Lumpy Skin Decease  Agrowon
काळजी पशुधनाची

लम्पी स्कीन रोगावरील ‘माफसू’च्या संशोधनास राष्ट्रीय पुरस्कार

अयोध्येत दोन पुरस्काराने सन्मानित; प्रादुर्भाव, लक्षणे, औषधोपचारावर संशोधन

टीम ॲग्रोवन

अकोला ः लम्पी स्कीन डिसीज (Lumpy Skin Decease) या नवख्या रोगाची साथ प्रथमच २०२० मध्ये महाराष्ट्रातील प्रामुख्याने विदर्भ व मराठवाडा या विभागातील बहुतांश जिल्ह्यात पसरली होती. या साथीच्या अनुषंगाने अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक (Veterinary) व पशुविज्ञान संस्थेत प्रा. डॉ. अनिल भिकाने, प्रा. डॉ. सुनील वाघमारे, डॉ. रवींद्र हातझाडे व डॉ. किशोर पजई यांनी रोगाचा प्रादुर्भाव, लक्षणे व योग्य औषधोपचार पद्धती यावर संशोधन केले. यावरील शोध निबंधाचे अयोध्या (उत्तर प्रदेश) येथील आचार्य नरेंद्र देव कृषी विद्यापीठातील पशुवैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात वाचन करण्यात आले. या शोधनिबंधाला राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

लम्पी स्कीन रोगाच्या काळात महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत असलेल्या अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशू विज्ञान संस्थेत प्रा. डॉ. अनिल भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली या रोगाचे निदान, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबद्दल विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनार, चर्चासत्रे, वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शनद्वारे मोठ्या प्रमाणावर पशुवैद्यक व शेतकऱ्यात जनजागृती आणि मार्गदर्शन करण्यात आले होते. त्याचा ही साथ आटोक्यात आणण्यास मोठा फायदा झाला होता.

या दरम्यान प्रा. डॉ. भिकाने, प्रा. डॉ. वाघमारे, डॉ. हातझाडे व डॉ. पजई यांनी यावर संशोधन केले. संशोधनावर आधारित शोध निबंधाचे सहा व सात रोजी झालेल्या पशुवैद्यकीय औषधशास्त्रातील नवकल्पना: वर्तमान स्थिती आणि भविष्यातील परिणाम या विषयावरील राष्ट्रीय परिसंवाद आणि वार्षिक अधिवेशनात प्रा. डॉ. सुनील वाघमारे यांनी ‘रोमाथंक प्राण्यातील रोग’ सत्रात सादरीकरण केले. शोधनिबंध सादरीकरणास समारोपीय कार्यक्रमात नाबार्डचे मुख्य विभागीय व्यवस्थापक एस. के. डोरा यांच्याहस्ते प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच प्रा. डॉ. वाघमारे यांना पशुवैद्यकीय आंतर आणि प्रतिबंधात्मक औषधी सोसायटीच्या विकासात मोलाचे योगदान दिल्याबद्दल आचार्य नरेंद्र देव कृषी विद्यापीठ कुमार गंज (अयोध्या) कुलगुरू डॉ. बीजेंद्रसिंह यांच्याहस्ते व कुलगुरू डॉ. जी. के. सिंह (मथुरा), व्हीआयपीएम संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माफसूचे विस्तार शिक्षण संचालक प्रा. डॉ. अनिल भिकाने, सचिव डॉ. अशोक कुमार, अधिष्ठाता डॉ. आर. के. जोशी, आयोजक सचिव डॉ. सत्यव्रत सिंग व डॉ. जे. पी. सिंग यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र, पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर मिळवून दिलेल्या या मानाबद्दल माफसूचे कुलगुरू डॉ. आशीष पातुरकर, शिक्षण संचालक डॉ. शिरीष उपाध्ये, संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे, संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ धनंजय दिघे, डॉ. चैतन्य पावशे आदींनी अभिनंदन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

Rainfall Deficit Impact: ऑगस्ट संपत आला तरी रान पेरणीविना ओस

SCROLL FOR NEXT