Animal Feed Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Feed : दुधाळ जनावरांसाठी समतोल आहाराची गरज

जनावरांना ओला चारा देताना एकदल आणि द्विदल वर्गातील चाऱ्याचे मिश्रण करावे. एकदल वर्गातील चाऱ्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, पॅरा गवत, नेपियर गवत, धारवाड हायब्रीड नेपिअर-६ इत्यादींचा समावेश होतो.

Team Agrowon

अकोला ः दुधाळ जनावरांना समतोल आहार (Balanced Diet For Milch Animal) देणे आवश्‍यक आहे. यासाठी परिपूर्ण आहाराचे नियोजन (Animal Diet Management) केले पाहिजे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातील विषय तज्ज्ञ डॉ. गोपाल मंजुळकर यांनी केले.

बाळापूर तालुक्यातील सातरगाव येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभागाच्या (Agricultural Department) वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, प्रकल्प संचालक (आत्मा) आरीफ शाह यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी सरपंच शिवदास पांडे, ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार, मंडळ कृषी अधिकारी शिवाजी जाधव, दत्तात्रय काळे, कृषी सहायक गोपाल राऊत, माजी सरपंच सारंगधर सुर्वे, महादेव तांबडे, संतोष कसुरकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

डॉ. मंजुळकर यांनी जनावरांसाठी समतोल आहारामध्ये ओला चारा, कोरडा चारा आणि खुराक यांचा योग्य प्रमाणात वापर महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

जनावरांना ओला चारा देताना एकदल आणि द्विदल वर्गातील चाऱ्याचे मिश्रण करावे. एकदल वर्गातील चाऱ्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, पॅरा गवत, नेपियर गवत, धारवाड हायब्रीड नेपिअर-६ इत्यादींचा समावेश होतो.

एकदल चाऱ्यामध्ये प्रथिने कमी प्रमाणात आणि पिष्टमय पदार्थ अधिक असतात. चवळी, लूसणघास, बरसिम, स्टायली, दशरथ गवत या द्विदल वर्गातील चारा पिकात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते.

जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन, शेतीपूरक जोडधंदे याविषयीही त्यांनी माहिती दिली. श्री. शेगोकार यांनी हरभरा, गहू पिकांचे व्यवस्थापन व उन्हाळी तीळ लागवड, व्यवस्थापनाविषयी सविस्तर माहिती दिली.

कृषी विज्ञान केंद्राचे विषयज्ञ डॉ. गजानन तुपकर, दत्तात्रय काळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी शंकर कसुरकार, अमोल मसने व गावातील शेतकऱ्यांनी परिश्रम घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer QR Code: खत उपलब्धतेची माहिती आता ‘क्यूआर कोड’वर

Cement Granding Project: प्रस्तावित सिमेंट प्रकल्पाला मंजुरी देऊ नका

Narnala Festival: नरनाळा महोत्सव म्हणजे शेतकऱ्यांच्या ‘जखमेवर मीठ’

Padma Shri Award: प्रजासत्ताक पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्राच्या चार व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर

Labor Supply Scam: ऊसतोड मुकादमांकडून वाहनधारकांची फसवणूक

SCROLL FOR NEXT