्यामध्ये बाहेरील व्यक्ती, डॉक्टर येत असल्यास सर्वप्रथम त्यांचे निर्जंतुकीकरण करावे.

साथीचा आजार सुरू असेपर्यंत बाजारातून जनावरांची खरेदी-विक्री थांबवावी, ही या रोगावर नियंत्रण करण्याच्या उपाययोजना आहेत.

रोगावर नियंत्रणासाठी बाधित जनावरांना तत्काळ वेगळे करावे.

गोठ्यामध्ये सोडिअम हायपोक्लोराइड, फिनाईलची फवारणी करावी.

जनावरांना आयव्हरमेक्टिन इंजेक्शन दिल्यास कीटक, गोचिडाचे नियंत्रण होते.

गावामध्ये कीटकनाशकाची फवारणी करण्याची काळजी पशुपालकांनी घ्यावी, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT