Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Vegetable Rate : लग्नसमारंभामुळे मागणी आणि आवकेनुसार भाजीपाल्याला दर मिळत आहेत. कोबी, वांगी, मिरची, काकडीला मागणी जोमात आहे.
Vegetable Market
Vegetable Marketagrowon

Kolhapur Vegetable Market : उन्हाचा तडाखा वाढत असल्याचा थेट परिणाम पालेभाज्यांवर होताना दिसत आहे. शेतीमध्ये पालेभाज्यांना पुरेसं पाणी मिळत नसल्याने पालेभाज्या वाळून जात आहेत. यामुळे परजिल्हा, परराज्यांवर बाजार समिती अवलंबून आहे. कोथिंबीर, मेथीची आवक फारच मंदावली असून, मेथीचा तुटवडा आहे. अन्य भाज्यांचे दरही चढे आहेत. टोमॅटोचे दर काहीसे वाढू लागले आहेत. मात्र, चांगल्या प्रतीचा माल कमी आहे. बीन्सचे दरही दुपटीने वाढले आहेत.

लग्नसमारंभामुळे मागणी आणि आवकेनुसार भाजीपाल्याला दर मिळत आहेत. कोबी, वांगी, मिरची, काकडीला मागणी जोमात आहे. फूल बाजारात दिवसाला भाव बदलत आहेत. फूल आणि त्यापासून बनवलेल्या बुकेंना ग्राहकांतून चांगली मागणी आहे.

फळबाजारात आंब्यांची आवक पुन्हा वाढली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आंबे विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. मागणी असताना कलिंगडाची आवक कमी होत आहे. त्यामुळे कलिंगडचा गारवा काहिसा महागला आहे. खाद्यतेलाचे भाव अस्थिर होत असून, दर सतत कमी जास्त होत आहेत.

प्रति किलो रुपये भाजीपाला : टोमॅटो - १५ ते २०, दोडका - ५० ते ६०, वांगी - ७० ते ८०, कारली - ४० ते ५०, ढोबळी मिरची - ६० ते ८०, मिरची - ८० ते ९०, फ्लॉवर - ३० ते ४०, कोबी - २० ते २५, बटाटा - २५ ते ३०, कांदा - २० ते २५, लसूण - १८० ते २००, आले - १०० ते १२०, लिंबू - ३०० ते ६०० शेकडा, गाजर - ३० ते ४०, बीन्स - २५० ते ३००, गवार - ८० ते १००, वरणा शेंगा - ६० ते ८०, भेंडी - ५० ते ६०, काकडी - ३० ते ५०, दुधी - २० ते ३०, हिरवा वाटाणा - ७० ते ८०, पालेभाज्या - १५ते २०, कोथिंबीर, मेथी (पेंढी) - २५ ते ३०, शेवगा - २ ते ३ रुपये नग.

फुले : झेंडू - ८० ते १००, निशिगंध - १५० ते २००, गुलाब - २५० ते ३००, गलांडा - १०० ते १२०, शेवंती -१८० ते २००.

फळे : सफरचंद - २५० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी - १०० ते १२०, डाळिंब - १२० ते २००, चिकू - ६० ते ८०, पेरू - ५० ते ८०, खजूर - १५० ते २००, पपई - ४० ते ५०, मोर आवळा - १०० ते १२०, सीताफळ - ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज - ४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - ७० ते ८० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच - १०० ते १४०, अननस - ४० ते ५०, अंजीर - ८०-१००.

खाद्यतेल : सरकी - १०८ ते ११२, शेंगतेल - १७४ ते १८०, सोयाबीन - १०८ ते ११२, पामतेल - १०८ ते ११४, सूर्यफूल - १०८ ते ११२ .

कडधान्य : हायब्रीड ज्वारी - ३१ ते ३७, बार्शी शाळू - ३२ ते ५५, गहू - ३२ ते ४०, हरभराडाळ - ७८ ते ८३, तुरडाळ - १५५ ते १६५, मुगडाळ - ११० ते ११५, मसूरडाळ - ७८ ते ८२, उडीदडाळ - १२२ ते १३०, हरभरा - ७०, मूग - १०० ते ११०, मटकी - १०० ते ११०, मसूर - ७०, फुटाणाडाळ - ८३ ते ८५, चवळी - ८८, हिरवा वाटाणा - ९०, छोला - १४० ते १६०.

विदेशी कोंथिबीर बाजारात

उन्हाळ्यात पालेभाज्यांची स्थानिक आवक मंदावते तेव्हा बाहेरची आवक सुरू होते. यामध्ये कोथिंबिरीची आवक अधिक असते. भर उन्हात कोंथिबीर उत्पादन घेणे कठीण असताना बाजारात मात्र आवक दिसत आहे. अशावेळी ही कोथिंबीर विदेशी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. देशी उत्पादन कमी झाल्याने शेतकरी विदेशीवर भर देतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com