Pune News: विरोधकांनी संसदेत मागील दिवसात घातलेल्या गोंधळामुळे सरकार आता नमले असून, येत्या मंगळवारी (ता.९) निवडणूक सुधारणांवर लोकसभेत चर्चा होणार आहे. या चर्चेत विरोधकांचा मुख्य मुद्दा असलेल्या मतदारयादीची विशेष गहन पुनरावलोकनचाही (SIR) समावेश करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (ता.२) यांच्यासोबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर हा तोडगा निघाला असून दोन्ही चर्चांसाठी प्रत्येकी १० तास वेळ ठरवण्यात आला आहे..निवडणूक सुधारणा आणि SIR वर मंगळवारी १० तासांची चर्चा…मंगळवारी (ता.९) दुपारी १२ वाजता निवडणूक सुधारणा या व्यापक विषयावर चर्चा सुरू होईल. या चर्चेत विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) अर्थात मतदारयादीची विशेष तपासणी या विषयांचा समावेश राहणार आहे.दोन्ही चर्चांसाठी लोकसभेच्या व्यवसाय सल्लागार समितीने (BAC) प्रत्येकी १० तास वेळ दिला आहे. गरज पडल्यास ही वेळ वाढवली जाऊ शकते, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले..Parliament Winter Session: नाटक नको धोरणात्मक चर्चा हवी, पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावले, हिवाळी अधिवेशनाला सुरुवात.एसआयआर (SIR) म्हणजे काय?मतदारयादीतील चुका, बोगस नावे, मृत व्यक्तींची नावे, बाहेरून आलेल्या स्थलांतरितांची नावे काढून टाकणे, तसेच नवीन पात्र मतदारांची नावे समाविष्ट करणे ह्या गोष्टी विशेष गहन पुनरावलोकना दरम्यान केल्या जातात. बिहार निवडणुकीतील SIR प्रक्रिये दरम्यान ६५ लाख लोकांचे नावे वगळण्यात आल्याचा आरोप झाला.ही प्रक्रिया पक्षपाती आणि सत्ताधारी पक्षाला लाभदायक असल्याची टीकाही करण्यात आली..Winter Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिवेशनास दिली मान्यता.विरोधकांच्या दबावामुळे SIR चा मुद्दा चर्चेला…या आधी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा केली होती. त्यावेळी ते फक्त “निवडणूक सुधारणा” या व्यापक विषयावर बोलण्यास तयार होते, कारण मतदारयादीच्या विशेष पुनरावृत्तीचा विषय हा निवडणूक आयोगाचा प्रशासकीय मुद्दा असल्याचे त्यांचे म्हणणे होते. पण विरोधकांनी संसदेत सर्व बाजूंनी कोंडी केल्याने अखेर सरकारला माघार घ्यावी लागली आणि SIR चा मुद्दा निवडणूक सुधारणांच्या नावाखाली चर्चेला घेण्याचा निर्णय झाला..उद्या (ता.४) इंडिया आघाडीचे खासदार आपली पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक घेणार आहेत. संसदेत होऊ घातलेल्या या चर्चेमुळे कामकाज पुन्हा सुरळीत होईल आणि हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातील उर्वरित दिवसांमध्ये चांगली चर्चा होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.