Milk Update Agrowon
काळजी पशुधनाची

Milk Update : दुग्धजन्य जनावरांसाठी योग्य वातावरणाची का असते गरज?

Dairy Animal : आरामदायी वातावरणात ठेवलेल्या गायी अधिक दूध देतात, सामान्यतः निरोगी, दीर्घ आयुष्य जगतात. योग्य वातावरण म्हणजे ज्यामध्ये गाईचा श्वसन दर, शारीरिक तापमानामध्ये बदल होत नाही. योग्य तापमानात गाई शरीरातील सर्व प्रक्रियांसह चांगली जैविक कार्यक्षमता दर्शवितात.

Team Agrowon

डॉ.आर.बी.अंबादे, डॉ.पी.पी.घोरपडे, डॉ.एस.बी.लंबाते

Milk Production : संकरित जनावरांची दूध उत्पादनक्षमता, वाढीचा दर, उत्तम पुनरुत्पादन कार्यक्षमता चांगली आहे. परंतु उच्च दूध उत्पादक गायी आणि म्हशी उष्ण हवामानाच्या संपर्कात आल्यावर शारीरिक त्रास होण्याची शक्यता जास्त असते. हे लक्षात घेऊन संशोधक आणि उत्पादकांनी दुभत्या गाईसाठी आरामदायक वातावरण तयार करण्यावर अधिक लक्ष दिले आहे.

आरामदायी वातावरणात ठेवलेल्या गायी अधिक दूध देतात, सामान्यतः निरोगी, दीर्घ आयुष्य जगतात. आपण गाईची क्रिया, वागणूक आणि वातावरणाचे निरीक्षण करू शकतो आणि मोजू शकतो.

योग्य वातावरण म्हणजे ज्यामध्ये गाईचा श्वसन दर, शारीरिक तापमानामध्ये बदल होत नाही. योग्य तापमानात गाई शरीरातील सर्व प्रक्रियांसह चांगली जैविक कार्यक्षमता दर्शवितात. त्यांच्या अपेक्षित श्रेणीमध्ये कार्य करतात.

गोठ्याची रचना

१) गोठा कोणत्या भागात बांधायचा आहे, यावर दिशा ठरवली जाते. जसे की लांबी उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या गोठ्यात सावलीतील क्षेत्र सकाळी आणि दुपारच्या सूर्यप्रकाशात येऊन गोठा कोरडा ठेवण्यास मदत होते.

२) अत्यंत उष्ण, कमी पावसाच्या ठिकाणी गोठ्याची लांबी पूर्व- पश्चिम असू शकते, जेणेकरून यामध्ये गोठ्यामधील जनावरे जास्त वेळ सावलीत राहू शकतात. दोन्ही बाबतीत, सावली मध्यभागी स्थित असावी. सर्वसाधारणपणे शेड मध्ये ठेवलेल्या जनावरांचा श्वसन दर ३० टक्के कमी होतो आणि ०.३ अंश सेल्सिअसने शारीरिक तापमान कमी होते.

३) गोठ्याच्या बाजूच्या भिंती मोकळ्या असाव्यात. नैसर्गिक वायुविजन वाढेल याची खात्री करावी.

४) नैसर्गिक किंवा यांत्रिक वायुवीजन पुरेशा प्रमाणात नसल्यास गोठ्यामध्ये पंखे असावेत. कोरड्या हवेसाठी आणि जास्त सापेक्ष आद्रता टाळण्यासाठी चांगले वायुवीजन महत्त्वाचे आहे. ही प्रणाली ३ ते ४ अंश सेल्सिअसने तापमान नियंत्रण करते.

रबर मॅटचा वापर :

१) संशोधनात असे दिसून आले आहे की, जास्त वेळ बसल्याने आणि झोपल्याने कासेमध्ये योग्य रक्त परिसंचयन होते, परिणामी अधिक दूध उत्पादन होते. गाईंना मऊ जमिनीवर झोपायला आवडते. यासाठी रबर मॅट हा एक चांगला पर्याय आहे. काँक्रीटच्या तुलनेत रबर मॅटवर गाईंच्या झोपण्याची वेळ दररोज १४.४२ टक्के वाढलेली दिसून आली आहे.

२) रबर मॅटवर गाईंच्या शेजारी बसण्यासाठी आणि उभे राहण्यासाठी लागणारा वेळ क्राँक्रीटच्या जमिनीपेक्षा कमी आहे.

३) रबर मॅटमुळे जनावरे घसरण्याची संख्या कमी आहे. गाईंचे दूध उत्पादन वाढले आहे.

स्प्रिंकलर कुलिंग सिस्टीम :

१) गोठ्यातील स्प्रिंकलर कूलिंग सिस्टीममुळे गायीचे पूर्ण अंग ओले होते. ज्या वेळी त्यांच्या ओल्या शरीरावरून हवा जाते, त्या वेळी शरीरातील उष्णता कमी होते. गोठ्यातील जमीन ओली होणार नाही याची काळजी घ्यावी.

२) स्प्रिंकलर कूलिंग सिस्टीम कमी दाबावर (०.७०-२. ८१ किलो ग्रॅम / सेंमी वर्ग) काम करते. कमी दाबामुळे स्प्रिंकलर नोझलमधून मोठे थेंब बाहेर पडतात. ते गाईच्या फक्त केसांवर न राहता त्वचेला ओले करतात. त्वचा पृष्ठभाग ओले करण्यासाठी पुरेसे मोठे थेंब असणे आवश्यक आहे आपण स्प्रिंकलर सिस्टीम साठी वेगवेगळ्या प्रकारचे नोझल वापरू शकतो.

३) पंख्यांसह स्प्रिंकलर प्रणाली वापरणे अतिशय चांगले ठरू शकते, यामुळे त्वचेवरील पाण्याचे बाष्पीभवन होते, गाईचे शरीर थंड होते.

हाय प्रेशर फॉगिंग सिस्टीम :

१) ही सिस्टीम सर्वसाधारणपणे बाष्पीय शीतन या तत्त्वावर काम करते. यामध्ये हाय प्रेशर फॉगिंग नोझल वापरले जातात, ज्यामध्ये खूप कमी आकाराचे थेंब निर्माण होतात.

२) या पद्धतीमुळे गाईचे शरीर ओले न होता, गाई ज्या वातावरणात बांधल्या आहात ते वातावरण थंड करतात. हाय प्रेशर फॉगिंग सिस्टीम जास्त प्रेशरवर (१४. ०६ किलो / सेंमी वर्ग) काम करते.

३) ज्या वेळी हाय प्रेशर फॉगिंग नोझलमधून थेंब बाहेर पडतात ते थेंब हवेमध्ये तरंगतात आणि त्या थेंबाचे मग वाफेमध्ये रूपांतर होते आणि हवेमधील उष्णता कमी होते.

४) या सिस्टीममध्ये हवेमध्ये खूप जास्त आर्द्रता निर्माण होते, त्यामुळे जास्त आर्द्रतेच्या ठिकाणी ही सिस्टीम वापरणे तितके फायदेशीर ठरत नाही. हाय प्रेशर फॉगिंग सिस्टीम आणि यांत्रिक फॅन या दोन प्रणाली एकत्ररीत्या चांगल्या प्रकारे काम करतात.

संपर्क : डॉ. आर. बी. अंबादे ८३५५९४२५४६, (लेखक मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई येथे कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे वितरण सुरू

Agrowon Diwali Article : आदिवासींची निसर्गपूरक शेती

Agrowon Diwali Article: शाश्‍वत शेती पद्धतीशिवाय पर्याय नाही

Soybean MSP : हमीदर ५३२८ रुपयांचा खरेदी केली केवळ ५०० रुपये क्‍विंटलने

Agrowon Diwali Article: स्त्रियांची शाश्‍वत शेती

SCROLL FOR NEXT