Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : सिंधुदुर्गात आठ गावांत ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात आठ गावांमध्ये लम्पी स्कीनबाधित (Lumpy Skin) जनावरे आढळून आल्यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुसंवर्धन विभागाने (Animal Husbandry) या आजाराबाबत यापूर्वीच लसीकरण (Lumpy Vaccination) मोहीम हाती घेतली होती. आता नव्या उपाययोजना सुरू आहेत.

राज्यात लम्पी स्कीन आजाराने थैमान घातले होते. लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव सिंधुदुर्गात होऊ नये म्हणून परजिल्ह्यातील जनावरांची वाहतूक थांबविण्यात आली होती. सिंधुदुर्गलगतच्या जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजार पोहोचला होता. परंतु सिंधुदुर्गात मात्र आजाराचा प्रादुर्भाव झाला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालक निर्धास्त होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही गावांमध्ये लम्पी स्कीन सदृश लक्षणे जनावरांमध्ये दिसून आली होती.

यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाने त्या जनावरांचे नमुने तपासणीकरिता पाठविले होते. त्यांचा अहवाल आल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील जनावरांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील दाणोली, आंबेगाव (ता. सावंतवाडी), वाडोस, दुकानवाड (ता. कुडाळ), कनेडी (ता. कणकवली), उंबर्डे (ता. वैभववाडी), झरेबांबर (ता. दोडामार्ग), वायगंणी (ता. वेंगुर्ले) या आठ गावांमध्ये लम्पी स्कीनबाधित जनावरे आढळून आली आहेत.

बाधित झालेल्या बहुतांश जनावरांचे पशुसंवर्धन विभागाने लसीकरण केले आहे. तरीदेखील अन्य जनावरे बाधित होऊ नयेत म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. बाधित जनावरांपासून अन्य जनावरे वेगळी करण्याचे आवाहन या विभागाने केले असून लम्पी स्कीनची लक्षणे दिसताच तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराच्या अनुषंगाने जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. लम्पी स्कीन बाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत. जनावरांना काहीही त्रास झाल्यास तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

- डॉ. विद्यानंद देसाई, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सिंधुदुर्ग.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT