Lumpy Vaccine Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ लसीकरणाचे तीन रुपये मानधन नको दुग्धव्यवस्थापन सेवा संघाचे निवेदन

‘‘पशुसंवर्धन विभागाला आर्थिक निधीची कमतरता आहे. त्यामुळे प्रत्येक जनावरामागे लम्पी स्कीनच्या लसीकरणावेळी मिळणारे तीन रुपये मानधन आम्हाला नको.

टीम ॲग्रोवन

मंचर : ‘‘पशुसंवर्धन (Animal Husbandry) विभागाला आर्थिक निधीची कमतरता आहे. त्यामुळे प्रत्येक जनावरामागे लम्पी स्कीनच्या लसीकरणावेळी (Lumpy Vaccination) मिळणारे तीन रुपये मानधन आम्हाला नको. लस देताना जनावरांकडून आम्हाला इजा झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार,

अशा आशयाचे निवेदन आंबेगाव तालुका पशुवैद्यकीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवस्थापन सेवा संघाने मंचर प्रांताधिकाऱ्यांना दिले,’’ अशी माहिती तालुका संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय भोर यांनी दिली.

लसीकरण करताना जनावरांकडून दुखापत झाल्यास त्याचा खर्च आणि जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न आहे. खासगी पदविकाधारक पशुवैद्यकास संकटकाळी मदत केल्याचे प्रमाणपत्र द्यावे. या पत्रामधील पदविकाधारक पशुवैद्यकांच्या नावापुढे सौजन्य दर्शक डॉक्टर उपाधी लावण्यात आलेली नाही.

त्यामुळे पदविकाधारक पशुवैद्यकांस आदेशाद्वारे अपमानित केले आहे, अशी संघटनेच्या सदस्यांची धारणा झाली आहे. या संदर्भात आंबेगाव-जुन्नरचे प्रांताधिकारी सारंग कोडोलकर यांना मंचर येथे भेटून संघटनेच्या वतीने डॉ. संजय भोर, डॉ. सागर आरूटे, डॉ. निवृत्ती पोखरकर, डॉ. गणेश पोखरकर, डॉ. अतुल साबळे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात निवेदन दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT